1 / 6फळांपासून तयार केलेले फेसपॅक त्वचेला नैसर्गिक पोषण देतात आणि कोणत्याही रासायनिक दुष्परिणामाशिवाय चेहरा तजेलदार ठेवतात. खाली दिलेले ५ वेगवेगळे फळांचे फेसपॅक घरच्या घरी करुन वापरता येतात. हे पाचही फेसपॅक नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक आहेत. नियमित वापरल्यास त्वचा उजळ, मऊ आणि निरोगी दिसते.2 / 6एक पिकलेले केळे कुस्करून घ्यायचे. त्यात एक चमचाभर मध आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळायचा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा. हा पॅक त्वचा मऊ करतो आणि कोरडेपणा कमी करतो.3 / 6थोडी पिकलेली पपई घ्यायची. त्यात एक चमचा दही घाला. चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. पपईतील एन्झाइम्स त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतात आणि रंग उजळवतात.4 / 6संत्र्याची साल वाळवून त्याची पूड करा. त्यात गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून १० मिनिटांनी धुवा. हा पॅक त्वचेतील तेल नियंत्रित करतो आणि पोषण वाढवतो.5 / 6२-३ स्ट्रॉबेरी घ्या. त्यात एक चमचा साय घाला. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा. स्ट्रॉबेरीतील जीवनसत्त्व सी त्वचेला उजळपणा देते आणि त्वचेवरील छिद्रे स्वच्छ करते.6 / 6एक किवी कुस्करुन घ्या आणि त्यात एक चमचाभर मध मिसळा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. किवीमध्ये जीवनसत्त्व सी भरपूर असते, जे त्वचेचा नैसर्गिक पोत चांगला ठेवते आणि डाग कमी करते.