Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ईऽऽ शीऽऽ कोबीची भाजी नको, कोबीला नाक मुरडणारेही खातील पोटभर-पाहा कोबीचे ५ पौष्टिक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2026 15:04 IST

1 / 6
कोबीची भाजी वारंवार केली जाते. लहान मुलांना कोबी खाऊ घालणं म्हणजे तसं कठीणचं. लहानच काय मोठ्यांनाही अनेकदा ही भाजी बोरींग वाटते. पण कोबीची फक्त भाजीच करता येते असे नाही. कोबीचे इतरही पदार्थ करता येतात.
2 / 6
जसे की कोबीची पचडी. चवीला एकदम मस्त लागते आणि करायला अगदी सोपी आहे. कोबीची कोशिंबीरच फक्त त्याला छान फोडणी द्यायची. शिवाय दही नाही घातले तरी चालते. काही जण दही वापरतात तर काही नाही.
3 / 6
कोबीचे पराठे तर घरोघरी केले जातात. अगदी सोपे आहेत आणि चवीलाही मस्त असतात. नाश्त्यासाठी एकदम मस्त पदार्थ आहे. तसेच कोबीला पाणी सुटते त्यामुळे पराठ्यासाठी पिठही नीट मळता येते.
4 / 6
कोबीची भजी करता येतात. बेसन, हिरवी मिरची, कांदा, मसाले घालून मस्त खमंग भजी करता येते. कुरकुरीत आणि चविष्ट तर होतेच शिवाय झटपट होते.
5 / 6
कोबी मंचूरियन तर भारतात फार लोकप्रिय आहे. गल्लोगल्ली त्याच्या गाड्या असतात. घरी करणेही अगदी सोपे. फक्त चिली, सॉस, सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉसचे प्रमाण योग्य घ्यायचे. शेजवान चटणीही घालायची आणि मैदा घालून तळायचे.
6 / 6
कोबी घालून मुटकुळे करता येतात. जसे मेथीचे करतात अगदी तिच रेसिपी. बेसन वापरु शकता. नाचणी, ज्वारी, बाजरी इतरही पिठं वापरुन करता येतात. पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता आहे.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्सपाककृती