एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:46 IST
1 / 10आजकाल अनेक लोकांना वजन वाढणं आणि केस गळणं या सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. केस गळणे थांबवण्यासाठी लोक त्यांच्या केसांना विविध प्रोडक्ट लावतात, परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही. 2 / 10ग्रीन टी हे एक नॅचरल ट्रिंक आहे जे फक्त वजन कमी करण्यास मदत करत नाही तर केसांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. ग्रीन टीने तुम्ही केसगळती कमी करू शकता. ग्रीन टी केसांसाठी कशी फायदेशीर आहे ते जाणून घेऊया....3 / 10ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स नावाचा एक नैसर्गिक पदार्थ असतो, जो तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर असतो. ते केस गळण्याचं सर्वात मोठं कारण मानल्या जाणाऱ्या DHT हार्मोनचा प्रभाव कमी करण्यास मदत करतं.4 / 10ग्रीन टीमध्ये असंख्य पॉलीफेनॉल आणि मिनरल्स असतात जे स्काल्प मजबूत करण्यास मदत करतात. हे नवीन केस येण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते.5 / 10ग्रीन टीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे तुमच्या स्काल्पवरील जळजळ, कोंडा आणि खाज कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टीचे अनेक फायदे आहेत. 6 / 10ग्रीन टीचे अँटीऑक्सिडंट्स केसांना पोषण देतात, ते मजबूत आणि चमकदार बनवतात. नियमित वापरामुळे केस तुटणं कमी होतं, ज्यामुळे केसांचे दीर्घकालीन आरोग्य सुधारतं.7 / 10तुम्ही दररोज १-२ कप ग्रीन टी पिऊ शकता; सकाळी किंवा दुपारी पिणं चांगलं आहे. नियमित प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच, परंतु केसांचं आरोग्य देखील सुधारतं.8 / 10तुम्ही ग्रीन टी थंड करून तुमच्या स्काल्पवर हलक्या हाताने मसाज करू शकता. १०-१५ मिनिटं तसेच राहू द्या, नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे स्काल्पचं आरोग्य सुधारतं, कोंडा आणि खाज कमी होते आणि केसांची चांगली वाढ होते.9 / 10२ ग्रीन टी बॅग्ज किंवा २ चमचे ग्रीन टी पानं, २ चमचे एलोवेरा जेल, १ चमचा नारळाचं तेल10 / 10ग्रीन टी गरम पाण्यात ५ मिनिटे ठेवा, नंतर थंड होऊ द्या. त्यात एलोवेरा जेल आणि नारळाचं तेल घाला. ही पेस्ट स्काल्प आणि केसांना पूर्णपणे लावा. २०-३० मिनिटं तसेच राहू द्या आणि नंतर शाम्पूने केस नीट धुवा.