Join us

एरंडेल तेल करेल जादू! पोटाच्या तक्रारीपासून - त्वचेपर्यंत अनेक समस्यांवर असरदार - तेल १ फायदे अनेक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 19:45 IST

1 / 8
कॅस्टर ऑईल ज्याला 'एरंडेल तेल' असे देखील म्हणतात. आरोग्याची काळजी (Common uses of Castor Oil) घेण्यापासून, त्वचेच्या सौंदर्यासाठी अशा अनेक कारणांसाठी एरंडेल तेल फायदेशीर ठरते. आत्तापर्यंत घरातील मोठ्या लोकांनी नेहमीच आपल्याला एरंडेल तेलाच्या फायद्यांबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगितली असेलच.
2 / 8
फार पूर्वीपासून औषधी मानले जाणारे एरंडेल तेल (7 Benefits and Uses of Castor Oil) अनेक गोष्टींसाठी वापरण्याचा ट्रेंड पुन्हा आला आहे. एरंडेल तेल आपले आरोग्य आणि त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे, ते पाहूयात.
3 / 8
बद्धकोष्ठतेसाठी (Constipation) एरंडेल तेल (Castor Oil) वापरणे हा एक सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी, जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर चमचाभर एरंडेल तेल नाभीला लावून, रात्री झोपण्यापूर्वी मसाज करावा. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
4 / 8
त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी फार पूर्वीपासून एरंडेल तेल वापरले जाते. त्वचेसाठी एरंडेल तेल बेस्ट मॉइश्चरायझर आहे. एरंडेल तेलाचे १ ते २ थेंब घेऊन ते बोटांवर पसरवा, त्यानंतर चेहऱ्यावर हलकेच मसाज करावा. याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघण्यास देखील मदत होते.
5 / 8
त्वचेप्रमाणेच केसांसाठी देखील एरंडेल तेल वापरणे अतिशय फायदेशीर ठरते. १ चमचा एरंडेल तेल आणि एक चमचा ऑलिव्ह तेल एकत्र मिसळा. तेल हलके गरम करा आणि संपूर्ण केसांना मसाज करा. आपण हे आठवड्यातून २ वेळा करू शकता. याने केसांची मुळे मजबूत होते आणि केसांच्या वाढीस मदत मिळते.
6 / 8
काहीजणांच्या भुवया आणि पापण्यांचे केस विरळ असतात. अशावेळी भुवया आणि पापण्यांचे केस दाट करण्यासाठी एरंडेल तेलाने केसांना हलकेच मालिश करावी. यामुळे भुवया आणि पापण्यांचे केस दाट होतात.
7 / 8
एरंडेल तेल बॉडी मसाजसाठी उत्तम मानले जाते. हे तेल शरीरातील कोणत्याही अवयवातील वेदना दूर करण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी एरंडेल तेल गरम करा. आपण यात लॅव्हेंडर किंवा खोबरेल तेल मिक्स करू शकता. आपण या तेलाने संपूर्ण शरीराला मसाज करु शकता.
8 / 8
काहीवेळा आपली नखं तुटतात, वाढ होत नाही किंवा नखांच्या आजूबाजूची त्वचा सोलवटून निघते. अशावेळी एरंडेल तेल वापरणे फायदेशीर ठरते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल तेलाने नखांना मालिश करून घ्यावी. यामुळे नखांना मजबुती मिळते आणि नखांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआरोग्यहेल्थ टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी