Join us

सकाळी उठताच 'हे' पाणी प्या- दिवसेंदिवस चेहऱ्यावरचं तेज वाढतच जाईल, आरोग्यालाही मिळतील भरपूर फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 09:25 IST

1 / 8
त्वचेवर नॅचरल ग्लो हवा असेल आणि त्यासोबतच तब्येतही ठणठणीत ठेवायची असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय नक्कीच खूप उपयोगी येऊ शकतो.
2 / 8
हा उपाय करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा बेदाणे भिजत घाला.
3 / 8
यानंतर त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा बडिशेप घाला. दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी पिऊन टाका आणि बडिशेप तसेच बेदाणे बारीक चावून खा.(5 amazing benefits of having soaked kishmish and badishep)
4 / 8
हा उपाय नियमितपणे केल्यास अंगात ताकद येते. हिमोग्लोबिन वाढते. त्याचा आपोआपच खूप चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. त्वचा तजेलदार होते.
5 / 8
ज्यांना अपचनाचा नेहमीच त्रास होतो, त्यांनाही हा उपाय खूप उपयुक्त ठरतो. कारण हे पाणी रोज प्यायल्यामुळे अपचन, ॲसिडीटी, बद्धकोष्ठता असा त्रास कमी होतो.
6 / 8
भिजवलेल्या बेदाण्यांमधून कॅल्शियम आणि पोटॅशियमही भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरतो.
7 / 8
आजारपणातून उठलेल्या अशक्त व्यक्तींना रोज या पद्धतीने तयार केलेलं पाणी प्यायला दिलं तर त्यांना लवकर ताकद येते.
8 / 8
खोकला आणि कफ हा त्रास कमी करण्यासाठीही बेदाणे फायदेशीर ठरतात. ही माहिती डॉक्टरांनी dr.sharmarobin या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीआरोग्यहेल्थ टिप्स