अनेकदा आपण बघतो की, घरांतील विशेषतः लहान मुले खाली बसताना वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बसतात. लहान मुले खेळताना किंवा खाली बसताना अनेकदा त्यांचे पाय इंग्रजी अक्षर 'W' च्या आकारात ठेवतात. याचाच अर्थ, दोन्ही गुडघे आत वाकवून, पाय मागे बाजूला पसरवून बसण्याची पोझिशन इंग्रजी 'W' या अक्षराप्रमाणे दिसते, या स्थितीला 'W-सिटिंग' असे म्हणतात. ही पोझिशन पाहता आरामदायक वाटते, पण दीर्घकाळ अशा प्रकारे बसण्यामुळे मुलांचे गुडघे , कंबर आणि नितंबांच्या स्नायूंवर ताण येतो. परिणामी चालण्याची पद्धत, शरीराचे पोश्चर आणि हाडांची वाढ यावरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे मुलांची ही सवय लवकर मोडणे गरजेचे असते(Yoga Poses for Kids to Correct W Sitting Habit).
पालकांनी मुलांची अशा स्थितीत बसण्याची ही सवय वेळीच मोडली पाहिजे, पण ही सवय ओरडून किंवा जबरदस्तीने मोडण्याऐवजी योगाच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने देखील मोडता येऊ शकते. योगासनांच्या मदतीने मुलांचे शरीर लवचिक, संतुलित आणि मजबूत होते तसेच चुकीच्या पद्धतीने बसण्याच्या सवयीत हळूहळू बदल होताना दिसतो. मुलांची अशी 'W' सिटिंगमध्ये बसण्याची सवय (yoga poses for kids to correct W sitting) मोडण्यासाठी तीन सोपी आणि उपयुक्त योगासनं आहेत जी त्यांची ही बसण्याची सवय मोडण्यास मदत करतील.
मुलांची 'W' सिटिंगमध्ये बसण्याची सवय मोडण्यासाठी उपयुक्त ३ योगासन...
१. बद्धकोणासन (Butterfly Pose) :- बद्धकोणासन हे आसन 'W-पोझिशन' मुळे हिप्सवर पडणाऱ्या ताणाला दूर करण्यासाठी फायदेशीर असते. या आसनामुळे हिप्स आणि मांडीच्या आतील भाग मोकळे होतात, ज्यामुळे पायांच्या स्नायूंमधील लवचीकपणा वाढतो आणि मुलांसाठी 'W' ऐवजी क्रॉस्-लेग्ड म्हणजेच आरामात मांडी घालून बसण्यास मदत होते. मुलांना जमिनीवर बसवा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून त्यांचे तळवे एकमेकांना जोडून घ्या. हातांनी पाय किंवा घोटे पकडून धरा. मुलाला फुलपाखरांच्या पंखांप्रमाणे गुडघे वर - खाली हलवायला सांगा. यामुळे हिप जॉइंट्सची लवचिकता वाढते आणि W सिटिंगमुळे आलेली ताठरता कमी होते.
ट्युशन- क्लासेसचा भार मुलांवर कशाला, घरीही अभ्यास होईल सोपा-५ सोपे उपाय! लागेल अभ्यासाची गोडी!
२. उत्कटासन (Chair Pose) :- उत्कटासन पायांच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. हे आसन पाय आणि मांड्यांना शक्तिशाली करते, ज्यामुळे मुलांचा बॅलेन्स सुधारतो. मजबूत पायांमुळे 'W-पोझिशन' मध्ये बसण्याची गरज कमी होते. मुलांना सरळ ताठ स्तितीत उभे राहण्यास सांगा, दोन्ही पाय एकत्र ठेवा. दोन्ही हात शरीराच्या दोन्ही बाजूला ठेवा. दोन्ही हात खांद्यांजवळून वर घेऊन डोक्याच्या वर एकत्र आणा किंवा समांतर ठेवा. हातांच्या बोटांच्या टोकांमध्ये ताण ठेवा. हळूहळू गुडघे वाकवत शरीर मागे झुकवा, जणू काही खुर्चीवर बसत आहात. मांड्या जमिनीशी जवळजवळ समांतर होतील इतपत खाली बसा. छाती पुढे ठेवा आणि पोट आत ओढा. वजन पायांच्या टाचांवर ठेवा, गुडघे बोटांपुढे जाऊ देऊ नका. नंतर श्वास सोडत पुन्हा उभे राहा आणि हात खाली आणा. हे आसन शरीरातील स्नायूंना मजबूत करते, विशेषतः पाय, मांड्या आणि स्नायूंना बळकटी देते.
आजीआजोबांच्या सहवासात वाढलेल्या मुलांमध्ये असतात ६ गुण! मायेसोबतच मिळते जीवाभावाची मैत्रीही...
३. सेतुबंधासन (Bridge Pose) :- सेतुबंधासन हे आसन हिप्सना मजबूत करून पाठ आणि स्नायूंमध्ये मजबुती आणते, जे बॉडी पोश्चर उत्तम राखण्यासाठी गरजेचे असते. हे आसन 'W-पोझिशन' मुळे कमकुवत झालेल्या पाठीच्या खालच्या भागाला आणि हिप्सच्या स्नायूंना मजबुती देते, ज्यामुळे मूल सरळ बसायला शिकते आणि मणक्याला आधार मिळतो. मुलांना पाठीवर झोपवा. गुडघे वाकवून पाय जमिनीवर स्थिर ठेवा. आता श्वास घेत हळू हळू नितंब वर उचला, जसा एखादा पूल तयार होत आहे. १० सेकंदांपर्यंत या स्थितीत स्थिर राहा. नंतर हे आसन पुन्हा करा.
या आसनांबरोबरच, मुलांना रोज काहीवेळ सूर्यप्रकाशात नक्की बसवा. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन-डी मिळते, जे हाडे आणि स्नायूंना मजबूत करण्यासाठी गरजेचे असते. या आसनांचा दररोज सराव केल्याने मुलांच्या बसण्याच्या पद्धतीत आणि बॉडी पोश्चरमधे लगेच सकारात्मक फरक जाणवू लागेल.
