Join us  

मुलांचं कुणाशीच पटत नाही, काही मुलांना मित्रमैत्रिणीच नसतात असं का? मुलांची चूक की पालकांची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2024 8:00 AM

मुलांना मित्रच नाही तर त्याची जागा पैसे-वस्तू यांनी भरु नका, मैत्री ही वाढत्या वयाच्या मुलांची गरज आहे.

जुहीच्या आईला म्हणजे अलकाला जुहीची खूप काळजी वाटते. जुही फारशी कोणामध्ये मिसळत नाही, शाळेत आणि काॅलनीतही तिच्या कोणी मैत्रिणी नाही. तिच्या बरोबरीच्या इतर मुलींना खूप मैत्रिणी आणि मित्र आहेत पण जुहीला मात्र मैत्रीणीच नाही. कारण कुणाशी कशी मैत्री करावी हेच जुहीला समजत नाही. ती म्हणते, शाळेत माझ्याशी कोणी बोलत नाही, काॅलनीत मला खेळायला कुणी बोलवत नाही. आणि आईला कळत नाही की आपल्या मुलीला एकलकोंडी म्हणावं, घुमी म्हणावं की काय म्हणावं? या वयात खूप मित्रमैत्रिणी असतात मग आपलीच लेक अशी एकेकटी का राहते?

जुहीचं मात्र एकच रुटिन, शाळेत जायचं, घरी आल्यावर अभ्यास करायचा आणि नंतर घरातच बसून राहायचं. आपल्या मुलीनं हे असं एकलकोंडं राहू नये असं अलकाला खूप वाटतं. आपल्या कुणी मैत्रिणी नाही म्हणून नाराज असलेल्या जुहीला तिच्या आवडीच्या वस्तू, कपडे, खाऊ देवून खूष करण्याचा आटापिटा अलका करते. पण जुहीला मित्रमैत्रिणींमुळे जो आनंद मिळणार आहे तो इतर कशातूनच मिळणार नाही हेही अलकाला समजतंय. तुला कोणी मैत्रिणी कशा नाही असं जुहीला सतत विचारणाऱ्या अलकाकडे जुहीने मैत्री कशी करावी याचं मात्र उत्तर नाहीये.

टीन एजर मुलांच्या वर्तनाच्या अभ्यासक आणि बालरोग तज्ज्ञ डाॅ. वैशाली देशमुख सांगतात असं का होतं?

१. कोणत्याही वयोगटातल्या मुला मुलींसाठी त्यांना मित्र मैत्रिणी असणे गरजेचे आहे. अभ्यास, शिस्त, परीक्षा या सगळ्या तणावावरचा उपाय म्हणजे मित्रमैत्रिणी. मित्रमैत्रिणी नसतील तर मुलांना कमीपणा वाटायाला लागतो, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अभ्यासातला रस कमी होतो. घरी आई बाबांशी भांडणं व्हायला लागतात. हे होवू नये यावर एकच उपाय तो म्हणजे मैत्री करणं

२. टिकणारी मैत्री चेहेऱ्याकडे पाहून, कोण कसं दिसतं यावरुन करायची नाही असं मुलांना सांगायला हवं. मैत्रीत आपण आधी द्यायला, प्रेमानं वागायला, जुळवून घ्यायला, दुसऱ्याला महत्त्व द्यायला शिकलं पाहिजे हे मुलांना सांगायला हवं.३. खूप ना सही आपल्या आवडी निवडी जुळतील अशा मित्रमैत्रिणी हवे. स्वभाव इण्ट्रोवर्ड असेल तर काही मोजके जिवलग मित्रमैत्रिणी हवेच.४. आपल्याला जसे मित्रमैत्रिणी हवे तसे आपण बनावं पुढाकार घ्यावा मुलांनी म्हणून आईबाबांनीही प्रयत्न करायला हवे. मित्रांची जागा स्वत: घेऊ नये.

मैत्री कशी करावी? वाचा काही युक्त्या.https://urjaa.online/how-to-make-friends-in-adolescent-age/

टॅग्स :पालकत्वलहान मुलंशिक्षणशाळा