Lokmat Sakhi >Parenting > १ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय..

१ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय..

Why No Salt and Sugar For Babies Until 1 Year of Age?: १ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना जर आपण मीठ असणारे पदार्थ खाऊ घातले तर त्यामुळे त्यांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया..(side effects of giving salt and sugar to babies)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 19:17 IST2025-04-03T14:11:58+5:302025-04-03T19:17:38+5:30

Why No Salt and Sugar For Babies Until 1 Year of Age?: १ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना जर आपण मीठ असणारे पदार्थ खाऊ घातले तर त्यामुळे त्यांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया..(side effects of giving salt and sugar to babies)

Why No Salt and Sugar For Babies until 1 year of age, side effects of giving salt and sugar to babies | १ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय..

१ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय..

Highlightsअगदी वरचं अन्न सुरू केल्यापासूनच तुम्ही बाळांना मीठ घातलेले पदार्थ खायला देत असाल तर....

बाळ जन्माला आल्यानंतर सुरुवातीचे ६ महिने त्याला आईच्या दुधाशिवाय इतर कोणताही पदार्थ खाऊ घालू नये, असं तज्ज्ञ सांगतात. ही गोष्ट आता आपल्याकडे लोकांना बऱ्यापैकी अंगवळणी पडलेली आहे. पण याशिवाय डॉक्टर असंही सांगतात की ६ महिन्यांनंतर जेव्हा तुम्ही बाळाला वरचे पदार्थ सुरू कराल तेव्हा त्याला मीठ, साखर हे पदार्थ देऊ नका. ही गोष्ट मात्र अजूनही आपल्याकडे फार गांभिर्याने घेतली जात नाही. आजपर्यंतच्या पिढ्या तर मीठ आणि साखर असणारे पदार्थ खाऊनच वाढल्या. मग आताच असं का, असा प्रश्नही नुकत्याच आई झालेल्या महिलांना घरातल्या ज्येष्ठांकडून विचारला जातो (Why No Salt and Sugar For Babies Until 1 Year of Age?). त्याच प्रश्नाचं उत्तर आता आपण तज्ज्ञांकडून माहिती करून घेणार आहोत.(side effects of giving salt and sugar to babies)

 

१ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळाला मीठयुक्त पदार्थ का खाऊ घालू नये?

अगदी वरचं अन्न सुरू केल्यापासूनच तुम्ही बाळांना मीठ घातलेले पदार्थ खायला देत असाल तर त्याचा बाळांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी dr_kiranphadtare_gharge या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ३ महत्त्वाची कारणं सांगितली असून ती नेमकी कोणती ते पाहूया..

१५ दिवसांतच मोगऱ्याला फुटतील भरपूर कळ्या- 'हे' खत घाला- घरभर दरवळेल मोगऱ्याचा सुगंध

१. डॉक्टर असं सांगतात की सुरुवातीच्या काळात बाळाच्या शरीरात क्षार आणि पाणी हे दोन्ही पदार्थ संतुलित असणं गरजेचं असतं. या दोन्हींपैकी एकाचे प्रमाण वाढल्यास किंवा कमी झाल्यास त्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. जर बाळाच्या आहारात मीठ असेल तर शरीरातील क्षार आणि पाण्याचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बाळाला मीठ असलेले पदार्थ खाऊ घालणं टाळायला हवं.

 

२. ज्या बाळांना लहान वयातच भरपूर मीठ घातलेले पदार्थ खायला दिले जातात त्या बाळांना मोठं झाल्यानंतर खूप कमी वयातच रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचा धोका असतो असं बऱ्याच अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे.

मुलींना कमी वयातच पाळी सुरू होतेय! तज्ज्ञ सांगतात 'हे' पदार्थ लेकीला खाऊ घालणं बंद करा..

३. मीठ आणि साखरयुक्त पदार्थ बाळांना खायला घातल्यास त्यांना खूप लवकर चटपटीत, चटकदार पदार्थांची सवय लागते आणि खूपच लवकर ते जंकफूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थांकडे आकर्षित होऊ शकतात. 


 

Web Title: Why No Salt and Sugar For Babies until 1 year of age, side effects of giving salt and sugar to babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.