Lokmat Sakhi >Parenting > मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'ही' सवय आजच बदला; सुधा मूर्तींचा पालकांना खास सल्ला

मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'ही' सवय आजच बदला; सुधा मूर्तींचा पालकांना खास सल्ला

Sudha Murthy Talks About Parenting : एका मुलाखतीत त्यांनी पालकत्वाबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:26 IST2024-12-21T12:31:21+5:302024-12-21T14:26:42+5:30

Sudha Murthy Talks About Parenting : एका मुलाखतीत त्यांनी पालकत्वाबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

When Sudha Murthy Talks About Parenting And Communication With Child | मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'ही' सवय आजच बदला; सुधा मूर्तींचा पालकांना खास सल्ला

मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'ही' सवय आजच बदला; सुधा मूर्तींचा पालकांना खास सल्ला

बिझनेस वुमन आणि समाज सेविका, लेखक सुधा मूर्ती. अनेकदा सुधा मूर्तींनी मुलांच्या पालनपोषणाबाबत मनमोकळेपणानं गप्पा मारल्या आहेत. एका मुलाखतीत त्यांनी पालकत्वाबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत.  पालकांना काही खास  सल्ला दिला आहे. (When Sudha Murthy Talks About Parenting And Communication With Child)

या इव्हेंटमध्ये सुधा मूर्तींना एका विद्यार्थांनं प्रश्न विचारला की कोणत्या पद्धतीनं आईवडिलांशी मुलं मोकळेपणानं बोलू  शकतात?  (Parenting Tips Given By Sudha Murthy) कारण मुलं अनेकदा आईवडिलांशी बोलताना खूप विचार करतात. ज्यामुळे मुलांच्या मनातील गोष्ट पालकांपर्यंत पोहोचू शकत नाही.

मेहेंदी फंक्शनसाठी खास आऊटफिट्स; कमी बजेटमध्ये खरेदी करा ७ सुंदर-आकर्षक ड्रेस

सुधा मूर्तींनी सांगितलं की, आईवडिलांशी कोणतीही गोष्ट मुलांपासून लपवू नये. असं केल्यास दोघांसाठीही चुकीचं ठरू शकतं.  त्यांनी एकदा आपल्या मुलीला सांगितलं होतं की तुझ्याबद्दल मला दुसऱ्यांकडून काहीही कळायला नको. तू स्वत: येऊन मला सर्व काही सांगायला हवं. (Sudha Murthy Talks About Parenting And Communication)

यासाठी वेळोवेळी त्यांनी आपल्या मुलांशी बोलत राहायला हवं. मुलांशी बोलायला वेळ द्यायला हवा. मुलांशी असं वागायला हवं की, मुलं स्वत: येऊन सगळंच तुम्हाला सांगतील.  

मुलं खातात पण अंगालाच लागत नाही? मुलांचं वजन, उंची वाढवण्यासाठी डॉक्टर सांगतात खास उपाय

जर मुलं तुमच्याशी बोलायला घाबरत असतील तर तुम्ही आपल्या वागण्यात बदल  करायला हवा. मुलांना समजून घेतलं तर मुलं तुमच्याकडे मन हलकं करतील. त्यांनी सांगितले की आई वडीलच आहेत जे मुलांना योग्य सल्ला देऊ शकतात.

मुलांना सांगा, दुसरी व्यक्ती तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकते. मुलांसाठी त्यांची आईच एक चांगली सल्लागार असते. आई-वडीलांपेक्षा चांगला विचार कोणीही नाही करू शकत. मुलांचं बोलणं पटलं नाही तरी त्यांनी मुलांशी बोलायला हवं.  

Web Title: When Sudha Murthy Talks About Parenting And Communication With Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.