मूल जन्माला आलं नाही की त्याच्या नावापासून अगदी तो पुढे काय करणार यावर पालकांची चर्चा सुरु असते. बाळ अगदी सहा महिन्यांचे झाल्यानंतर पालक मुलांना बोलायला शिकवतात. शब्दांची ओळख करुन देतात.(kindergarten admission age) इंग्रजी अक्षरे, रंग, भाज्या इत्यादी गोष्टी समजावून सांगतात. मूल दोन वर्षाचे झाले आणि त्याला शब्दांची ओळख समजू लागली की पालक त्यांना प्ले ग्रुप किंवा बालवाडीमध्ये घालण्याचा प्रयत्न करतात. (kindergarten admission age)
बालवाडी म्हणजे मुलाच्या आयुष्यातली पहिली शैक्षणिक पायरी.(preschool admission age) या ठिकाणी मुलांना पुस्तकांपेक्षा खेळ, गाणी, गोष्टी, रंग आणि गटात मिसळण्याची, नवीन लोकांसोबत ओळख करण्याची संधी मिळते.(when to send child to kindergarten) त्यामुळे बालवाडीतील शिक्षण हे आनंदी आणि चांगलं असणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे. पण मुलांना बालवाडीत घालण्याचं योग्य वय कोणतं हे पालकांना समजायला हवं.
व्यायाम-डाएट करुनही ढेरी कमी होत नसेल तर रोज खा ५ गोष्टी, सुटलेलं पोट आणि वाढलेली चरबी गायब
डॉ. निमिषा अरोरा म्हणतात मुलांना बालवाडीत घालण्याचे योग्य वय हे ३ वर्षांचे आहे. या वयापर्यंत मुले अधिक हुशार होतात. काही वेळासाठी ते आपल्या पालकांपासून वेगळे राहू शकतात. तसेच मुलांमध्ये नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित करतात. प्रत्येक मूल हे वेगळे असते. काही मूल अडीच वर्षाच्या आत तयार होतात तर काही ३.५ किंवा ४ वर्षांच्या होईपर्यंत परिपक्व होतात. मुलांना सामाजिक किंवा कौटुंबिक दबावामुळे मुलाला लवकर शाळेत पाठवणं शहाणपणाचे नाही.
मुलांना लवकर शाळेत पाठवल्यानंतर ते हुशार होतेच असे नाही. शिक्षणापेक्षाही महत्त्वाचे मुलांशी खेळणे, प्रश्न विचारणे, गोष्टी सांगणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं. या गोष्टी मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासात मदत करतात.
मुलाला शाळेत पाठवण्याचा निर्णय हा त्याच्या वयापेक्षा तयारीवर आधारित असावा. शाळेत पाठवण्यासाठी वय हे साधारण तीन वर्षाचे असायला हवे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाला आनंदी, सुरक्षित आणि आत्मविश्वासू वाटणं महत्त्वाचं. अनेकदा मूल शाळेत जाताना घाबरत, रडत, भीती वाटते किंवा त्यांना असुरक्षितता जाणवू शकते. म्हणूनच पालकांनी तुलना किंवा स्पर्धेच्या दबावाखाली निर्णय न घेता, आपल्या चिमुकल्याची तयारी समजून घ्यावी. शिकण्याची बळजबरी नको, तर शिकण्याची ओढ निर्माण झाली तर बालवाडीचं शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडतं
