Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > सुसंगती सदा घडो!!पण जर मुले चुकीच्या संगतीत असतील तर? तुमच्या मुलांच्या सवयीच सांगतील त्यांच्या मित्रांबद्दल...

सुसंगती सदा घडो!!पण जर मुले चुकीच्या संगतीत असतील तर? तुमच्या मुलांच्या सवयीच सांगतील त्यांच्या मित्रांबद्दल...

what if your children are in the wrong company? Your children's habits will tell you about their friends : लहान मुलांची संगत त्यांच्या मानसिकतेवर करते परिणाम. जाणून घ्या लक्षणे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2025 17:32 IST2025-12-29T17:31:14+5:302025-12-29T17:32:33+5:30

what if your children are in the wrong company? Your children's habits will tell you about their friends : लहान मुलांची संगत त्यांच्या मानसिकतेवर करते परिणाम. जाणून घ्या लक्षणे.

what if your children are in the wrong company? Your children's habits will tell you about their friends | सुसंगती सदा घडो!!पण जर मुले चुकीच्या संगतीत असतील तर? तुमच्या मुलांच्या सवयीच सांगतील त्यांच्या मित्रांबद्दल...

सुसंगती सदा घडो!!पण जर मुले चुकीच्या संगतीत असतील तर? तुमच्या मुलांच्या सवयीच सांगतील त्यांच्या मित्रांबद्दल...

शाळेत जाणारी मुले मोठी होत असताना त्यांच्या आयुष्यात संगत आणि बाहेरील वातावरणाचा प्रभाव वाढू लागतो. या वयात मुले सहज प्रभावित होतात. जर ती चुकीच्या किंवा वाईट संगतीत गेली तर त्याचा परिणाम त्यांच्या वागणुकीत, सवयींमध्ये आणि अभ्यासात हळूहळू दिसू लागतो. अनेकदा हे बदल अचानक न होता सूक्ष्म स्वरुपात होतात, त्यामुळे पालकांनी जागरुक राहणे अत्यंत गरजेचे असते.

वाईट संगतीत असलेली मुले आधीपेक्षा जास्त चिडचिडी, उद्धट किंवा आक्रमक वागू लागतात. आई-वडिलांचे ऐकणे बंद करतात. उत्तर देताना बोलण्यात तिरसटपणा दिसतो किंवा सतत विरोध करण्याची सवय लागते. पूर्वी शांत आणि बोलकी असलेली मुले अचानक अबोल होतात किंवा फारच गुप्तपणे वागू लागतात. त्यांच्या वागण्यात खोटे बोलणे, कारण नसताना घराबाहेर जाण्याची घाई किंवा वेळेबाबत बेफिकिरी दिसू लागते.

अभ्यासातही बदल स्पष्ट जाणवतात. अभ्यासात लक्ष न लागणे, गुण अचानक कमी होणे, गृहपाठ टाळणे किंवा शाळेबद्दल नकारात्मक बोलणे ही लक्षणे दिसू शकतात. शाळेत जाण्याची इच्छा होत नाही. वारंवार आजाराचे कारण देणे किंवा शिक्षकांविषयी तक्रारी करत राहणे हेही बदलाचे संकेत असू शकतात. काही मुले त्यांच्या जुन्या चांगल्या मित्रांपासून दूर जाऊन नवीन मित्रांमध्येच अधिक वेळ घालवू लागतात.

सवयींमध्ये होणारे बदल पालकांनी विशेष लक्षात घ्यावेत. झोपेच्या वेळा बदलणे, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, मोबाइल किंवा इंटरनेटचा अति वापर, घरच्यांपासून लपून फोनवर बोलणे किंवा मेसेजेस डिलीट करणे ही लक्षणे दिसू शकतात. कपड्यांची शैली अचानक बदलणे, अयोग्य भाषा वापरणे, खर्च वाढणे किंवा पैशाची वारंवार मागणी करणे हेही वाईट संगतीचे लक्षण असू शकते.

पालकांनी हे बदल ओळखण्यासाठी मुलांशी सतत संवाद ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांशी बोलताना चौकशीच्या स्वरात नव्हे तर विश्वासाने, समजून घेण्याच्या भूमिकेतून बोलावे. त्यांच्या मित्रांविषयी, शाळेतील घडामोडींविषयी आणि आवडी-निवडींबद्दल नियमितपणे चर्चा केल्यास अनेक गोष्टी सहज लक्षात येतात. मुलांच्या वागण्यात अचानक झालेले बदल दुर्लक्षित न करता शांतपणे त्यामागचे कारण शोधणे आवश्यक आहे.

मुलांवर सतत संशय घेणे किंवा कठोर बंधने घालणे टाळावे. त्याऐवजी योग्य-अयोग्य यातील फरक समजावून सांगणे, चांगल्या सवयींचे उदाहरण स्वत: देणे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे अधिक प्रभावी ठरते. गरज भासल्यास शिक्षक, शाळेचे समुपदेशक किंवा विश्वासार्ह व्यक्तीची मदत घेणेही योग्य ठरू शकते. या वायातील मुले चुकीच्या मार्गाला लागली तर त्याचा संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. त्यामुळे मुलांची संगत फार महत्त्वाची असते.

Web Title : बुरी संगति: नकारात्मक प्रभावों को पहचानें और बच्चों का मार्गदर्शन करें।

Web Summary : बच्चों की आदतें उनके दोस्तों को दर्शाती हैं। चिड़चिड़ापन, गोपनीयता, गिरते ग्रेड और बदलते दिनचर्या पर ध्यान दें। खुला संवाद, विश्वास और सकारात्मक वातावरण महत्वपूर्ण हैं। जरूरत पड़ने पर मदद लें।

Web Title : Bad Company: Recognizing negative influences and guiding children wisely.

Web Summary : Children's habits reflect their friends. Watch for irritability, secrecy, declining grades, and changing routines. Open communication, trust, and a positive environment are crucial. Seek help when needed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.