Lokmat Sakhi >Parenting > मुलांवर चांगले संस्कार व्हावे असं वाटतं? सद्गुरू सांगतात, आईबाबांनी करायलाच हव्या ५ गोष्टी

मुलांवर चांगले संस्कार व्हावे असं वाटतं? सद्गुरू सांगतात, आईबाबांनी करायलाच हव्या ५ गोष्टी

Parenting Tips By Sadguru Jaggi Vasudev :

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:50 PM2024-05-24T12:50:54+5:302024-05-24T14:33:34+5:30

Parenting Tips By Sadguru Jaggi Vasudev :

What Husbands Should Change During Pregnancy : Parenting Tips By Sadguru Jaggi Vasudev | मुलांवर चांगले संस्कार व्हावे असं वाटतं? सद्गुरू सांगतात, आईबाबांनी करायलाच हव्या ५ गोष्टी

मुलांवर चांगले संस्कार व्हावे असं वाटतं? सद्गुरू सांगतात, आईबाबांनी करायलाच हव्या ५ गोष्टी

आपल्या जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. (Parenting Tips) आपल्या मुलांनी काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा असते.  मुलांना चांगले संस्कार, चांगल्या गोष्टी देण्यासाठी आई वडीलांना काहीही करण्याची तयारी असते. (What Husbands Should Change During Pregnancy) मोटिव्हेशनल स्पिकर सद्गुरू सांगतात की प्रेग्नंसीच्यावेळेस काही गोष्टीत बदलकरू शकता.  (Parenting Tips By Sadguru Jaggi Vasudev)

1) निगेटिव्हिटीपासून दूर राहा

सद्गुरू सांगतात की जर तुम्हाला चांगले पालक बनायचे असेल मुलांना सकारात्मक वातावरणात वाढवा. असं केल्याने तुमच्यातील नकारात्मक एनर्जी दूर होण्यास मदत होईल. याशिवाय मनातील निगेटिव्ह विचार बाहेर काढा आणि रिलॅक्स राहा. पॉजिटिव्ह अप्रोचने आपल्या मुलांचे पालन-पोषण करण्याचा प्रयत्न करा. 

2) चुकीच्या गोष्टींना नाही म्हणा

तुम्ही मुलं होण्याआधी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर ते तिथेच सोडून द्या. आई वडील जे करतात त्यांचा मुलांच्या विचारांवर परिणाम होतो. मुलांनी चुकीच्या गोष्टी करणं सोडून द्यायला हवं. ज्यामुळे मुलांना कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा इफेक्ट होईल. 

3) कुटूंबाला वेळ द्या

जेव्हा पत्नी गरोदर असेल तेव्हा पतीने आपल्यात बदल करून घ्यायला हवेत. आपली गरोदर पत्नी किंवा मुलांसाठी  वेळ काढा. ज्यामुळे कुटूंबात चांगलं बॉन्डींग  राहतं आणि मुलांनाही चांगल्या सवयी लागतात. 

4) मुलं आणि पत्नीचे कौतुक

सद्गुरू सांगतात की घरातील काम वेळेवर करत राहा. जर कोणतीही चूक झाली  तर त्यांना प्रेमाने समजावून सांगा आणि छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करा. आपल्या पार्टनरला त्रास होईल असं वागू नका. 

५) दुसऱ्यांसोबत तुलना करू नका

तुम्हाला वाटत असेल की मुलांनी आनंदाने राहावं तर आपली फॅमिली, मुलं आणि कुटूंबांची तुलना आपल्या भाऊ, बहिण आणि मित्रांसोबत  करणं बंद करा. तुमचं कुटूंब आनंदी राहण्यासाठी पार्टनरच्या भाव-भावनांचा विचार करा. तुमची पार्टनर कोणत्याही गोष्टीवर ओव्हरथिंक करत असेल तिला समजून घ्या.  जेणेकरून पूर्ण कुटूंब आनंदी राहील.

Web Title: What Husbands Should Change During Pregnancy : Parenting Tips By Sadguru Jaggi Vasudev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.