आधुनिक युगात यंत्रणा आपल्या आयुष्याचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. मनोरंजन, काम, शिक्षण सगळंच यावर अवलंबून आहे. (Watching mobile while eating can cause serious problems, children can get effected more )सर्व क्षेत्रात आता आधुनिक यंत्रणांचा वापर केला जातो. मात्र सतत त्याचा वापर करणे मानसिकतेसाठी आणि आरोग्यासाठी चांगले नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास तो शरीर आणि मन दोन्हीवर वाईट परिणाम करतो.
जेवताना आजकाल घरोघरी लहान मुलांना टिव्ही किंवा मोबाइल पाहायची सवय आहे. त्याशिवाय मुलं एक घासही खात नाहीत. ही सवय फार घातक आहे. जुनी पिढी सांगते की जेवताना लक्ष दुसरीकडे असेल तर जेवण अंगाला लागत नाही. त्यांचा हा अनुभवातून आलेला सल्ला नक्कीच योग्य आहे. जेवताना आपण अन्नाकडे, त्याच्या चवीकडे आणि आपल्या शरीराच्या भुकेकडे लक्ष देणं आवश्यक असतं. पण टीव्ही किंवा मोबाइल पाहताना लक्ष संपूर्णपणे दुसरीकडे जातं. त्यामुळे आपण किती खात आहोत, काय खात आहोत याचं भान राहत नाही. (Watching mobile while eating can cause serious problems, children can get effected more )अनेक वेळा गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं किंवा अन्न नीट चावून न खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात. या सवयीमुळे लठ्ठपणा, अपचन, अॅसिडिटी यांसारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं.
लहान मुलांच्या बाबतीत ही समस्या आणखी गंभीर ठरते. अलीकडे अनेक पालक मुलांना खाण्यास भाग पाडण्यासाठी त्यांच्या समोर मोबाइल ठेवतात. सुरुवातीला हे सोयीचं वाटतं, पण हळूहळू मुलांना त्याची सवय लागते. मुलं अन्नाकडे दुर्लक्ष करतात, आणि फक्त स्क्रीन समोर असल्यावरच खाण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या भुकेची नैसर्गिक भावना कमी होते. शिवाय, स्क्रीनच्या सततच्या संपर्कामुळे डोळ्यांचे आजार, झोपेच्या समस्या, चिडचिड, संवादक्षमता कमी होणे अशा अनेक मानसिक आणि शारीरिक त्रासांना ते तोंड द्यावे लागते.
याच्या उलट, जेवणाच्या वेळी जर संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन संवाद साधत जेवलं, तर त्याचे अनेक फायदे आहेत. अशावेळी दिवसभराच्या घडामोडी शेअर करता येतात, एकमेकांशी नातं घट्ट होतं, आणि मुलांमध्ये संवादकौशल्य वाढतं. अशा गप्पांमधून मुलं भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होतात. एकत्र जेवण ही फक्त अन्नाची नव्हे तर प्रेम, जिव्हाळा आणि संवादाचीही गरज पूर्ण करते.
जेवण हा एक अनुभव असतो. तो केवळ पोट भरण्यासाठी नसतो, तर शरीर आणि मन दोघांनाही पोषण देणारा असतो. स्क्रीनसमोर जेवल्याने या अनुभवाचं महत्व कमी होते. त्यामुळे मोबाईल-टीव्ही बाजूला ठेवून, एकत्र बसून, प्रेमाने आणि संवाद करत जेवणं हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. ही सवय आपल्या आरोग्यालाही फायदेशीर ठरते आणि मानसिकतेसाठीही.
Web Summary : Feeding kids with mobile phones diminishes natural hunger, leading to obesity, digestive issues, and screen addiction. Family meals foster communication and emotional well-being.
Web Summary : मोबाइल से खाना खिलाने से बच्चों की भूख कम होती है, मोटापा, पाचन संबंधी समस्याएँ और स्क्रीन की लत लगती है। पारिवारिक भोजन संवाद और भावनात्मक कल्याण को बढ़ावा देता है।