Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > विक्रांत मेस्सी सांगतो dad guilt छळू लागला आणि...! नव्या बाबाला छळणारा हा त्रास नेमका असतो काय?

विक्रांत मेस्सी सांगतो dad guilt छळू लागला आणि...! नव्या बाबाला छळणारा हा त्रास नेमका असतो काय?

बाळ झाल्यानंतर नव्या आईचं जीवन जसं बदलून जातं तसंच नव्या बाबाचंही... त्याच विषयी सांगतो आहे अभिनेता विक्रांत मेस्सी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 17:23 IST2026-04-09T17:22:02+5:302026-04-09T17:23:45+5:30

बाळ झाल्यानंतर नव्या आईचं जीवन जसं बदलून जातं तसंच नव्या बाबाचंही... त्याच विषयी सांगतो आहे अभिनेता विक्रांत मेस्सी...

Vikrant Massey says dad guilt started to haunt him and...! Is this really the problem that haunts new dads? | विक्रांत मेस्सी सांगतो dad guilt छळू लागला आणि...! नव्या बाबाला छळणारा हा त्रास नेमका असतो काय?

विक्रांत मेस्सी सांगतो dad guilt छळू लागला आणि...! नव्या बाबाला छळणारा हा त्रास नेमका असतो काय?

Highlightsएक पिता झाल्यानंतर पुरुषांमध्ये होणारा हा बदल अगदी स्वाभाविक आहे. फक्त तो स्विकारा.. जमेल तसा वेळ काढा आणि तो बाळाला द्या.

अभिनेता विक्रांत मेस्सीने साधारण वर्षभरापुर्वी सोशल मीडियावर “returning home” अशी पोस्ट टाकली आणि मग अचानक सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळाल्या. त्याच्या या पोस्टचे कित्येक वेगवेगळे अर्थ काढले गेले. त्याने का कामातून ब्रेक घेतला असावा याविषयीही कित्येक चर्चा सुरू झाल्या. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या या निर्णयाचा खुलासा केला आणि हा निर्णय घेण्यासाठी त्याचा चिमुकला लेक 'वरदान' हा जबाबदार असल्याचं सांगितलं. तो म्हणाला की आमच्या आयुष्यात बाळ आलं आणि त्यामुळे मी संपूर्णपणे बदलून गेलो. त्याला सोडून कामासाठी घराबाहेर पडताना दरवेळी मन जड व्हायचं... कारण माझ्या मनात कायम ‘dad guilt’ असायचा. काय आहे हे डॅड्स गिल्ट आणि विक्रांतसारख्या वडिलांना तो का व्हावा?

 

अभिनेता विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल यांनी नुकतीच परिणिती चोप्रा होस्ट करत असलेल्या एका शोमध्ये हजेरी लावली. यामध्ये विक्रांत म्हणतो की एका आईला तिच्या बाळाला सोडून कामासाठी घराबाहेर पडताना जेवढा त्रास होतो किंवा जेवढा अपराधीपणा वाटतो तेवढाच एका बापालाही वाटत असतो. नव्या आईची जशी परिस्थिती असते तशीच नव्या बाबाचीही असते.

लहान मुलांना ४-४ दिवस शी होत नाही? ‘या’ गोष्टी करा, आयुष्यभरासाठी कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळा

सगळं लक्ष बाळाकडे असतं पण शरीर मात्र कामासाठी घराबाहेर पडलेलं असतं. माझंही असंच होतं. मुलाचा जन्म झाला तेव्हा माझ्याकडे खूप कामं होती. त्यातून वेळ काढून मला त्याला धड भेटताही यायचं नाही. याचं खूप वाईट वाटायचं. असं वाटत होतं की मी एकटा पडतो आहे. एक मोठी पोकळी निर्माण होत चालली होती. त्यामुळेच एक दिवस पक्कं ठरवलं, हातातली कामं भराभर संपवली आणि कामातून थोडा ब्रेक घेऊन थेट घरी आलो. कारण मला माझ्या मुलासोबत वेळ घालवायचा होता. त्याला मोठं होताना जवळून पाहायचं होतं. आणि आज ते मी समाधानाने करतो आहे.. 

 

विक्रांत म्हणतो की आपण घराबाहेर जातो आणि आपला पार्टनर मात्र बाळासोबत असतो तेव्हा कधी कधी त्याचा हेवाही वाटतो. घरी राहून ती बाळासाठी जे काही करत असते त्यातलं एक चतुर्थांश कामही आपण बाबा म्हणून करत नाही, हे जाणवतं.

आंबट कैरी आणि झणझणीत लाल मिरच्यांची खमंग चटणी, उन्हाळा स्पेशल चटकदार रेसिपी 

पण तरीही प्रत्येकक्षणी बाळाजवळ असण्याची प्रचंड ओढ असते. तुम्हालाही एक बाबा म्हणून असं वाटत असेल तर त्यात काही वेगळं नाही. एक पिता झाल्यानंतर पुरुषांमध्ये होणारा हा बदल अगदी स्वाभाविक आहे. फक्त तो स्विकारा.. जमेल तसा वेळ काढा आणि तो बाळाला द्या. तरच तुमच्यामधला 'डॅड्स गिल्ट' थोडा तरी कमी होऊ शकतो.... 

 

Web Title : विक्रांत मैसी ने बताया 'डैड गिल्ट': नए पिता के संघर्ष को समझना।

Web Summary : विक्रांत मैसी ने अपने बेटे के जन्म के बाद 'डैड गिल्ट' के साथ अपने अनुभव को साझा किया। उन्होंने काम और अपने बच्चे के साथ समय बिताने के बीच फटे होने का अहसास किया, अंततः परिवार को प्राथमिकता देने के लिए ब्रेक लिया। वह पिताओं को अपने बच्चों को समय समर्पित करके इन भावनाओं को स्वीकार करने और संबोधित करने के लिए प्रोत्साहित करते हैं।

Web Title : Vikrant Massey reveals 'dad guilt': Understanding the new father's struggle.

Web Summary : Vikrant Massey shared his experience with 'dad guilt' after his son's birth. He felt torn between work and spending time with his child, ultimately taking a break to prioritize family. He encourages fathers to acknowledge and address these feelings by dedicating time to their children.