Tips to Fix Children Sleeping Cycle: आजच्या डिजिटल युगात मोठ्यांप्रमाणेच मुलंही रात्री उशिरापर्यंत जागी राहू लागले आहेत. या सवयीचा त्यांची मानसिक वाढ आणि आरोग्यावर लहानपणापासूनच वाईट परिणाम होऊ लागतो. त्यामुळे मुलांना वेळेवर झोपवणे ही पालकांची मोठी जबाबदारी आहे. अनेक लहान मुलं रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत राहतात किंवा टीव्ही पाहतात, त्यामुळे त्यांना झोप लागत नाही. आपणही या समस्येमुळे त्रासलेले असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. खाली दिलेल्या 4 सोप्या आणि प्रभावी टिप्समुळे आपण मुलांचं झोपेचं रूटीन सुधारू शकता. यामुळे मुलं स्वतःहून वेळेवर झोपायला लागतील.
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दूर ठेवा
आजच्या काळात मुलांचा बराच वेळ मोबाईल, टॅबलेट आणि टीव्हीवर जातो. ही सवय त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. स्क्रीनटाईम वाढल्यानं मुलांना झोप येण्यास अडथळा निर्माण होतो. अशात मुलांच्या झोपण्याच्या किमान 1 तास आधी सर्व गॅजेट्स बंद करून घ्या. स्क्रीनटाईम कमी असेल तर मुलांना झोप लवकर लागते.
मुलांना अॅक्टिविटी करायला सांगा
मुलांची झोप सुधारण्यासाठी त्यांना दिवसभरात शारीरिक अॅक्टिविटी करण्यात व्यस्त ठेवा. स्केटिंग, स्विमिंग, सायकलिंग यांसारख्या अॅक्टिव्हिटीजमध्ये त्यांना सहभागी करा. याचा फायदा असा होईल की, शरीर थकलं की मुलांना रात्री सहज आणि लवकर झोप लागेल. तसंच मानसिक आरोग्यही उत्तम राहील.
रूटीन ठरवा
पालकांनी मुलांसाठी संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. यात अभ्यास, खेळ, जेवण आणि झोप यासाठी ठराविक वेळ द्या. असे रूटीन मुलांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या शांत, संतुलित ठेवते.
झोपेसाठी योग्य वातावरण तयार करा
मुलांना चांगली झोप येण्यासाठी खोलीचं वातावरण खूप महत्त्वाचं असतं. यासाठी झोपेच्या वेळी खोलीत शांतता ठेवा. दिवे मंद ठेवा किंवा बंद करा, तापमान आरामदायी ठेवा. असं वातावरण मुलांना झोपायला मदत करतं.
Web Summary : Fix kids' sleep with these tips: limit screen time, encourage activity, set a routine, and create a relaxing bedtime environment for better sleep.
Web Summary : बच्चों की नींद ठीक करें: स्क्रीन टाइम कम करें, गतिविधि को प्रोत्साहित करें, एक दिनचर्या बनाएं और बेहतर नींद के लिए आरामदायक माहौल बनाएं।