Lokmat Sakhi >Parenting > ग्रीन टी बॅग्स तब्येतीसाठी फारच घातक, पोटातला गर्भही नाही सुरक्षित-अजिबात करू नका 'ही' चूक

ग्रीन टी बॅग्स तब्येतीसाठी फारच घातक, पोटातला गर्भही नाही सुरक्षित-अजिबात करू नका 'ही' चूक

Tea Bag Side Effects : न्यूट्रिशनिस्ट डिंपल जांगडा यांनी या टी बॅग्सच्या नुकसानाबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:14 IST2025-08-21T13:54:46+5:302025-08-21T14:14:55+5:30

Tea Bag Side Effects : न्यूट्रिशनिस्ट डिंपल जांगडा यांनी या टी बॅग्सच्या नुकसानाबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Tea bag side effects : Microplastics in it can cause damage to your overall health | ग्रीन टी बॅग्स तब्येतीसाठी फारच घातक, पोटातला गर्भही नाही सुरक्षित-अजिबात करू नका 'ही' चूक

ग्रीन टी बॅग्स तब्येतीसाठी फारच घातक, पोटातला गर्भही नाही सुरक्षित-अजिबात करू नका 'ही' चूक

Tea Bag Side Effects : तब्येतीची काळजी घेण्यासाठी महिला असो वा पुरूष वेगवेगळे उपाय करतात. वाढलेलं वजन कमी करणं हा अनेकांसाठी महत्वाचा मुद्दा झाला आहे. अशात वजन कमी करण्यासाठी किंवा स्लिम दिसण्यासाठी बरेचजण ग्रीन टी पितात. ही ग्रीन टी टी बॅग्समध्ये मिळते. बाजारात वेगवेगळ्या ब्रॅंन्डच्या ग्रीन टी बॅग्स मिळतात. फक्त एक टी बॅग गरम पाण्यात टाका आणि चहाचा आनंद घ्या.

पण अजूनही अनेकांना हे माहीत नाही की, या टी बॅग्स आपल्या आरोग्यावर फार वाईट प्रभाव पाडतात. म्हणजे असं म्हणता येईल की, अशाप्रकारे चहा पिऊन आपण आपली तब्येत चांगली करण्याऐवजी आणखी बिघडवत आहोत. न्यूट्रिशनिस्ट डिंपल जांगडा यांनी या टी बॅग्सच्या नुकसानाबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मायक्रोप्लास्टिकचा धोका

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, या टी बॅग सामान्यपणे नायलॉन किंवा पॉलीप्रोपायलीनच्या बनवलेल्या असतात. यांमध्ये फेथलेट्स, शिसे, आर्सेनिक आणि मोठ्या प्रमाणात धातू असतात, जे चहामध्ये मिक्स होतात. एका कपमध्ये जवळपास 11.6 बिलियन मायक्रोप्लास्टिक्स आणि जवळपास 3.1 बिलियन नॅनोपार्टिकल्स सोडतात. ज्यामुळे आतड्यांचं मोठं नुकसान होतं. हे तत्व डीएनएमध्ये शिरतात, ज्यामुळे मायटोकॉन्ड्रियाचं नुकसान होतं. काही अवयव डॅमेज होतात आणि आनुवांशिक आजारांचा धोकाही वाढतो. 

पीसीओडी आणि पीसीओएसचं कारण

टी बॅग्सचा वापर करणं महिलांसाठी अधिक घातक ठरू शकतं. टी बॅग्सचा अधिक वापर केल्यानं पीसीओडी/पीसीओएस व थायरॉईडचा धोका वाढतो. कारण टी बॅग्समधील तत्वांमुळे शरीरातील हार्मोन्सची निर्मिती आणि संतुलन प्रभावित होऊ शकतं.

गर्भातील बाळासाठी घातक

आपल्याला माहीत नसेल, पण मायक्रोप्लास्टिक गर्भावस्थेदरम्यान पोटातील बाळासाठीही घातक ठरू शकतात. टी बॅग्सचा वापर केल्यानं गर्भातील बाळांमध्ये ऑटोइम्यून आणि आनुवांशिक आजार होण्याचा धोका असतो. कारण हे असे मायक्रोप्लास्टिक आहेत, जे प्लेसेंटामध्ये, गर्भनलिकेमध्ये, शुक्राणुमध्ये, एग्समध्ये, ब्लडमध्ये, वेसल्स आणि हार्टमध्ये शिरतात.

Web Title: Tea bag side effects : Microplastics in it can cause damage to your overall health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.