Lokmat Sakhi >Parenting > मुलांची बुद्धिमत्ता वाढविणारा १ खास पदार्थ! डॉक्टर सांगतात रोज खाऊ घाला- तब्येतही सुधारेल.. 

मुलांची बुद्धिमत्ता वाढविणारा १ खास पदार्थ! डॉक्टर सांगतात रोज खाऊ घाला- तब्येतही सुधारेल.. 

Superfood For Brain Development In Kids: मुलांनी अभ्यासात हुशार व्हावं, असं सगळ्याच पालकांना वाटतं. त्यासाठीच हा एक पदार्थ त्यांना नियमितपणे खाऊ घालायला हवा..(how to boost concentration level in kids?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 09:27 IST2025-06-27T09:26:24+5:302025-06-27T09:27:28+5:30

Superfood For Brain Development In Kids: मुलांनी अभ्यासात हुशार व्हावं, असं सगळ्याच पालकांना वाटतं. त्यासाठीच हा एक पदार्थ त्यांना नियमितपणे खाऊ घालायला हवा..(how to boost concentration level in kids?)

superfood for brain development in kids, how to boost concentration level in kids, food that helps for weight gain in kids | मुलांची बुद्धिमत्ता वाढविणारा १ खास पदार्थ! डॉक्टर सांगतात रोज खाऊ घाला- तब्येतही सुधारेल.. 

मुलांची बुद्धिमत्ता वाढविणारा १ खास पदार्थ! डॉक्टर सांगतात रोज खाऊ घाला- तब्येतही सुधारेल.. 

Highlights मुलांची बुद्धिमत्ता, एकाग्रता वाढेल आणि त्याचा खूप चांगला परिणाम त्यांच्या अभ्यासावर होईल.

शाळा सुरू झाल्याने आता पुन्हा एकदा पालकांच्या मागे मुलांचा अभ्यास, ट्युशन, परीक्षा, सबमिशन्स अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत. जी मुलं मुळातच समजूतदार असतात ते त्यांचा अभ्यास आणि शाळेत सांगितलेल्या इतर गोष्टी अगदी नेमाने करतात. पण बहुतांश मुलं अशी असतात ज्यांच्या पालकांना सतत मुलांच्या मागे लागून त्यांच्याकडून अभ्यास आणि इतर गोष्टी करून घ्याव्या लागतात. मुलं अभ्यासाला बसली तरी सतत चुळबूळ करतात. एकाजागी ती अजिबात शांत बसत नाहीत. याचा परिणाम अभ्यासावर होतो आणि मग परीक्षेत कमी गूण मिळतात. तुमची मुलंही अशाच प्रकारची असतील तर त्यांच्या आहारात एक पदार्थ हमखास असायला हवा, असं डॉक्टर सांगत आहेत (how to boost concentration level in kids?). तो पदार्थ नियमितपणे खाल्ल्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता, एकाग्रता वाढेल आणि त्याचा खूप चांगला परिणाम त्यांच्या अभ्यासावर होईल.(superfood for brain development in kids)

 

मुलांची बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारा पदार्थ

मुलांच्या बौद्धिक विकासासाठी कोणता पदार्थ अतिशय उत्तम असू शकतो, याविषयीची माहिती डॉ. पवन मंडालिया यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणतात की बहुतांश घरांमध्ये मुलांना भिजवलेले बदाम आठवणीने खायला दिले जातात.

रिमझिम पावसात गरमागरम भुट्टा तर खायलाच हवा! मक्याचे कणीस खाण्याचे ५ जबरदस्त फायदे 

४ ते ५ बदाम रोज खाणे हे मुलांसाठी निश्चितच उत्तम आहे. पण त्यासोबतच त्याला ४ ते ५ पिस्तेही द्यायला हवे (benefits of eating pistachio). कारण डॉक्टरांच्या मते पिस्त्यामध्ये असे काही घटक असतात जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी तर फायदेशीर ठरतातच, पण मुलांचा आयक्यू वाढविण्यासाठीही मदत करतात. पिस्त्यामध्ये प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स, फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जी मुलं अशक्त आहेत, त्यांनी तर वजन वाढण्यासाठी नियमितपणे पिस्ता खायला हवे. 

 

डॉक्टरांच्या मते पिस्ता हे मुलांसाठी सुपरफूड असून त्यातून ल्युसिन, झिक्झँथीन आणि डीएचए असे पौष्टिक घटक मिळतात जे मेंदूच्या विकासासाठी खूप गरजेचे असतात.

मराठवाडी जेवणाची चवच न्यारी!! पाहा खमंग, रसरशीत खाद्यसंस्कृती सांगणारे पारंपरिक पदार्थ

या घटकांमुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते. शिवाय पिस्तामध्ये असणारे काही घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात. पिस्त्यामध्ये असणारे बायोटीन केसांच्या वाढीसाठीही मदत करतात. म्हणूनच मुलांना नियमितपणे पिस्तेही खायला द्यावेत. 

 

Web Title: superfood for brain development in kids, how to boost concentration level in kids, food that helps for weight gain in kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.