मोबाईल आणि इंटरनेट युगात मुलांसमोर सगळ्याच गोष्टी 'उघड' झाल्या आहेत. पण ज्या गोष्टी योग्य वयात योग्य पद्धतीने कळायला हव्यात, त्या चुकीच्या पद्धतीने कळत आहेत. त्यामुळे मुलांचा गोंधळ वाढत आहे. म्हणून मुलांना बाहेरून चुकीची माहिती कळण्याआधी पालकांनीच पुढाकार घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. ते कसे करायला हवे ते पाहू.
आजच्या बदललेल्या सामाजिक वातावरणात मुलांसाठी लैंगिक शिक्षण (Sex Education) किती महत्त्वाचे आहे, हे पालकांना समजू लागले आहे. मात्र, १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना याविषयी किती आणि कशी माहिती द्यावी, हा प्रश्न अनेक पालकांना सतावतो. तज्ञ सायकोलॉजिस्ट मात्र म्हणतात, की या वयोगटातील मुलांना या शब्दांचा थेट अर्थ समजावणे योग्य नाही, परंतु काही मूलभूत धडे देणे आवश्यक आहे.
१. 'सेक्स एज्युकेशन'ची योग्य वेळ कोणती?
तज्ञांच्या मते, १० वर्षांखालील मुलांना थेट लैंगिक शिक्षण (Sex Education) देणे योग्य नाही, कारण या वयात त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास सुरूवातीच्या टप्प्यात असतो.
मूलभूत शिक्षण: या वयात मुलांना शारीरिक संबंधांऐवजी (Physical Relations), त्यांच्या शरीराच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून माहिती दिली पाहिजे.
योग्य वय: जेव्हा मुले १३ वर्षांची होतात, तेव्हा ते शारीरिक आणि मानसिक परिपक्वतेकडे (Maturity) वाटचाल करत असतात. या वयात त्यांना लैंगिक शिक्षणाचे सखोल ज्ञान देणे सुरू केले जाऊ शकते.
२. दहा वर्षांखालील मुलांना काय शिकवावे?
अ. सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श (Good and Bad Touch)
या वयात मुलांना सुरक्षित (Good) आणि असुरक्षित (Bad) स्पर्श याबद्दल माहिती द्या. शरीराचा कोणताही स्पर्श, ज्यामुळे त्यांना अस्वस्थ किंवा भीतीदायक वाटेल, तो असुरक्षित स्पर्श आहे, हे त्यांना स्पष्टपणे सांगा. असुरक्षित स्पर्शाबद्दल त्यांनी न घाबरता किंवा न लाजता त्वरित पालकांना सांगितले पाहिजे, हे शिकवा.
ब. खासगी अवयवांचे संरक्षण (Private Parts and Privacy)
मुलांना त्यांच्या खासगी अवयवांची (Private Parts) माहिती द्या आणि त्यांना शिकवा की हे अवयव इतरांपासून कसे सुरक्षित ठेवायचे. खासगी अवयवांना कोणालाही स्पर्श करू न देणे आणि इतरांच्या खाजगी अवयवांना स्पर्श न करणे हे त्यांना लहानपणापासून शिकवा. प्रायव्हसीचे महत्त्व त्यांना समजावून सांगा.
क. भावना आणि शारीरिक बदल
मुलांच्या शरीरात होणारे बदल (Changes) नैसर्गिक आहेत, हे त्यांना सांगा आणि याबद्दल कोणतीही लाज किंवा गैरसमज बाळगण्याची गरज नाही, हे स्पष्ट करा. या वयात त्यांना शरीराची सुरक्षा आणि भावना समजून घेण्यावर मार्गदर्शन करा.
३. पालकांसाठी महत्त्वाच्या टिप्स
संवादाचे सोडू नका: मुलांना कोणत्याही विषयावर खुलून बोलण्याची मुभा द्या. त्यांना प्रश्न विचारण्याची आणि तुमच्याशी चर्चा करण्याची सवय लावा.
डिजिटल देखरेख: टीव्ही किंवा इंटरनेटवर दिसणाऱ्या अयोग्य कंटेंटवर (Inappropriate Content) पालकांनी लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीचे काही पाहात असल्यास ओरडण्यापेक्षा त्याचे धोके समजावून सांगणे गरजेचे आहे.
वयानुसार उत्तरे द्या: जर मुलांनी शरीरासंबंधित किंवा एखाद्या चुकीच्या कृतीबद्दल प्रश्न विचारला, तर तो टाळू नका. त्यांच्या जिज्ञासेनुसार आणि त्यांच्या वयाला शोभेल अशा भाषेत योग्य आणि खरे उत्तर द्या.
थोडक्यात काय? तर १० वर्षांखालील मुलांसाठी लैंगिक शिक्षण म्हणजे थेट शारीरिक संबंधांबद्दल बोलणे नाही, तर शरीराची सुरक्षा, आत्मसन्मान आणि प्रायव्हसी याबद्दल शिकवणे होय. योग्य वेळी योग्य माहिती देणे हे त्यांच्या मानसिक विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.
Web Summary : For children under 10, sex education should focus on safety, respect, and privacy. Teach good and bad touch, private parts protection, and understanding bodily changes. Open communication and digital monitoring are crucial for parents.
Web Summary : 10 साल से कम उम्र के बच्चों के लिए यौन शिक्षा सुरक्षा, सम्मान और गोपनीयता पर केंद्रित होनी चाहिए। अच्छा और बुरा स्पर्श, निजी अंगों की सुरक्षा और शारीरिक बदलावों को समझना सिखाएं। माता-पिता के लिए खुला संचार और डिजिटल निगरानी महत्वपूर्ण है।