सध्या आपल्याकडे मुलांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे काही अपवाद सोडले तर घरोघर असं चित्र दिसून येत आहे की बच्चे कंपनीचा घरामध्ये प्रचंड धुडगूस सुरू असतो. वाटेल तेव्हा उठणे, वाटेल तेव्हा झोपणे, हवं ते खेळणे आणि उन्हाळी सुट्टीचा आनंद घेणे यात ते दंग आहेत.. सगळा दिवस खेळण्यात, टीव्ही बघण्यात धमाल करण्यात जातो. आणि त्याउलट त्यांच्या पालकांना आणि विशेषत: आईला मात्र अख्खा दिवस मुलांच्या मागे पळावं लागतं. शिवाय मुलं घरी असल्यामुळे त्यांना सतत काही ना काही थोडंसं खायला हवं असतं. त्यामुळे आईचा कितीतरी वेळ स्वयंपाक घरात आणि उरलेला वेळ मुलांनी केलेला पसारा आवरण्यात जातो. असं आपल्याकडचं चित्र असताना तिकडे चीनमध्ये मात्र भलतंच चित्र दिसत आहे (What Is Reverse Parenting Trend In China?). तिथे म्हणे शाळेत जाणारी लहान मुलं घरकाम करत असून त्यांचे पालक मात्र आराम करत आहे.. चीनचा हा रिव्हर्स पॅरेण्टिंग ट्रेण्ड सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे..(children are busy in household chores and parents getting relax)
काय आहे reverse parenting ट्रेण्ड?
reverse parenting ट्रेण्ड म्हणजे मुलांनी आपले पालक जी करतात ती सगळी घरातली काम करायची आणि आई- वडिलांनी थोडा वेळ निवांत घालवायचा. असं म्हटलं जात आहे की हा ट्रेण्ड चायनामध्ये येण्यामागचं कारण म्हणजे युआन हा प्राथमिक शाळेतला विद्यार्थी.
फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडून कडक होते? १ सोपा उपाय- कणिक राहील मऊसूत, फ्रेश
युआन सोशल मीडियावर अतिशय ॲक्टीव्ह असून त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. तो नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता काही दिवसांपुर्वी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये तो दिवसभर काय काय करतो, हे दिसण्यासाठी त्याच्या आईने त्याच्या कपड्यांनाच कॅमेरा लावून दिला होता.
यामध्ये असं दिसलं की युआन सकाळी लवकर उठला आणि शेजारच्यांची काही पाळीव जनावरांना फिरायला घेऊन गेला. त्यानंतर काही घरातली कामं करून तो शाळेत गेला. त्यानंतर घरी आला. घरी आल्यानंतर आईला त्याने आज काय स्वयंपाक करायचा म्हणून विचारलं..
काही केलं तरी डोसा तव्याला चिकटून करपतो? करा बर्फाची जादू- डोसे होतील पातळ, कुरकुरीत
आईने सांगितलेले पदार्थ त्याने स्वत: तयार केले. स्वयंपाक झाल्यानंतर आईला जेवायला ये म्हणून हाक मारली.. त्यानंतर आईची वेगवेगळी कामं करून दिली. हा त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लहान मुलं त्याला फॉलो करत आहे. त्यामुळेच तर चीनमध्ये कधी लहान मुलं किराणा, भाजीपाला खरेदीसाठी गेलेली दिसतात तर काही मुलं स्वयंपाक करताना दिसतात.
या ट्रेण्डकडे काही लोक सकारात्मकतेने पाहात आहेत. मुलांना यातून जबाबदारीची जाणीव होते, पालक आपल्यासाठी काय काय करतात हे त्यांच्या लक्षात येतं असं काही लोकांचं म्हणणं आहे.. तर काही लोक मात्र यावर टिका करत आहेत. मुलांना जबाबदारी शिकविण्याचा हा योग्य मार्ग नाही, असं टिकाकारांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं कितपत योग्य आहे आणि आपल्याकडेही तो ट्रेण्ड यावा का?