lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > लेक रात्रभर जागवते, झोपच पूर्ण होत नाही कारण..! प्रियांका चोप्रा सांगते आई झाल्यानंतर बदललेलं झोपेचं चक्र

लेक रात्रभर जागवते, झोपच पूर्ण होत नाही कारण..! प्रियांका चोप्रा सांगते आई झाल्यानंतर बदललेलं झोपेचं चक्र

Priyanka Chopra reveals she would go to sleep at 10 in the morning before daughter Malti Marie’s birth, says now she is up by 7:30 am: ‘It’s tough’ : मालती आईसारखीच कॉन्फिडेण्ट; प्रियांकाने शेअर केल्या काही मालतीबद्दलच्या गोष्टी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2024 01:29 PM2024-04-30T13:29:37+5:302024-04-30T13:30:46+5:30

Priyanka Chopra reveals she would go to sleep at 10 in the morning before daughter Malti Marie’s birth, says now she is up by 7:30 am: ‘It’s tough’ : मालती आईसारखीच कॉन्फिडेण्ट; प्रियांकाने शेअर केल्या काही मालतीबद्दलच्या गोष्टी..

Priyanka Chopra reveals she would go to sleep at 10 in the morning before daughter Malti Marie’s birth, says now she is up by 7:30 am: ‘It’s tough’ | लेक रात्रभर जागवते, झोपच पूर्ण होत नाही कारण..! प्रियांका चोप्रा सांगते आई झाल्यानंतर बदललेलं झोपेचं चक्र

लेक रात्रभर जागवते, झोपच पूर्ण होत नाही कारण..! प्रियांका चोप्रा सांगते आई झाल्यानंतर बदललेलं झोपेचं चक्र

मातृत्व एका महिलेच्या आयुष्यात बरेच बदल आणते (Motherhood). कारण तिला तिच्यासोबत लहान जीवाची देखील काळजी घ्यावी लागते. नुकतंच इंटरनॅशनल देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) हिने तिच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. आणि हे बदल तिची मुलगी मालती मारीमुळे घडल्या आहेत. मुलीमुळे प्रियांकाचे झोपेचं चक्र बदललं असल्याचं ती सांगते.

शिवाय तिची मुलगी प्रियांकासारखीच सक्षम आणि धाडसी असल्याचं ती सांगते. 'माझी मुलगी, माझ्यासारखीच आहे.' असं ती एका पॉडकास्टमध्ये म्हणाली आहे(Priyanka Chopra reveals she would go to sleep at 10 in the morning before daughter Malti Marie’s birth, says now she is up by 7:30 am: ‘It’s tough’).

पॉडकास्ट रीड द रूमवर, तिने आपल्या मुलीबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. मालतीबद्दल प्रियांका म्हणाली 'काही मुलं अटेन्शन मिळाल्यानंतर घाबरतात. शिवाय काही प्रचंड लाजतात. पण मी माझ्या लहानपाणी कधीच घाबरली नव्हते. मी खूप कम्फरटेबल होती आणि आताही आहे. मला कॅमेरासमोर कधीही भीती वाटली नाही. किंवा दडपणही आलं नाही. तशीच माझी मुलगी मालती आहे. तिच्यात खूप कॉन्फिडेंस आहे. ज्याचा मला आनंद आहे. मला असे वाटते की, मी किशोरवयीन असताना माझे पालक, माझे कुटुंब आणि मित्रांनी मला सक्षम केले आहे.'

ब्रशने न घासताही टॉयलेट होईल चकाचक! १ एकदम सोपा उपाय; पिवळे डाग आणि दुर्गंधीही गायब

जेव्हा मुलाखतकाराने मुलगी मालती आणि मातृत्वाबद्दल विचारले, तेव्हा उत्तर देताना प्रियांका म्हणाली, 'मालतीमुळे मी पूर्वीसारखी झोपू शकत नाही. झोपताना मी जास्त सतर्क असते. त्यामुळे रडणे किंवा मालतीचा आवाज जरी आला तरी मला लगेच जाग येते. आणि हे खरंच माझ्यासाठी कठीण जात आहे. रात्रभर तर मी जागते, शिवाय सकाळी ७: ३० वाजता उठते. कारण ही मालतीची उठण्याची वेळ आहे. मग मी सकाळी १० वाजता झोपते.'

मुलींनी कितव्या वर्षी ब्रा वापरायला सुरुवात करावी? वयात येणाऱ्या मुलींसाठी योग्य ब्रा कशी निवडायची?

काही महिन्यांपूर्वी याच पॉडकास्टवर निक जोनासने देखील हजेरी लावली होती. तेव्हा पितृत्वाबद्दल विचारले असता, निक म्हणाला, 'तुम्हाला एकदा मूल झाल्यावर असे लक्षात येते की, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मालती जेव्हा आमच्या आयुष्यात आली, तेव्हा सुरुवातीचे २ महिने आमच्यासाठी कठीण गेले. पण संपूर्ण आयुष्य आपल्याला समजून गोष्टी करायच्या आहेत.'

Web Title: Priyanka Chopra reveals she would go to sleep at 10 in the morning before daughter Malti Marie’s birth, says now she is up by 7:30 am: ‘It’s tough’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.