Lokmat Sakhi >Parenting > पालकांनी या ८ गोष्टी जरा समजून घ्या.. नाही तर परीक्षा मुलांसाठी शिक्षा होऊन बसेल..

पालकांनी या ८ गोष्टी जरा समजून घ्या.. नाही तर परीक्षा मुलांसाठी शिक्षा होऊन बसेल..

Parents should understand these 8 things. Otherwise, exams will become a punishment for children : पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवा. पाल्याचे मानसिक आरोग्य चांगले राहील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2025 15:11 IST2025-02-16T15:10:06+5:302025-02-16T15:11:33+5:30

Parents should understand these 8 things. Otherwise, exams will become a punishment for children : पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवा. पाल्याचे मानसिक आरोग्य चांगले राहील.

Parents should understand these 8 things. Otherwise, exams will become a punishment for children. | पालकांनी या ८ गोष्टी जरा समजून घ्या.. नाही तर परीक्षा मुलांसाठी शिक्षा होऊन बसेल..

पालकांनी या ८ गोष्टी जरा समजून घ्या.. नाही तर परीक्षा मुलांसाठी शिक्षा होऊन बसेल..

स्वत:च्या परीक्षेत आलं नसेल एवढं टेंशन मुलांच्या परीक्षांवेळी पालक घेतात. फक्त टेंशन घेत नाहीत तर मुलांना देतातही. (Parents should understand these 8 things. Otherwise, exams will become a punishment for children.)पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ती नाजुक मन चिरडली जातात. तिथूनच कळत नकळत नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरवात होते. मुलांना मानसिक ताण येतो. त्याचं योग्य निर्मूलनही केलं जात नाही. अपयशाच्या भीतीने मुलं मग प्रयत्नच सोडून देतात. (Parents should understand these 8 things. Otherwise, exams will become a punishment for children.)मान्य आहे पालकांच्या भावना चांगल्याच असतात. पण मुलांच्या भावनांचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. पालकांनी काही गोष्टी पाल्यांशी बोलताना लक्षात ठेवायला हव्यात.

१. पाल्याची तुलना इतर मुलांशी करू नका. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. तुलनेमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. ते स्वत:ला कमी लेखायला लागतात. (Parents should understand these 8 things. Otherwise, exams will become a punishment for children.)      

२. त्यांना न येणार्‍या विषयांवरून सतत ऐकवू नका. त्यांना ते समजावण्यासाठी मार्ग शोधा. ज्या विषयात ते चांगले आहेत, त्याचे कौतुक करा. त्याच्या गुणांबद्दल त्यांना जाणीव करून द्या.

३. त्यांच्या झोपेची नीट काळजी घ्या. एक दिनचर्या आखून घ्या. परीक्षा संपेपर्यंत ती पाळा. अतिरेक कोणत्याही गोष्टीचा चांगला नाही. अगदी अभ्यासाचाही. 

४. तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नका. मुलांना स्वत:हून चांगले मार्क मिळवण्याची इच्छा निर्माण होईल. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेला  अभ्यास भीतीपोटी केलेला असेल. ज्याला काहीच अर्थ नाही.

५. त्यांना सतत तुमच्या पाठिंब्याची जाणीव करून द्या. त्यांच्या यशात तसेच अपयशातही तुम्ही त्यांच्या बरोबर आहात, हे पालकांच्या वागण्यातून मुलांना जाणवणे गरजेचे आहे.    

६. त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या. पालक बरेचदा मुलांच्या समस्यांना नाटकं किंवा टाळाटाळ समजतात. आई-बाबा ऐकतचं नाहीत म्हणून मग मुलं त्याच्याशी संवाद साधणंच सोडून देतात. पालकांबद्दल गैरसमज त्यांच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे मुलांना परीक्षेत काय समस्या येतात ते ऐकून घ्या. 

७. परीक्षेच्या दिवसांत पालक मुलांना आवडीचे अरबट चरबट खायला देतात. जेणेकरून ते अभ्यास करतील. तसे न करता, पाल्याच्या आहाराची काळजी घ्या. आजरपण येणार नाही असेच पदार्थ खायला द्या. 

८. मुलांना लालसा दाखवून मार्क मिळवायला सांगू नका. ९० टक्के मिळवलेस तर सायकल घेईन या प्रकारच्या कृती पालक करतात. जे अत्यंत चुकीचे आहे. मुलांकडून कधीच लालसेपोटी अभ्यास करुन घेऊ नये.

या काही गोष्टी आहेत ज्या पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आजकाल मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. पिढी बदलली की पालनपोषणाची पद्धतही बदलते. त्यानुसारच पालकांना वागायला हवे. मुलांना मानसिक शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या. लक्षात ठेवा की, परीक्षा हा आयुष्यातला अत्यंत गरजेचा भाग आहे. पण तो भागच आहे अख्ख आयुष्य नाही.

Web Title: Parents should understand these 8 things. Otherwise, exams will become a punishment for children.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.