हल्ली प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे मुलांना त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे साहजिकच त्यांचा अभ्यासावरचा फोकसही वाढला पाहिजे. पण हल्ली मुलांनी फक्त अभ्यास एके अभ्यासच केला पाहिजे असा कित्येक पालकांचा आग्रह असतो. यामुळे निश्चितच तुमची मुलं परीक्षेत उत्तम गुणांनी पास होतील. त्यांचे करिअर उत्तम घडेल. पण एक व्यक्ती म्हणून आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना ते कितपत तोंड देऊ शकतील, याबाबत शंकाच असेल. म्हणूनच मुलांना अभ्यासाची शिस्त तर लावाच, पण त्यासोबतच इतरही काही गोष्टी अवश्य शिकवा.. कारण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्या गोष्टी त्यांना निश्चितच उपयोगी पडतील. त्या नेमक्या कोणत्या ते पाहूया...(parents must teach 4 things to their kids to make them successful in life)
मुलांना अभ्यासासोबतच 'या' गोष्टी शिकवायला विसरू नका
१. आत्मविश्वास
मुलांना स्वत:बाबत, स्वत:च्या क्षमतांबाबत आत्मविश्वास असायलाच हवा. तो नसला तर आयुष्यातल्या कित्येक चांगल्या संधी चुकू शकतात. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होईल असं काही बोलू नका किंवा करू नका. आत्मविश्वास असेल तर ते कुठेही यशस्वी होतील.
चेहरा खूप काळवंडला- आजारी असल्यासारख्या निस्तेज दिसताय? २ उपाय- काही मिनिटांत चेहरा चमकेल
२. वेळेची किंमत
योग्य वेळी योग्य गोष्टी घडून आल्या तरच त्या गोष्टींची किंमत असते. त्यामुळे मुलांना वेळेची किंमत शिकवा. वेळेचे महत्त्व समजावून सांगा आणि वेळ पाळायला शिकवा.
३. समोरच्या व्यक्तींची किंमत करणे
केवळ स्वत:ला महत्त्व देऊन उपयोग नाही. आयुष्यात माणसं जोडायची असतील, जपायची असतील तर समोरच्या व्यक्तीला किंमत देणंही खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या समोरची व्यक्ती वयाने, पैशाने, मानाने मोठी असो किंवा लहान असो त्या व्यक्तीचा आदर ठेवायला मुलांना शिकवा.
नवरात्रीमध्ये साडी नेसल्यावर गळ्यात हवंच ठसठशीत लांब मंगळसूत्र! बघा ९ लेटेस्ट सुंदर डिझाईन्स...
४. सकारात्मकता
या गोष्टीला आयुष्यात खूप महत्त्व आहे. जी व्यक्ती सकारात्मक असते ती नेहमी आयुष्यातल्या कठीण प्रसंगातूनही काहीतरी चांगलं शोधून काढते, पुढे जाते आणि आनंदी असते. त्यामुळे मुलांच्या मनातून निगेटीव्ह विचार काढून टाकायला मदत करा. त्यांना सकारात्मक राहायला शिकवा.