Join us
Daily Top 2Weekly Top 5

जपानी मुलं इतकी शांत आणि हूशार का असतात? ६ पॅरेंटींग सिक्रेट्स, तुमची मुलंही गुणी होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 20:11 IST

Parenting Tips : त्यांनी आपल्या 'द जॅपनीज वे ऑफ पॅरेटिंग'  या पुस्तकात जपानी मुलांचे सिक्रेट्स आणि सिद्धांतांबाबत अधिक माहिती दिली आहे.

जपानी मुलं इतकी शिस्तबद्ध, शांत का असतात असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. जपानी कुटूंबाचे पूर्ण लक्ष 'अनकंडीशनल लव्ह' आणि 'कम्युनिटी बॉन्डींगवर' असते.  प्रसिद्ध लेखिका लिसा कातायाम  सांगतात की जपानी मुलं फक्त संस्कारी आणि एकमेकांचा सन्मान करणारे नसतात तर क्रिएटिव्हसुद्धा असतात. त्यांनी आपल्या 'द जॅपनीज वे ऑफ पॅरेटिंग'  या पुस्तकात जपानी मुलांचे सिक्रेट्स आणि सिद्धांतांबाबत अधिक माहिती दिली आहे. (Japani Parenting Tips To Raise Calm And Respectful Kids)

१) अभिवादन

 जपानी मुलं  खूप सन्मानानं 'ओहायो गोजाइमासू' म्हणजेच शुभ सकाळ असं म्हणतात. जेव्हा मुलं मोठ्यांना एकमेकांचा सन्मान करताना पाहतात. तेव्हा ते स्वत:हून विनम्रता शिकतात. 

२) आपला सामान स्वत: ठेवणं

 जपानी आई वडील आपल्या मुलांना त्यांनी पसरवून  ठेवलेल्या वस्तू स्वत: उचलून ठेवण्याचा सल्ला देतात. मुलांना शिकवलं जातं की कुटूंबाप्रती त्यांचीही काही जबाबदारी आहे. साफसफाई करताना ते कोणतंही गाणं लावू शकतात किंवा साफ-सफाईचे साहित्य घेऊ शकतात. 

३) प्रत्येक वस्तूत जीव असतो

जपानी लोक असे मानतात की प्रत्येक निर्जीव गोष्टीतही जीव असतो. मुलांना ते शिकवतात की, आपल्या पुस्तकांपासून, कपड्यांपर्यंत सर्वच गोष्टींना सन्मान द्या. जेव्हा मुलं आपल्या सामानाची कदर करतात तेव्हाच ते पुढे जाऊन संवेदनशील बनतात.

४) इतरांना सन्मान देणं

जपानी शाळांमध्ये मुलांना शिकवलं जातं की त्यांना स्वत:च्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होतो. घरात कोणतंही भांडण झाल्यानंतर मुलांना विचारा की तुम्हाला काय वाटतं, हे प्रश्न त्यांच्या मनात सहानुभूती निर्माण करतात.

 ५) दोजो 

दोजो म्हणजे हे घ्या.  जपानी मुलांना आपल्या आवडीच्या गोष्टी इतरांना द्यायला शिकवले जाते.  मुलं आपली आवडीची गोष्टी इतरांना देतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो.

६) एकावेळी एकच काम

आजकालचे आई वडील खूपच घाईत असतात. जपानी संस्कृतीत हळू चालणं आणि लक्ष पूर्वक काम करण्यावर भर दिला जातो. चहा करणं असो की पूर्ण जेवण करणं.  एखादं काम लक्षपूर्वक मन लावून केलं तर मुलांमध्ये एकाग्रता वाढते.

English
हिंदी सारांश
Web Title : Japanese parenting secrets: Raise calm, respectful, and happy children.

Web Summary : Japanese parenting emphasizes respect, community, and responsibility. Kids learn politeness, tidiness, and empathy. Sharing, mindfulness, and valuing possessions are also key. These principles foster considerate and focused children.
टॅग्स :पालकत्वलहान मुलं