lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > मुलं खूप हट्टीपणा करतात? रागाच्या भरात पालकांनी टाळायला हव्या ४ गोष्टी, मुलांना चूक कळेल, शिस्तीत वागतील

मुलं खूप हट्टीपणा करतात? रागाच्या भरात पालकांनी टाळायला हव्या ४ गोष्टी, मुलांना चूक कळेल, शिस्तीत वागतील

Parenting Tips How To deal With An Angry Child : आई वडील मुलांना राग आल्यानंतर त्यांना समजावण्याऐवजी स्वत:वरचे नियंत्रण विसरून मुलांवर रागवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:31 PM2024-04-22T16:31:55+5:302024-04-22T18:50:11+5:30

Parenting Tips How To deal With An Angry Child : आई वडील मुलांना राग आल्यानंतर त्यांना समजावण्याऐवजी स्वत:वरचे नियंत्रण विसरून मुलांवर रागवतात.

Parenting Tips How To deal With An Angry Child Never Do These Parenting Mistakes | मुलं खूप हट्टीपणा करतात? रागाच्या भरात पालकांनी टाळायला हव्या ४ गोष्टी, मुलांना चूक कळेल, शिस्तीत वागतील

मुलं खूप हट्टीपणा करतात? रागाच्या भरात पालकांनी टाळायला हव्या ४ गोष्टी, मुलांना चूक कळेल, शिस्तीत वागतील

पालक म्हणून भूमिका निभावत असताना मुलांवर प्रेम करणं तर कधी  त्यांचा राग येणं हे सुरूच राहते. प्रेमाबरोबरच नाराज होणं हा एक महत्वाचा भाग आहे. ज्यामुळे लोक एकमेकांशी कनेक्टेड राहतात. मुलं रागात असतील तर त्याच्याशी कसं वागावं हे वेळीच लक्षात यायला हवं. (Parenting Tips How To deal With An Angry Child)

आई वडील मुलांना राग आल्यानंतर त्यांना समजावण्याऐवजी स्वत:वरचे नियंत्रण विसरून मुलांवर रागवतात.  पण तुम्हाला जर मुलांमध्ये सकारात्मक  बदल हवे असतील  किंवा इमोशनल कंट्रोलसाठी तुम्ही पॉझिटिव्ह पद्धत शोधू शकता. मुलांना चांगले वाटेल असे काहीतरी बोला. (Never Do These Parenting Mistakes)

1) जर तुमचे मूल रागावत असेल आणि ओरडत असेल तर त्याला शिस्त लावण्याची ही वेळ नाही. या परिस्थितीत तुम्ही त्याला काही बोलाल तर त्याचा परिणाम सकारात्मक होणार नाही. तुम्ही त्याला काही सांत्वनदायक गोष्टी सांगितल्या तर बरे होईल. उदाहरणार्थ, बेटा, तू अस्वस्थ दिसतोस किंवा मला तुझ्या रागाचे कारण समजू शकते का इ.

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

2) ParentCircle च्या मते, मुलाच्या रागाकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तो येऊन तुमची माफी मागेल अशी तुमची अपेक्षा असेल तर ही पद्धत योग्य नाही. समजून घ्या की कठीण काळात मुलाला त्याच्या भावना समजून घेण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी फक्त तुमच्या समर्थनाची गरज आहे.

३) बरेच पालक मुलाच्या समस्या ऐकू इच्छित नाहीत आणि न ऐकता निष्कर्षापर्यंत उडी मारतात. ही पद्धत चुकीची आहे. तो जे काही बोलतो ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकले आणि समस्या काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास ते चांगले होईल. जर तो तुम्हाला सर्व काही सांगू शकत नसेल, तर त्याला तो पर्याय द्या ज्याच्याशी तो त्याच्या समस्या सांगू शकेल. अशा प्रकारे तुमच्यामध्ये अंतर राहणार नाही आणि समस्या दूर होईल.

४) लहान मुलांना राग आल्यावर शिक्षा देण्यावर तुमचा विश्वास असेल, तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. असे केल्याने मुलाच्या मनात राग भरेल आणि तो नक्कीच कुठेतरी फुटेल. मुलाच्या मनात नकारात्मक विचार येतील आणि हळूहळू तो चुकीच्या सवयी लागतील.

Web Title: Parenting Tips How To deal With An Angry Child Never Do These Parenting Mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.