lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > मुले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुधा मूर्ती सांगतात ८ गोष्टी, पालकांनी एवढे करायला हवेच..

मुले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुधा मूर्ती सांगतात ८ गोष्टी, पालकांनी एवढे करायला हवेच..

Parenting Tips By Sudha Murthy For New Age Parents : रोजच्या जीवनात या पॅरेटींग टिप्स फॉलो केल्यास मुलं आणि आई-वडीलांचे बॉन्डींग चांगले होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:07 PM2024-02-21T12:07:00+5:302024-02-21T12:24:23+5:30

Parenting Tips By Sudha Murthy For New Age Parents : रोजच्या जीवनात या पॅरेटींग टिप्स फॉलो केल्यास मुलं आणि आई-वडीलांचे बॉन्डींग चांगले होईल.

Parenting Tips By Sudha Murthy For New Age Parents : Top 8 Parenting Advices From Sudha Murthy | मुले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुधा मूर्ती सांगतात ८ गोष्टी, पालकांनी एवढे करायला हवेच..

मुले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुधा मूर्ती सांगतात ८ गोष्टी, पालकांनी एवढे करायला हवेच..

आई बाबा होणं हे एखाद्या मोठ्या जबाबदारीप्रमाणे असते. मुलांना सांभाळणं म्हणजे काही खायचे काम नाही. मुलं लहानापासून मोठे होईपर्यंत त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे, प्रत्येक कृतीकडे लक्ष द्यावे लागते तेव्हा तेव्हा कुठे भविष्यात ते उत्तम कामगिरी करतात. (Parenting Tips By Sudha Murthy For New Age Parents) अनेकदा पालक आणि मुलांमध्ये गैरसमज होतात, मुलांना समजवण्यात पालकांचे पूर्ण आयुष्य निघून जाते.  सूधा मूर्ती यांनी पालकांना महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. (Top 8 Parenting Advices From Sudha Murthy) रोजच्या जीवनात या या पॅरेटींग टिप्स फॉलो केल्यास मुलं आणि आई-वडीलांचे बॉन्डींग चांगले होईल. (Parenting Tips)

1) आपली स्वप्न मुलांवर लादू नका

ही सामान्य चूक सगळेच पालक करतात. ते म्हणजे मुलांनी भविष्यात काय करावं हे  आधीच ठरवतात. आई वडिलांनी आपल्या मुलांवर स्वप्नांचे ओझं टाकण्यापेक्षा त्यांच्या आवडीनिवडी समजून घेऊन भविष्यातील निर्णय घ्यायला हवा. 

2) जास्त पैश्यांमुळे कोणीही ग्रेट बनत नाही

एकदा फाईव्ह स्टार हॉटेलमधून मित्राच्या बर्थडे पार्टीतून आल्यानंतर सुधा मूर्ती यांचा मुलगा त्याच्या मित्रांना  पार्टी देण्याची  जिद्द करू लागला.  तेव्हा त्यांनी आपल्या मुलांशी दीर्घ चर्चा केली आणि त्याला समजावले की पार्टीवर इतके पैसे खर्च करण्यापेक्षा अशा व्यक्तीची मदत करायला हवी ज्यांना या गोष्टींची सगळ्यात जास्त गरज आहे.

3) काही गोष्टींसाठी उशीरा करण्यापेक्षा न केलेल्याच बऱ्या असतात

सुधा सांगतात की आई वडीलांनी नेहमी मुलं जे काही मागत आहेत त्यावर विचार करायला हवा. मुलं जे काही मागत आहे जे गरजेचं आहे की नाही यावर सविस्तर विचार करायला हवा.  मुलांना समजवायला हवं की मुलं जे काही मागत आहेत त्याची वॅल्यू किती आहे. 

4) मुलांना गॅजेट्सऐवजी पुस्तकं द्या

सुधा मूर्ती सांगतात की मुलांना अनेकदा  गॅजेट्स वापरण्याचं व्यसन लागतं. अशावेळी तुम्ही मुलांना  कमीत वयातच पुस्तकं वाचून दाखवा. मुलांना इतर मुलांच्यात राहण्याचा सल्ला द्या. घरात सतत राहिल्यामुळे मुलांमध्ये एकटेपणा येऊ शकतो. 

5) मुलांना इतरांचा सन्मान करायला शिकवा

सुधा मूर्ती सांगतात की कुटुंबातील व्यक्ती असो किंवा ड्रायव्हर प्रत्येकाशी प्रेमाने आनंदानेच बोलायला हवं. फक्त मोठेच नाही तर आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींचा पण सन्मान करायला हवा. 

6) आई-वडील जे काही करतात त्याचा परिणाम मुलांवर होतो

सुरूवातीला मुलं आई वडीलांच्या सानिध्यात जास्तवेळ असता.. पालकांच्या वागण्याचा परिणाम त्यांच्यावर दिसून येत असतो. म्हणून ज्या गोष्टींचे अनुकरण मुलांनी केलेलं तुम्हाला चालेल अशाच गोष्टी करा. 

दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

7) प्रत्येक मुलाची इतरांशी तुलना करू नका

मुलांची  स्ट्रेथ आणि  वीक पॉईन्ट दोन्ही असते. यासाठी मुलांची इतरांबरोबर तुलना करू नका.  ज्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. 

मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात? न ओरडता 'अशी' करून घ्या परिक्षेची तयारी, चांगले मार्क्स मिळवतील मुलं

8) रचनात्मक गोष्टींवर मुलांशी बोला

मुलांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर  दिवसभर त्यांच्याशी आवडी-निवडी, त्यांच्या मूड स्विंग्सबद्दल बोला, त्यांना ऐकण्याचा समजण्याचा प्रयत्न करा. 

Web Title: Parenting Tips By Sudha Murthy For New Age Parents : Top 8 Parenting Advices From Sudha Murthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.