Lokmat Sakhi >Parenting > वडिलांबरोबर संध्याकाळीच जेवून घेते लेक वामिका; अनुष्का शर्मानं सांगितल्या खास पेरेंटींग टिप्स

वडिलांबरोबर संध्याकाळीच जेवून घेते लेक वामिका; अनुष्का शर्मानं सांगितल्या खास पेरेंटींग टिप्स

Anushka Sharma Parenting Tips : अनुष्कानं आई बनल्यानंतर विरोट कोहोलीसोबत पॅरेंटीग प्रेशरबाबत मन मोकळेपणानं चर्चा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 03:23 PM2024-09-17T15:23:02+5:302024-09-17T21:33:13+5:30

Anushka Sharma Parenting Tips : अनुष्कानं आई बनल्यानंतर विरोट कोहोलीसोबत पॅरेंटीग प्रेशरबाबत मन मोकळेपणानं चर्चा केली आहे.

Parenting Tips Anushka Sharma Opens Up First Time On Parenting With Husband Virat Koholi Watch Video | वडिलांबरोबर संध्याकाळीच जेवून घेते लेक वामिका; अनुष्का शर्मानं सांगितल्या खास पेरेंटींग टिप्स

वडिलांबरोबर संध्याकाळीच जेवून घेते लेक वामिका; अनुष्का शर्मानं सांगितल्या खास पेरेंटींग टिप्स

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बऱ्याच दिवसांनंतर मुंबईत दिसून आली.  आपल्या लेकीच्या जन्मापासून विराट (Virat Kohli) आणि अनुष्का लंडनमध्ये राहत आहेत.  ते दोघेही लंडनमध्ये कायमचे शिफ्ट झाले आहेत. अनुष्काने जेव्हापासून आपला दुसरा मुलगा अकायला जन्म दिला तेव्हापासून ती पब्लिक इव्हेंट्समध्ये कमीत कमी दिसून आली. मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्कानं पॅरेंटींगवर भाष्य केले आहे. (Parenting Tips Anushka Sharma Opens Up First Time On Parenting With Husband Virat Koholi  Watch Video)

तिनं सांगितलं की तिच्या लेकीमुळे तिची झोप आणि नियम चांगले झाले आहेत. कारण अनुष्का विराटसोबतच त्यांची लेक सुर्य मावळण्याआधीच रात्रीचं जेवण करून घेते. अनुष्कानं आई बनल्यानंतर विरोट कोहोलीसोबत पॅरेंटीग प्रेशरबाबत मन मोकळेपणानं चर्चा केली आहे. (Parenting Tips Anushka Sharma Opens Up First Time On Parenting With Husband Virat Koholi  Watch Video)

अनुष्कानं सांगितले की, परफेक्ट आई-वडील होण्याच बरंच प्रेशर त्यांच्यावर असतं. पण हे समजून घ्यायला हवं की  आपण परफेक्ट नाही आणि यात चुकीचं असं काहीच नाही. पुढे तिनं सांगितलं की असं असू शकतं की काही गोष्टींबाबत आम्ही तक्रार करू पण या गोष्टी मुलांसमोर सांगणं काहीच चुकीचं नाही.  कारण त्यांनाही माहिती असायला हवं की पालकही चुका करतात. आपल्या चुकांना मुलांसमोर ठेवणं आणि मान्य करणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे पालकांवरचा दबाव कमी होतो. 


अनुष्कानं हे सुद्धा सांगितले की आई झाल्यानंतर तिची सोशल लाईफ खूपच विकसित झाली. अनुष्का सांगते की मी अशाच लोकांसोबत हँगआऊट करते ते असं काही करतात पण असे लोक खूप कमी आहेत. हे सांगताच ती हसू लागली. अनुष्का सांगते की लोक जेव्हा आम्हाला रात्रीच्या जेवणाला बोलावतात तेव्हा मी सांगते  की, जेव्हा आम्ही जेवतो तो तुमचा स्नॅक्स टाईम असतो. अनुष्कानं या इव्हेंटमध्ये सांगितले की लेक वामिका संध्याकाळी ५:३० वाजताच जेवून घेते.

अनुष्का आणि विराट मुलांना समजावण्यापेक्षा त्यांना पाहून अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात. अभिनेत्रीनं सांगितले की, माझी मुलगी खूपच लहान आहे मी तिला काही शिकवू शकत नाही. या गोष्टी शिकायला हव्यात  की जसं आपण जगतो ते खूप महत्वाचे आहे. आपण पूर्ण  दिवसभरात कोणाचे आभार मानतो का, इथूनच आपली मुलं शिकतात. आपल्या आजूबाजूचे वातावरण अनुभवतात आणि हळूहळू तसेच बनतात.

Web Title: Parenting Tips Anushka Sharma Opens Up First Time On Parenting With Husband Virat Koholi Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.