Join us

कितीही मागे लागा-मुलं अभ्यासच करत नाहीत? न ओरडता करा ५ गोष्टी, मन लावून अभ्यास करतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:07 IST

Parenting Best Ways to Increase Child Memory : मुलांना प्रश्न विचारण्यासाठी मोटिव्हेट करा. जेव्हा मुलं प्रश्न विचारतील किंवा उत्तर देतील तेव्हा एक्टिव्ह राहून काम करा.

आजकाल कमी वयाच्या मुलांवर अभ्याासाची भरपूर जबाबदारी असते. जर तुमचं मुल अभ्यासात चांगले नसेल त्याला ओरडण्याऐवजी तुम्ही अभ्यास करण्याच्या पद्धतीत बदल करून मुलांना शिकवू शकतात. (Parenting Tips) खाणं-पिणं लाईफस्टाईल, घरातलं वातावरण मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते. (Mental Growth) काही गोष्टींची काळजी घेतल्यास मुलांची स्मरणशदक्ती वाढेल आणि   वाचलेलं सगळं लक्षात  ठेवतील. (Parenting Best Ways to Increase Child Memory)

मुलांची स्मरणशक्ती वाढवण्याच्या ५ पद्धती

१) मुलांना प्रश्न विचारू द्या 

ऑक्सफोर्ड लर्निंगच्या रिपोर्टनुसार तुम्ही मुलांना कोणतेही प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्या. मुलं जितके जास्त प्रश्न विचारतील तितकीच त्यांची जिज्ञासूवृत्ती दिसून येईल आणि उत्तरांच्या माध्यमातून त्यांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पोटभर चपाती खा-वजन भराभर घटेल; पाहा चपाती  खाण्याची योग्य पद्धत

२) प्रॅक्लिकली समजावून सांगा

मुलांना  पुस्तकांच्या तुलतेत प्रॅक्टिकल गोष्टी समजावून सांगा. मुलांना एज्युकेशनल ट्रिपवर घेऊन जा, जसं की म्युजियम, गॅलरी फिरायला घेऊन जा. त्यांना कोणताही गोष्टी पुस्तकातून समजावून सांगण्यापेक्षा प्रक्टिकली जास्त चांगली समजेल.

३) एक्टिव्ह लर्निंग 

मुलांना प्रश्न विचारण्यासाठी मोटिव्हेट करा.  जेव्हा मुलं प्रश्न विचारतील किंवा उत्तर देतील तेव्हा एक्टिव्ह राहून काम करा. ज्यामुळे गोष्टी सहज लक्षात राहतील. संगीताच्या मदतीने तुम्ही मुलांच्या मेंदूत सकारात्मक विचार भरू शकता. म्हणून मुलांना आपल्या स्टाईलमध्ये  गोष्टी शिकवा. त्यांना प्रोत्साहन द्या.

खूप चालता तरी शरीर जसंच्या तसंच? या ५ पद्धतीने चाला, भराभर वजन कमी होईल-मेंटेन दिसाल

४) मुलांना शिक्षक बनू द्या.

मुलांना कधी कधी टिचर बनू. जेव्हा ते शिक्षक बनून कोणत्याही विषयावर बोलतील तेव्हा त्यांची कॉन्सेप्ट लवकर क्लिअर होईल आणि कोणत्याही विषयावर त्याना रिव्हिजन करता येईल. त्यांना पुन्हा अभ्यास करण्यासाठी मोटिव्हेट करा.

५) संतुलित आहार घ्या

मुलांना पौष्टीक आणि संतुलित आहार देणे गरजेचं आहे. त्यांच्या आहारात बदाम, अक्रोड, ब्रोकोली, पालक, दूध, खायला द्या. मुलं वेळेवर जेवतात की नाही याकडे तुमचं लक्ष असायला हवं.  मुलांच डोकं व्यवस्थित चालण्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणं फार महत्वाचे आहे. म्हणूनच मुलांची ८ ते १० तास झोप होत आहे याची काळजी घ्या. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं