Join us  

मुलं खूप यशस्वी व्हावीत असं वाटतं? सुधा मूर्ती सांगतात ५ टिप्स; मुलं होतील गुणी आणि यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 12:15 PM

Parenting Advice From Sudha Murthy : सुधा मूर्ती सांगतात माणसाने शिकणं कधीच सोडू नये. आयुष्यात नेहमीच नवनवीन गोष्टी होत होतात.

समाज सेविका आणि लेखिका सुधा मुर्ती (Sudha Murthy) या मुलांना नेहमी प्रोत्साहीत करत असतात. सामाजिक मुद्द्यांवर लक्ष देण्यासाठी सुधा मूर्ती ओळखल्या जातात. (Sudha Murthy Quotes That Are Excellent Parenting Tips) शिक्षण आणि गावाचा विकास महिलांना पुढे जाण्यात योगदान देतात. संपूर्ण जीवनाची प्रेरणा मिळते. (Parenting Advice From Sudha Murthy) ज्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. सुधा मुर्ती यांनी मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. (Parenting Tips By Sudha Murthy)

कधीच आपल्या स्वप्नांना अर्धे सोडू नका (Unique Ideas On Parenting By Sudha Murthy)

सुधा मूर्ती सांगतात की जीवनात कधीच आपल्या स्वप्नांना अर्धवट सोडू नका. ते पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. मेहनत करत राहा आणि आपली स्वप्न पूर्ण करा. तुमच्या वागण्यातील हे बदल पाहून तुम्ही लहान मोठ्या गोष्टींना घाबरणं सोडाल. 

मांड्या-निंतब पसरट, जाड दिसतात? घरीच 5 सोपे व्यायाम करा, झटपट बारीक व्हाल-फिट दिसाल

नेहमी शिकत राहा

सुधा मूर्ती सांगतात माणसाने शिकणं कधीच सोडू नये. आयुष्यात नेहमीच नवनवीन गोष्टी होत होतात. टेक्नोलॉजीशी सोडून राहून नेहमीच स्वत:ला अप टू डेट ठेवण्याचा प्रयत्न करा. शिकल्यामुळे मुलांचा ब्रेन सजग राहील आणि तुम्ही कायम आनंदी राहाल. 

यशस्वी होण्याला घाबरू नका

सुधा मुर्ती सांगतात की अयशस्वी व्हायला कधीच घाबरू नका. अयशस्वी व्हायला कधीच घाबरू नका. तुम्ही तुमच्या अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत. अपयश हा यशाच्या मार्गाचा एक आवश्यक भाग आहे. मुलांनी त्यांच्या अपयशातून शिकले तर त्यांना आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

६२ व्या वर्षी तरूण-हॉट दिसणारा सुनिल शेट्टी खातो तरी काय? पाहा साधं-सोपं फिटनेस रूटीन

दुसऱ्याला महत्व द्या

सुधा मूर्ती सांगतात की फक्त आपल्याबद्दल विचार करणं योग्य नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात इतर लोकही राहतात. त्यांची कदर करणंही गरजेचं असतं. स्वत: पुरता विचार करणारे लोक कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून दुसऱ्याच्या भावनांची कदर करायला हवी.

 

मुलांना वाढत्या वयात जबाबदारी समजावणं गरजेचं असतं. त्यामुळेच ते चांगले डिसिजन मेकर बनू शकतात. याशिवाय  मुलांना शक्तींचा चांगला विकास होईल. मुलांशी नेहमी संवाद साधत राहा. मुलांना पैश्यांची वॅल्यू समजावून सांगा. मुलांना गरजेशिवाय पैसे देऊ नका. 

टॅग्स :पालकत्व