मुलांची शाळा म्हणजे पालकांची तारेवरची कसरतच असते. मुलांना शाळेत जाण्यासाठी अंथरुणातून उठवण्यापासून ते त्यांना तयारी करुन शाळेत पाठवण्यापर्यंत पालकांची अक्षरशः काहीवेळा दमछाक होते. मुलं देखील शाळेची तयारी करताना पालकांना अगदी भंडावून सोडतात यामुळेच अनेकदा (Never do these 5 things before sending your children to school) पालक - मुलांमध्ये भांडाभांडी, चीडचीड, रागराग होऊन वातावरण बिघडते. अनेकदा शाळेची तयारी करताना काही गोष्टी कळत-नकळतपणे घडतात, ज्याचा मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे मुलं शाळेत जाण्यासाठी उत्सुक नसतात, त्यांच्या मनात भीती निर्माण होते. हीच भीती काढून टाकण्यासाठी आणि मुलांमध्ये शाळेबद्दल आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे(5 things you should never do before sending children school).
मुलं शाळेत जाताना त्यांच्या दिवसाची सुरुवात घरातूनच होते आणि त्यांचा मूड, आत्मविश्वास, एकाग्रता या सगळ्यावर घरचं वातावरण मोठा परिणाम करतं. त्यामुळे सकाळी त्यांना तयार (things parents should not do before school) करताना किंवा शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांनी काही गोष्टी टाळणे खूप गरजेचं असतं. छोट्या छोट्या चुका मुलांच्या मनावर परिणाम करू शकतात आणि त्याचा त्यांच्या अभ्यासावर तसेच वागणुकीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जाणून घ्या, शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांनी कोणत्या गोष्टी करू नयेत...
मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी चुकूनही करु नका ५ गोष्टी...
१. मुलांवर आरडाओरड करणे :- सकाळी मुलांना झोपेतून शाळेत जाण्यासाठी उठवताना त्यांना आरडाओरडा करुन उठवू नये किंवा त्यांच्यावर प्रत्येक गोष्टीसाठी ओरडणे टाळावे. असे केल्याने त्यांचा पूर्ण दिवस खराब होऊ शकतो. मुलांना शांतपणे आणि हळूवारपणे उठवा आणि त्यांना चांगल्या मूडमध्ये शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करा. यामुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि चांगली होईल.
२. मुलांना रडवून शाळेत पाठवणे :- अनेकदा सकाळी मुलांना रागावल्यावर किंवा त्यांच्याशी ओरडून मोठ्या आवाजात बोलल्यावर मुलं रडू लागतात. पालकांना वाटतं की शाळेत न जाण्यासाठी हे त्यांचं एक नाटक आहे, म्हणून ते त्याला रडत असतानाच शाळेत पाठवतात. पण असं करू नये, कारण यामुळे मुलांचा पूर्ण दिवस खराब होतो.
३. मुलांना ओरडा देऊन शाळेत पाठवणे :- मुलांना ओरडा देऊन किंवा कठोर शब्द बोलून शाळेत पाठवू नये. पालकांची अशी इच्छा असते की मुलाने शाळेत जाऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, पण यासाठी त्याला कठोर बोलणे किंवा त्याच्या भावना दुखावतील अशा गोष्टी बोलणे योग्य नाही. मुलाला चांगल्या गोष्टी सांगून किंवा प्रेमाने समजावून शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करावा.
४. घरात घाई-गडबड करणे :- काहीवेळा पालक उशिरा उठतात आणि मुलांनाही उशिरा उठवतात, ज्यामुळे घरात घाई-गडबडीचे वातावरण तयार होते. यामुळे मुलाला नक्की काय होतंय हे समजत नाही आणि अनेकदा या घाई-गडबडीमुळे पालकचं स्वतः काय करु आणि काय नको अशा बिथरलेल्या अवस्थेत असतात त्यामुळे मुलं देखील गडबड - गोंधळून जातात. पालकांना अशा अवस्थेत पाहून मुलांना देखील अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे सकाळी उठल्या - उठल्या अशी घाई - गडबड करणे पालकांनी सर्वातआधी टाळावे.
गुडघेदुखीवर असरदार वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय! वेदना आणि सूज होते कमी-पाहा करायचे काय...
५. घाईघाईत नाश्ता करणे :- जर नाश्ता योग्य प्रकारे, वेळ देऊन आणि चावून-चावून खाल्ला नाही, तर लहान मुलांच्या पोटात बिघाड होऊ शकतो. जर मुलांना घाईघाईत नाश्ता करायला लावला, तर त्यांच्या पोटात गॅस होऊ शकतो, पोट दुखू शकते आणि ॲसिडिटी किंवा मळमळ अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, मुलांना वेळेवर उठवा आणि त्यांना आरामात नाश्ता करू द्या.