Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलं पाठदुखीने त्रस्त, त्यांना पाठदुखी जन्मभर छळण्याचा धोका, संशोधक म्हणतात हातातला स्मार्टफोन ठरतोय…

लहान मुलं पाठदुखीने त्रस्त, त्यांना पाठदुखी जन्मभर छळण्याचा धोका, संशोधक म्हणतात हातातला स्मार्टफोन ठरतोय…

Know How Using Smartphone More Than 3 Hours is Harmful for Teenagers : १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी काही महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2023 11:17 AM2023-06-18T11:17:34+5:302023-06-18T11:18:52+5:30

Know How Using Smartphone More Than 3 Hours is Harmful for Teenagers : १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी काही महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत.

Know How Using Smartphone More Than 3 Hours is Harmful for Teenagers : Small children are suffering from back pain, they are at risk of suffering from back pain for life, researchers say that the smartphone in hand is becoming... | लहान मुलं पाठदुखीने त्रस्त, त्यांना पाठदुखी जन्मभर छळण्याचा धोका, संशोधक म्हणतात हातातला स्मार्टफोन ठरतोय…

लहान मुलं पाठदुखीने त्रस्त, त्यांना पाठदुखी जन्मभर छळण्याचा धोका, संशोधक म्हणतात हातातला स्मार्टफोन ठरतोय…

लहान मुलं आणि स्मार्टफोन हे अगदी कुठेही गेलं तरी सर्रास दिसणारं चित्र. मुलांना रमवण्यासाठी, ते शांत बसावेत यासाठी पालक त्यांच्या हातात मोबाइल देतात. एखादवेळी मुलांना शांत करण्यासाठी दिलेला हा फोन नंतर पालकांसाठी डोकेदुखी ठरतो आणि मग मुलं काही केल्या ऐकत नाहीत यामुळे पालक खूप हैराण झालेले दिसतात. कोरोनानंतर शाळा, क्लासेस यामुळे मुलांच्या स्क्रीन टाइममध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ झाली. त्याशिवाय गेम्स खेळणे, व्हिडिओ पाहणे यांसारख्या गोष्टींमुळे स्क्रीनसमोर असण्याचा कालावधी वाढला. याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परीणाम झाल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले आहे (Know How Using Smartphone More Than 3 Hours is Harmful for Teenagers). 

(Image : Google)
(Image : Google)

एकदा मुलांना स्क्रीनची सवय लागली की त्यापासून त्यांना दूर करणे हे अतिशय अवघड काम होऊन जाते हे अनेक पालक अनुभवतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, जी मुले दिवसातून ३ तासापेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर असतात त्यांना पाठदुखीची समस्या उद्भवते. झोपून स्क्रीन पाहणे, पोटावर झोपणे, स्क्रीनच्या जवळ वाकून बसणे यामुळे ही समस्या उद्भवत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. थोरॅसिक स्पाइन वेदना म्हणजेच (Thorascic Spine Pain - TSP) असे या समस्येचे नाव आहे. ब्राझीलमधील काही संशोधकांनी १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी काही महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. 

(Image : Google)
(Image : Google)

TSP ही समस्या जगभरात विविध वयोगटांमध्ये सामान्य असली तरी या वयोगटातही त्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे आणि त्याचे महत्त्वाचे कारण हे स्क्रीन आहे असे या अभ्यासात म्हटले आहे. प्रौढ लोकांमध्ये ही समस्या उद्भवण्याचे प्रमाण १५ ते ३५ टक्के असून लहान मुले आणि किशोरवयीन मुले यांच्यात ते प्रमाण १३ ते ३५ टक्के इतके आहे. एकदा पाठदुखीसारखी समस्या मागे लागली की ती आयुष्यभरासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. अशी मुले अभ्यासात मागे पडतात, त्यांना मानसिक समस्या जास्त असतात. इतकेच नाही तर ही मुलं निष्क्रीय होण्याची शक्यता असते आणि त्यांच्या इतर शारीरिक, वर्तणूकीबद्दलच्या समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मुलांच्या विकासात अडथळा ठरणारा हा स्मार्टफोन जास्त प्रमाणात वापरल्यास नक्कीच घातक ठरतो. म्हणूनच मुलांना लहानपणापासूनच किती प्रमाणात स्क्रीन द्यायचा याचा पालकांनी योग्य तो विचार करायला हवा. 

Web Title: Know How Using Smartphone More Than 3 Hours is Harmful for Teenagers : Small children are suffering from back pain, they are at risk of suffering from back pain for life, researchers say that the smartphone in hand is becoming...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.