Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > बाहेरचं खाणं तर लांबच, तैमूर साधा केकही खात नाही! आई करीनाची शिस्त, लेकाचं डाएट कडक...

बाहेरचं खाणं तर लांबच, तैमूर साधा केकही खात नाही! आई करीनाची शिस्त, लेकाचं डाएट कडक...

Kareena Kapoor son Taimur diet plan : Taimur Ali Khan breakfast lunch dinner diet : करीना कपूर तैमूरच्या डाएटची काळजी कशी घेते? त्याचा ताटात असतात काही खास पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2026 11:04 IST2026-03-09T16:13:03+5:302026-03-10T11:04:59+5:30

Kareena Kapoor son Taimur diet plan : Taimur Ali Khan breakfast lunch dinner diet : करीना कपूर तैमूरच्या डाएटची काळजी कशी घेते? त्याचा ताटात असतात काही खास पदार्थ...

Kareena Kapoor son Taimur diet plan Taimur Ali Khan breakfast lunch dinner diet | बाहेरचं खाणं तर लांबच, तैमूर साधा केकही खात नाही! आई करीनाची शिस्त, लेकाचं डाएट कडक...

बाहेरचं खाणं तर लांबच, तैमूर साधा केकही खात नाही! आई करीनाची शिस्त, लेकाचं डाएट कडक...

"बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच करीना कपूर खान म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यांसमोर येती ती म्हणजे झिरो फिगर...बॉलिवूड मधील फिट अँड फाईन हिरोईन किंवा सुपरमॉम म्हणून बेबो प्रचंड फेमस आहेच...ती स्वतःच्या फिटनेससोबतच लेक तैमूर आणि जेहच्या आरोग्याची आणि फिटनेसची देखील तितक्याच बारकाईने काळजी घेताना दिसते. आई झाल्यानंतरही करीना आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक असताना दिसते. तैमूर आणि जेह काय खातो, त्याच्या आहारात कोणते पदार्थ असावेत याकडे ती नेहमीच विशेष लक्ष देते(Kareena Kapoor son Taimur diet plan).

स्टार किड असलं की हवं ते खायला मिळतं... असं अजिबात नाही तर, दोन्ही लोकांच्या  प्रत्येक खाण्यावर करीनाचा 'कडक पहारा' असतो. आपल्याला वाटतं की स्टार किड्स फक्त परदेशी फळं आणि महागडे एक्झॉटीक (Taimur Ali Khan breakfast lunch dinner diet) पदार्थ खात असतील, परंतु करीना कपूर खान हिने हा समज मोडीत काढून घरचे अन्नपदार्थच किंवा जेवणच बेस्ट असा नियमच केला आहे... 

 करीना कपूर तैमूरच्या डाएटची काळजी कशी घेते?

मुलांना हेल्दी खाऊ घालणं हे कोणत्याही आईसाठी जगातील सर्वात कठीण काम असतं, मग ती आई करीना कपूर का असेना! पण करीनाने तैमूरच्या बाबतीत एक नियम पक्का केलाय - 'नो जंक, ओन्ली हेल्थ'. साखर, मैदा आणि पॅकेज्ड फूडला 'बाय-बाय' म्हणत करीनाने तैमूरच्या आहारात नैसर्गिक पोषण देणारे अन्नपदार्थ खाऊ घालण्यावर अधिक जास्त भर दिला आहे. 

बॉलीवूडची 'बेबो' करीना कपूर खान तिच्या फिटनेससाठी जेवढी ओळखली जाते, तेवढीच ती मुलांच्या डाएटची देखील विशेष काळजी घेणारी आई म्हणूनही प्रसिद्ध आहे. विशेषतः तैमूरच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत ती कोणतीही तडजोड करत नाही. करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तैमूरचा एक ठरलेला डाएट चार्ट आहे, जो ती स्वतः फॉलो करते. एका मुलाखतीत तिने सांगितले की, तैमूरच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत ती प्रचंड 'पॅरानॉइड' असते, म्हणजेच ती प्रत्येक गोष्ट पारखून अगदी बारकाईने स्वतः लक्ष घालूंन मुलांच्या डाएट आणि फिटनेसचा विचार करते. करीना तैमूरला वर्षभर एकच प्रकारचे जेवण देत नाही. दर महिन्याला त्याच्या आहारात बदल केला जातो, जेणेकरून त्याला सर्व प्रकारची पोषणतत्वे मिळतील. करीना म्हणाली होती, "मी तैमूरचा डाएट प्लॅन दर महिन्याला बदलते. त्या विशिष्ट महिन्यात जी फळे आणि पालेभाज्या उपलब्ध असतात, म्हणजेच जे 'सीझनल' असते, तेच मी तैमूरला खायला देते. बाजारात मिळणारे 'ऑफ सीझन' पदार्थ आणण्यापेक्षा, त्या त्या काळात जे उपलब्ध आहे, त्यावरच बेबोचा भर असतो.

चांगली गोष्ट ही आहे की, तैमूर देखील त्याच्या या डाएटचा मनमुराद आनंद घेतो. करीना नेहमीच आरोग्यदायी, घरगुती आणि संतुलित आहारावर भर देत आली आहे. तैमूरचा डाएट आजही अतिशय शिस्तबद्ध आणि हेल्दी ठेवला जातो. करीना उन्हाळ्यात त्याला टरबूज, खरबूज आणि योग्य प्रमाणात आंबा यांसारखी पाणीदार फळे खायला देते. तर हिवाळ्यात संत्री, सफरचंद, पेरू आणि मोसंबी फळे देते. ती नेहमी स्थानिक (Local) आणि ताज्या भाज्यांनाच पसंती देते. यामध्ये पालक, ब्रोकोली, मेथी आणि गाजर यांसारख्या पोषक तत्त्वांनी भरपूर असलेल्या भाज्यांचा समावेश असतो.

वाटीभर दह्याची कमाल! खुंटलेल्या केसांची वाढ होईल दुप्पट वेगाने - करून पहावा असा  उपाय...

जिम - डाएट करूनही वजन कमीच होत नाही? मग स्वयंपाकाची ‘अशी’ रीत बदला, वजन घटायला लागेल झरझर...

करीना कपूर (Kareena Kapoor) तैमूरला बाहेरचे किंवा जंक फूड देणं पूर्णपणे टाळते. तैमूर बहुतांश वेळा घरचे बनवलेले ताजे अन्नचपदार्थच खातो. तैमूरच्या नाश्त्याची सुरुवात सिझनल ताजी फळे असलेल्या प्लेटने होते. यामध्ये केळी, पपई, सफरचंद आणि पेरू यांसारख्या चिरलेल्या फळांचा समावेश असतो. काहीवेळा वेगळं म्हणून त्याच्या नाश्त्यात इडली, डोसा, पोहा किंवा उपमा यांसारख्या पौष्टिक दाक्षिणात्य किंवा भारतीय पदार्थांचा समावेश केला जातो. तैमूरच्या (Taimur Ali Khan) मुख्य जेवणात अतिशय साधे पण पोषक पदार्थ असतात. यामध्ये खिचडी, डाळ-भात, चपाती-भाजी आणि दही यांचा समावेश असतो. शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणारे प्रोटीन तैमूरला डाळ, पनीर आणि अंड्यातून मिळते. जर जेवण मांसाहारी असेल, तर त्याला अतिशय हेल्दी पद्धतीने शिजवलेले चिकन किंवा मासे (मोजक्या प्रमाणात) दिले जातात.

एका स्टार किडने जंक फूडऐवजी काकडीची मागणी करणे, हे करीनाने त्याला लावलेल्या शिस्तीचे मोठे यश आहे. जर तैमूरला मधल्या वेळेत भूक लागली आणि त्याने स्नॅक्स मागितले, तर करीना त्याला चिप्स किंवा बिस्किटे देण्याऐवजी ताजी फळे, सुका मेवा (बदाम, मनुके) किंवा घरचा बनवलेला एखादा हेल्दी पदार्थ देते. आश्चर्याची आणि मजेशीर गोष्ट म्हणजे, तैमूर स्वतःहून जंक फूडऐवजी काकडी खायला मागतो.

करीनाने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ती तैमूरला बाहेरच्या जंक फूडपासून पूर्णपणे लांब ठेवते. इतकेच नाही तर, तैमूर जेव्हा आपल्या मित्रांच्या बर्थडे पार्टीला जातो, तेव्हा तो तिथेही बाहेरचे काहीच खात नाही. तो पार्टीत फक्त खेळण्यासाठी जातो, तिथे मिळणारा केक किंवा इतर पार्टी फूडला तो हातही लावत नाही.

Web Title : करीना की सख़्त डाइट से तैमूर जंक फ़ूड, केक से भी दूर!

Web Summary : करीना कपूर खान सुनिश्चित करती हैं कि उनके बेटे तैमूर जंक फूड और पैकेज्ड आइटम से परहेज करते हुए स्वस्थ आहार का पालन करें। वह संतुलित पोषण के लिए मौसमी, घर के बने भोजन पर ध्यान केंद्रित करती हैं, और मासिक रूप से उनका आहार बदलती हैं। तैमूर को यह स्वस्थ दिनचर्या पसंद है, यहां तक कि जंक फूड से ज्यादा खीरे पसंद करते हैं।

Web Title : Taimur avoids junk food, even cake, thanks to Kareena's strict diet.

Web Summary : Kareena Kapoor Khan ensures her son Taimur follows a healthy diet, avoiding junk food and packaged items. She focuses on seasonal, home-cooked meals, changing his diet monthly for balanced nutrition. Taimur enjoys this healthy routine, even preferring cucumbers over junk food.