Join us

मुलांना ‘किती’ पॉकेटमनी द्यावा? लक्षात ठेवा ५ टिप्स- मुलांनाही समजेल पैशाचं महत्त्व नीट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 14:36 IST

Is Your Child Misusing Their Pocket Money 5 Ways To Find Out Instantly : how to check kids spending pocket money : parenting tips for monitoring pocket money : how parents can control kids’ pocket money : Is your child misusing pocket money : मुलांच्या हातात पॉकेटमनी दिल्यावर, मुलं पैशांचा योग्य वापर करतात की नाही हे कसं ओळखाल...

घरातील मुलं साधारण कळत्या वयातील झाली किंवा त्यांना हिशोब करता येऊ लागला की पालक त्यांना पॉकेटमनी देतात. लहानपणापासूनच पैशांचे महत्त्व मुलांना कळावे आणि त्यांचा योग्य वापर शिकवण्यासाठी मुलांना पॉकेटमनी दिली जाते. खरंतरं, मुलांना पॉकेटमनी देण्याचे फायदे व तोटे दोन्ही आहेत. यामुळे मुले (Is Your Child Misusing Their Pocket Money 5 Ways To Find Out Instantly) स्वतःचे निर्णय स्वतः घेणे आणि आर्थिक नियोजन (how to check kids spending pocket money) करायला शिकतात. याउलट, काहीवेळा हातात वापरायला आयते पैसे (parenting tips for monitoring pocket money) आले की मुलं त्यांचा चुकीचा किंवा गैरवापर देखील करतात. अनेकदा मुले पॉकेटमनीचा चुकीचा वापर करतात, ज्यामुळे त्यांच्या सवयींवर आणि भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो(Is your child misusing pocket money).

मुलांना एकदा पॉकेटमनी दिल्यानंतर अनेकदा पालकांना ही काळजी असते की, मुले मिळालेल्या पॉकेटमनीचा योग्य वापर करत आहेत की नाहीत. मुलं अनावश्यक गोष्टींवर खर्च तर करत नाहीत ना, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. मुलांना गरजेला उपयोगी पडतील किंवा काही इमर्जंन्सी वेळी त्यांना कामी येतील म्हणून पालक मुलांना पॉकेटमनी देतात खरे, पण नंतर मनात अनेक प्रश्न उभे राहतात मुलं हे पैसे कुठे आणि कसे खर्च करत आहेत यावर लक्ष ठेवणं पालकांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. पालकांनी ( how parents can control kids’ pocket money) पॉकेटमनी म्हणून दिलेल्या पैशांचा योग्य वापर करायला मुलांना शिकवणे खूप महत्त्वाचे असते. पॉकेटमनी दिल्यानंतर मुलं पैशाचा योग्य वापर करत आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात. या काही टिप्सच्या मदतीने तुम्ही मुलांना आर्थिक शिस्त लावू शकता आणि त्यांच्या खर्चावर योग्य लक्ष ठेवू शकता.

मुलांना दिलेल्या पॉकेटमनीवर लक्ष ठेवण्यासाठी खास टिप्स... 

१. खर्चावर लक्ष ठेवा :- तुमच्या मुलांना वेळोवेळी विचारा की त्यांनी त्यांचा पॉकेटमनी कुठे आणि कसा खर्च केला. त्यांना एक छोटी डायरी बनवायला किंवा मोबाईल ॲपमध्ये त्यांच्या खर्चाची नोंद ठेवायला सांगा. जर तुमचे मूल खर्चाबद्दल सांगायला संकोच करत असेल किंवा योग्य उत्तर देत नसेल, तर याचा अर्थ तो काहीतरी लपवत आहे.

२. अचानकपणे वाढलेल्या मागणीकडे लक्ष द्या :- जर तुमचे मूल अचानक महागड्या गोष्टींची मागणी करू लागले, जसे की नवीन व्हिडिओ गेम, गॅजेट्स किंवा कपडे, तर हा एक संकेत असू शकतो. असे होऊ शकते की तो त्याच्या पॉकेटमनीसोबतच इतर कोणत्याही मार्गाने पैसे गोळा करत आहे. त्याला शांतपणे विचारा की त्याला या गोष्टींची गरज का लागत आहे आणि त्याच्याकडे त्या विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे आहेत का असे प्रश्न विचारुन मुलांकडून माहिती गोळा करा. 

३. मित्र-मैत्रिणीं आणि आवडीनिवडींवर लक्ष ठेवा :- मुले सहसा त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडून येणाऱ्या विशिष्ट सवयी किंवा गोष्टींकडे अधिक आकर्षित होतात. जर त्यांचे मित्र सिगारेट, दारू किंवा इतर कोणत्याही वाईट सवयींमध्ये गुंतलेले असतील, तर आपले मुलंही त्यांच्याप्रमाणे वाईट गोष्टींवर पॉकेटमनी खर्च करण्याची शक्यता असू शकते. याशिवाय, जर तुमच्या मुलाला अचानक अशा छंदांमध्ये रस वाटू लागला, ज्यावर खूप पैसे खर्च होतात, तर ही देखील चिंतेची बाब असू शकते.

४. ऑनलाइन व्यवहारांची तपासणी :- आजकाल अनेक मुले डिजिटल पेमेंटचा वापर करतात. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी बँक खाते उघडले असेल किंवा तो कोणत्याही ऑनलाइन पेमेंट ॲपचा वापर करत असेल, तर वेळोवेळी त्याच्या व्यवहारांची (transactions) तपासणी करा. यामुळे तो पैसे कुठे पाठवत आहे किंवा कोठून घेत आहे, हे तुम्हाला कळेल.

५. मुलांशी मोकळेपणाने बोला :- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या मुलांशी एक मोकळं आणि प्रामाणिक नातं निर्माण करा. त्याच्याशी पैशांच्या महत्त्वाबद्दल आणि योग्य ठिकाणी वापरण्याबद्दक किंवा पैसे खर्च करण्यावर स्पष्टपणे बोला. मुलांना सांगा की, पॉकेटमनी ही एक जबाबदारीची गोष्ट आहे, केवळ मजा-मस्तीसाठी नाही. जर तुम्हाला वाटले की मुलं पैशांचा चुकीचा वापर करत आहे, तर रागावण्याऐवजी त्याला प्रेमाने समजावून सांगा आणि योग्य मार्ग दाखवा.

या साध्यासोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही मुलांना लहान वयातच अधिक जबाबदार बनवू शकता आणि भविष्यात योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी त्याला तयार करू शकता.

टॅग्स :पालकत्वलहान मुलंपैसा