Lokmat Sakhi >Parenting > रोज रोज का अभ्यास करायचा? आईबाबा मुलांच्या अवघड प्रश्नाचे ‘हे’ सांगा उत्तर, त्यांना पटेल असे...

रोज रोज का अभ्यास करायचा? आईबाबा मुलांच्या अवघड प्रश्नाचे ‘हे’ सांगा उत्तर, त्यांना पटेल असे...

Importance of daily study : benefits of studying every day : smart study habits for students : how to stay consistent with study : daily revision benefits : मुलांना रोज अभ्यास करण्याचा कंटाळा येतो परंतु, दररोज अभ्यास करण्याचे महत्व असे पटवून द्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2025 22:05 IST2025-07-26T22:00:00+5:302025-07-26T22:05:01+5:30

Importance of daily study : benefits of studying every day : smart study habits for students : how to stay consistent with study : daily revision benefits : मुलांना रोज अभ्यास करण्याचा कंटाळा येतो परंतु, दररोज अभ्यास करण्याचे महत्व असे पटवून द्या...

Importance of daily study benefits of studying every day smart study habits for students how to stay consistent with study daily revision benefits | रोज रोज का अभ्यास करायचा? आईबाबा मुलांच्या अवघड प्रश्नाचे ‘हे’ सांगा उत्तर, त्यांना पटेल असे...

रोज रोज का अभ्यास करायचा? आईबाबा मुलांच्या अवघड प्रश्नाचे ‘हे’ सांगा उत्तर, त्यांना पटेल असे...

आई... "मला अभ्यासाचा कंटाळा आलाय गं," रोज काय अभ्यास करायचा, नंतर करु...असे काही कॉमन संवाद प्रत्येक घरोघरी ऐकायला मिळतात. सध्याच्या बदलत्या जगात आणि डिजिटल (Importance of daily study) युगात मुलांचं लक्ष अभ्यासावर टिकवणं हे प्रत्येक पालकांसाठी एक मोठं आव्हान (benefits of studying every day) बनलं आहे. मोबाईल, टीव्ही, गेम्स यांचं आकर्षण इतकं वाढलं आहे की रोज नियमित अभ्यास ही गोष्ट मुलांना बोअर आणि जबरदस्तीची वाटते. "अभ्यास नकोच वाटतो" असं मुलं नेहमी म्हणताना दिसतात. यातच अजून काय ती भर म्हणजे मुलांना क्लासेस, ट्युशन लावण्याचे फॅड (smart study habits for students) आल्याने परत त्याचा देखील अभ्यास करणं ओघाने आलंच.

सतत अभ्यास, गृहपाठ आणि परीक्षेचा तणाव यामुळे मुलांना शिक्षण नकोसं वाटू लागतं. यामुळे आजही कित्येक पालक मुलांना मारुन - धोपटून रोज थोडा तरी अभ्यास कर अशा विनवण्या देखील करताना दिसतात. पण खरं पाहिलं तर रोजचा थोडाफार अभ्यास करणं हे आवश्यकच आहे, हा अभ्यास फक्त शैक्षणिक प्रगतीसाठीच नाही, तर (how to stay consistent with study) आत्मविश्वास, शिस्त, आणि भविष्यातील स्पर्धेला सामोरं जाण्याची तयारी करण्यासाठीही खूप महत्त्वाचा असतोच. आजच्या पिढीत दररोज नित्यनियमाने थोडा तरी अभ्यास करण्याच्या सवयीचा अभावच आहे. परंतु रोज अभ्यास का करावा ? आणि केल्याने त्याचा फायदा नेमका (daily revision benefits) काय होतो हे डॉक्टर स्वाती गानू यांनी त्यांचा फेसबुक व्हिडिओच्या माध्यमांतून शेअर केले आहे.     

रोज अभ्यास का करावा ? 

१. डॉक्टर स्वाती गानू सांगतात, रोजचा अभ्यास हे नेमून दिलेलं टास्क नव्हे तर ती मुलांनी स्वतःला लावून घेण्याची एक सवय आहे. शाळेत अभ्यास करायला दिला आहे म्हणून करायचा असे न करता, दररोज आपण थोडा अभ्यास करण्याची सवय मुलांनी स्वतःहून लावून घेतली पाहिजे. 

२. रोजच्या अभ्यासाने ज्ञानात भर पडते, संकल्पना रुजतात, स्मरणशक्ती वाढते. रोज अभ्यास केल्याने विषय नीट लक्षात रहातो, व्यवस्थित समजतो आणि कायम लक्षात राहतो. यामुळे मुलांच्या संकल्पना पक्क्या होतात आणि परीक्षेच्यावेळी आत्मविश्वास वाढतो.

Parenting Tips : मुलांच्या ‘या’ ५ सवयी सांगतात त्यांची संगत चांगली आहे की वाईट! तज्ज्ञांचा सल्ला, ‘एवढं’ पाहा...

३. रोज अभ्यास केल्याने वेळेच्या व्यवस्थापनाची सवय लागते. नियमित अभ्यास केल्याने वेळेचे महत्त्व समजते आणि मुलं वेळेचा योग्य उपयोग करायला शिकतात. अभ्यास, खेळ आणि इतर गोष्टी यामध्ये समतोल राखण्याची कला त्यांना लवकरच अवगत होते.

४. परीक्षेची तयारी करण्यासाठी व उत्तम परफॉर्मन्ससाठी सातत्यपूर्ण अभ्यास उपयोगी ठरतो. रोजचा अभ्यास केल्यामुळे मुलांना परीक्षेच्या वेळी घाई होत नाही आणि आत्मविश्वास वाढतो. सातत्य ठेवल्यास पाठांतर अधिक पक्के होते आणि परीक्षेतील मार्कात मोठा फरक पडतो.

Kids School Lunch Box : मुलांच्या शाळेचा डबा : पोषण की अपाय? मुलांची खुरटते वाढ, पडतात कायमच आजारी...

५. रोज अभ्यास करताना जाणीवपूर्वक ठरवून वेळापत्रक आखल्याने सगळ्या विषयांना न्याय देता येतो. रोज अभ्यास करताना वेळेचं योग्य नियोजन केल्यास प्रत्येक विषयासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे कोणताही विषय दुर्लक्षित राहत नाही आणि तयारी संपूर्ण होते. 

६. रोजच्या अभ्यासासाठी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धती वापरता येऊ शकतात. उदा. पॉमोडोरो टेक्निक, एस क्यू ३ आर, फामन टेक्निक वापरता येईल. रोज त्याच त्याच पद्धतीने अभ्यास केला तर कंटाळा येऊ शकतो. म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याच्या पद्धतींचा उपयोग केल्यास लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. यामुळे अभ्यास अधिक प्रभावी होतो आणि स्मरणशक्तीही सुधारते.

७. भविष्यातील कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी रोज अभ्यास करण्याची सवय स्वतःला लावता येईल. रोज अभ्यास केल्याने ही सवय आपल्या अंगवळणी पडते. जी भविष्यातील यश, प्रगती, आणि स्वतःला पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरते.

Web Title: Importance of daily study benefits of studying every day smart study habits for students how to stay consistent with study daily revision benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.