Lokmat Sakhi >Parenting > मुलं लहान असताना बाबाने ५ गोष्टी केल्या तर मोठेपणी मुलं अभ्यासात होतात हुशार-आनंदी

मुलं लहान असताना बाबाने ५ गोष्टी केल्या तर मोठेपणी मुलं अभ्यासात होतात हुशार-आनंदी

Parenting Tips : मुलं स्मार्ट, व्हावीत असं वाटतं? प्रत्येक वडीलांनी कराव्यात 5 गोष्टी- शाळेत पहिला नंबर मिळवतील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:44 IST2025-08-11T19:30:36+5:302025-08-11T19:44:32+5:30

Parenting Tips : मुलं स्मार्ट, व्हावीत असं वाटतं? प्रत्येक वडीलांनी कराव्यात 5 गोष्टी- शाळेत पहिला नंबर मिळवतील मुलं

If fathers do 5 things when children are young, children become intelligent in studies when they grow up | मुलं लहान असताना बाबाने ५ गोष्टी केल्या तर मोठेपणी मुलं अभ्यासात होतात हुशार-आनंदी

मुलं लहान असताना बाबाने ५ गोष्टी केल्या तर मोठेपणी मुलं अभ्यासात होतात हुशार-आनंदी

आई वडीलांना बरीच मेहनत घ्यावी लागते आपल्या वर्तवणूकीत सुधारणा कराव्या लागतात तेव्हा मुलं चांगली शिकतात आणि एक्टिव्ह होतात. आई-बाबा केस वागतात, कसे बोलतात याचा मुलांवर थेट परीणाम होत असतो. मुलं लहान असताना तर वडीलांनी काही गोष्टी केल्या तर मोठे झाल्यानंतर मुलांच्या वागणूकीत चांगला परीणाम दिसून येईल याशिवाय मुलांचा शाळेतील परफॉर्मन्सही चांगला राहील. (If fathers do 5 things when children are young, children become intelligent in studies when they grow up)

युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स (University of Leeds) च्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात असे आढळले की, मुलं लहान असतानाच वडीलांनी वाचन, खेळ, गाणी म्हणणे किंवा चित्रकला अशा एक्टिव्हीजमध्ये मुलांसोबत सहभाग घेतला तर मुलांच्या शालेय जीवनात प्रगती झालेली दिसून येते. (Ref)

या संशोधनानुसार हा परिणाम घरची आर्थिक स्थिती, जात, लिंग किंवा वय यापैकी कोणत्याही घटकावर अवलंबून नव्हता. सर्वच गटातील मुलांना वडीलांच्या अशा पद्धतीनं सहभाग घेण्याचा फायदा झाला होता. या संशोधनात 5 हजार कुटूंबातील मुलं आणि त्यांच्या आई वडीलांचा समावेश होता.

शाळा सुरू होण्याआधीच्या काळात वडीलांनी मुलांसोबत अधिक वेळ घालवला तर पहिल्या वर्षात मुलांचा सक्रीय सहभाग दिसून येतो. मुलं चांगली एक्टिव्ह राहतात. पाच वर्षांपर्यंत वडिलांचा सहभाग जास्त असेल तर सातव्या वर्षी घेतल्या जाणाऱ्या Key Stage 1 चाचण्यांमध्ये, विशेषतः गणितात, चांगले निकाल दिसून येतात.

या संशोधनात असं दिसून आलं की, मुलगा असो किंवा मुलगी, श्रीमंत कुटुंबातील असो किंवा कमी उत्पन्न असलेले घर, सर्वच मुलांमध्ये चांगली प्रगती झाली होती. मुलांच्या जडण घडणीत आईचे योगदान महत्त्वाचे असले तरी वडिलांचा सहभाग ही तितकाच महत्वाचा आहे. मुलांशी वडीलांनी नियमित संवाद साधल्यानं मुलांचा बौध्दीक विकास वेगानं झाला. त्यांचे गैरवर्तन कमी होते मुलं चांगली वागू लागतात. मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

यातून असा निष्कर्ष निघतो की वडील कामावरून कितीही थकून आले असले, कामाच्या व्यापातून वेळ मिळत नसला तरी आपल्या मुलांसाठी वेळात वेळ काढून चर्चा करायला हवी. त्याचे मित्र बनून राहायला हवं तरच त्यांचा विकास  होतो. जी मुलं पालकांशी मनमोकळेपणानं बोलतात ती इतर मुलांच्या तुलनेत एक्टिव्ह असतात.

Web Title: If fathers do 5 things when children are young, children become intelligent in studies when they grow up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.