Lokmat Sakhi >Parenting > मुलांना ७ सवयी लावा, मुलांना पैशाची किंमत कळेल आणि पैसा वाढवायची युक्तीही समजेल

मुलांना ७ सवयी लावा, मुलांना पैशाची किंमत कळेल आणि पैसा वाढवायची युक्तीही समजेल

How To Teach Kids The Value Of Saving : पिगी बँकचा वापर करून मुलांना पैशांची बचत करायला शिकवणं हा अत्यंत मजेशीर आणि प्रभावी उपाय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 03:36 PM2024-07-02T15:36:34+5:302024-07-03T17:38:20+5:30

How To Teach Kids The Value Of Saving : पिगी बँकचा वापर करून मुलांना पैशांची बचत करायला शिकवणं हा अत्यंत मजेशीर आणि प्रभावी उपाय आहे.

How To Teach Kids The Value Of Saving : Useful Tips For Teaching Kids About Money | मुलांना ७ सवयी लावा, मुलांना पैशाची किंमत कळेल आणि पैसा वाढवायची युक्तीही समजेल

मुलांना ७ सवयी लावा, मुलांना पैशाची किंमत कळेल आणि पैसा वाढवायची युक्तीही समजेल

मुलांना बचतीचे महत्व शिकवणं फार महत्वाचे आहे. (Parenting Tips) हे एक महत्वपूर्ण कौशल्य आहे.  ते त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचे असते. तुम्ही जितक्या लवकर आपल्या मुलांना बचतीबाबत शिकवाल तितक्या लवकर मुलं जबाबदार बनवतील कारण त्यांना जबाबदारी आणि शिस्त या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. याशिवाय पैश्यांची किंमत आणि समजदारी या दोन्ही गोष्टी समजायला हव्यात. (Useful Tips For Teaching Kids About Money)

१) पिगी बँकचा वापर करून मुलांना पैश्यांची बचत करायला शिकवणं हा अत्यंत मजेशीर आणि प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे टार्गेट फिक्स करण्यास मदत होते. यामुळे मुलांना फक्त पैश्यांचे महत्व समजत नाही तर वित्तीय आधारही विकसित होतो. (How To Teach Kids The Value Of Saving)

२) मुलांसाठी बचतीबाबत सांगायचे झाले तर एक आर्थिक आधार विकसित होण्यास मदत होते. मुलांना भविष्यातही मदत होते.  या सवयी मुलांना भविष्यात आर्थिक अडचणी उद्भवण्यापासून रोखतात आणि सुरक्षेची भावना तयार होण्यास मदत होते. 

३) पैसे वाचवण्याची सवय मुलांमध्ये जबाबदारी आणि शिस्त तयार करते. ज्यामुळे मुलं विचार करून आर्थिक निर्णय घेतात.  त्यांना आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि मुलं खर्चाला प्राथमिकता देणं, सेल्फ कंट्रोल डेव्हलपमेंट करायला शिकतात.

थोडं काम केलं की थकवा जाणवतो? किचनमधले 5 पदार्थ रोज खा-हाडांना येईल ताकद-राहाल फिट

४) पैश्यांची योग्य समज ही जीवन जगण्याचे विशेष कौशल्य आहे. मुलांना आधुनिक दुनियातील कठीण स्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत होते. मुलांना बचत करायला शिकवल्याने टार्गेट फिक्स करण्यास, वित्तीय निर्णय स्वतंत्रपणे घेण्यास मदत होते. हे कौशल्य  त्यांना आयुष्यभर कामात येईल. ज्यामुळे ते प्रभावी पद्धतीने अनावश्यक पैसे खर्च करणं टाळतील.

५) मुलांना बचतीबाबत शिकवताना लोनचे फायदे तोटे समजावून सांगायला हवेत. यात अनेक प्रकारचे लोन, क्रेडीट कार्ड्स, पैसे उधार घेण्याच्या गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी त्यांना सुरूवातीपासूनच हळूहळू समजत गेल्या तर ते भविष्यात लोनच्या जाळ्यात अडकणार नाहीत.

६) मुलं आई वडिलांच्या वागण्यातून बऱ्याच गोष्टी शिकत असतात. स्वत:ला चांगल्या बचतीच्या सवयी लावा. ज्यामळे मुलांनाही ती शिस्त लागेल.  पैसे वाचवण्याचं कारण, फायनेंशियल टार्गेट वाचवण्यास मदत होते. 
बचतीबाबत शिकणं बोरिंग नसते. खेळ, एक्टिव्हीज, आव्हानांद्वारे मुलांना शिकवू शकता. मुलांनी छोटासा प्रयत्न केला तरी त्यांना सन्मानित करा.

वॉकिंग की रनिंग-पोटाची चरबी घटवण्यासाठी काय करायचं? व्यायामासाठी योग्य वेळ कोणती, पाहा 

७) मुलांना आपल्या गरजा आणि इच्छा यांतील फरक समजावून सांगात.  जीवंत राहण्यासाठी गरजेच्या असलेल्या गोष्टी  जसं की जेवण, कपडे, दुकान यासगळ्या  गोष्टी महत्वाच्या आहेत. गरजेपेक्षा जास्त प्राधान्य द्या आणि भविष्यातील  बचत  करण्याला  महत्व द्या.

Web Title: How To Teach Kids The Value Of Saving : Useful Tips For Teaching Kids About Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.