Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी ४ टिप्स, अभ्यासात मन लागेल आणि वाढेल आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:28 IST

Concentration Tips : भारतात लहान मुलं सरासरी साधारण ७ तास मोबाइल-इंटरनेटवर राहतात. त्यात जर घरातील वातावरण बिघडलेलं असेल तर ते अभ्यासावर तरी कसा फोकस करणार.

Concentration Tips :   पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणाविषयी नेहमीच चिंता लागलेली असते. त्यांना गुण चांगले मिळायला हवे, त्याना खेळांमध्ये आणि इतर अॅक्टिविटीमध्येही पुढे जाता यावं हे सु्द्धा विचार सतत मनात कल्लोळ करत असतात. बरेच पालक मुला-मुलींना पुढे जाता यावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात. त्यांना बाहेर क्लासेस लावतात. आई-वडील सतत मुलांच्या मागे अभ्यासासाठी लागलेले असतात. पण काही मुलांचं अभ्यासात अजिबात लक्ष नसतं.

महत्वाचा मुद्दा हा आहे की, यासाठी केवळ मुलंच जबाबदार नाहीत. पालकांच्याही काही चुका असतात. बरीच मुलं बराचवेळ फोनमध्ये डोकं घालून बसतात. त्यांची सवय सोडायची असेल तर आई-वडिलांनी सुद्धा हातचा फोन दूर ठेवावा लागेल. मुलांनी टीव्ही बघू नये असं वाटत असेल तर आई-वडिलांनी सुद्धा टीव्ही बघणं सोडलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे. घरातील वातावरण शांत ठेवलं पाहिजे. कारण अनेक एक्सपर्ट सांगतात की, मुलांचं अभ्यासात मन न लागण्याचं कारण वातावरण सुद्धा असतं.

एका रिपोर्टनुसार, भारतात लहान मुलं सरासरी साधारण ७ तास मोबाइल-इंटरनेटवर राहतात. त्यात जर घरातील वातावरण बिघडलेलं असेल तर ते अभ्यासावर तरी कसा फोकस करणार. त्यामुळे ठरवून काही गोष्टी केल्या पाहिजे, जेणेकरून त्यांची अभ्यासात रूची वाढेल, ते जास्त अभ्यासावर फोकस करू शकतील. अशात मुलांची एकाग्रता कशाप्रकारे वाढवता येईल हे बघुयात.

एकाग्रता कशी वाढवाल?

रोजचं रूटीन ठरवा

मुलांसाठी शिस्त खूप महत्वाची असते. जेव्हा त्यांना माहीत असतं की, कोणत्या वेळी काय करायचं आहे, तेव्हा ते त्या गोष्टीसाठी तयार असतात. झोपणं, झोपेतून उठणं, अभ्यास करणं आणि खेळण्याची एक वेळ फिक्स करा. किमान ८ ते १० तास झोप घ्यायला लावा. कारण थकवा गेला नाही तर त्यांची एकाग्रता वाढणार नाही.

मन विचलित होऊ देऊ नका

अभ्यास करत असताना फोकस वाढवण्यासाठी शांत वातावरण गरजेचं असतं. अभ्यासाच्या रूममध्ये टीव्ही किंवा कशाचाही आवाज असू नये. अभ्यास करत असताना फोन आणि टॅबलेट दूर ठेवा. मुलांचा स्टडी टेबल स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा.

माइंड गेम्स

खेळता खेळता एकाग्रता वाढवणं सगळ्यात चांगली पद्धत आहे. पझल्स, सूडोकू आणि चेससारखे खेळ खेळावे. ऑप्टिकल इल्यूजन सॉल्व्ह करायला सांगा. मेमरी कार्ड गेम्सने त्यांची स्मरणशक्ती अधिक वाढते.

मोठी कामं विभागून द्या

जर मुलांना एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा जास्त अभ्यास करायचा असेल तर ते दबावात येऊ शकतात. अशात त्यांचा फोकस राहत नाही. त्यामुळे मोठं काम छोट्या छोट्या भागात विभागून द्या. प्रत्येक काम केल्यानंतर त्यांचं कौतुक करायला विसरू नका.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy tips to boost kids' concentration, focus, and confidence.

Web Summary : Worried about your child's focus? Set routines, minimize distractions like phones and TV. Encourage mind games like puzzles and break down large tasks. A calm environment and praise boost concentration.
टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्स