Join us

मुलांना लिहिण्याचाच कंटाळा, अक्षर गचाळ? ५ टिप्स-सुंदर वळणदार अक्षरात मुलं लिहितील भरभर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:12 IST

How To Increase Writing Speed : लिखाणाचा वेग वाढवण्यासाठी ५ टिप्स तुमची मदत करू शकतात.

शालेय शिक्षण, परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो. अनेक मुलं वेळेच्या कमतरतेमुळे काही गोष्टी पूर्ण करू शकत नाहीत. याचं मुख्य कारण आहे लिखाणाचा वेग कमी असणं (How To Increase Writing Speed). लिखाणाचा वेग वाढवण्यासाठी ५ टिप्स तुमची मदत करू शकतात. मुलांचे हस्ताक्षर चांगले नाही, पटापट लिहत नाही, एक वाक्य लिहायला खूपच वेळ लागतो अशी अनेक पालकांची तक्रार असते. मुलांनी वळणदार, सुबक अक्षरात लिहावं यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How To write Faster)

पेन व्यवस्थित धरा

लिहताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेन व्यवस्थित पकडणं. पेन व्यवस्थित न पकडल्यास बोटं लवकर थकून जातात. पेन हलका आणि आरामदायक पद्धतीनं पकडा, म्हणजे तुम्ही न थकता जास्तवेळ लिखाण करू शकाल.

लिखाणाचा सराव करा

मुलं फक्त वाचून उजळणी करत असतील तर त्यांना लिखाणाचाही सराव करायला सांगा. लिखाणाचा सराव केल्यानं मुलांचा स्पिड वाढेल. यामुळे अभ्यास चांगला लक्षात राहण्यासही मदत होईल.

दातांवर पिवळा थर दिसतो? निया शर्मा सांगतेय १ देशी उपाय करा, २ मिनिटांत पांढरेशुभ्र होतील दात

छोट्या छोट्या शब्दांचा वापर

मोठी वाक्य लिहायला बराच वेळ लागतो. अशा स्थितीत तुम्ही छोटे छोटे शब्द, वाक्य लिहून वेळेत पेपर पूर्ण सोडवू शकता. ज्यामुळे वेग वाढेल आणि मांडणीही चांगली दिसेल.

तुमचं पूर्ण लक्ष पेपरकडे असायला हवं. जर सिलॅबसची पूर्ण तयारी झाली तर तुम्ही आत्मविश्वासानं लिहू शकाल. म्हणून परिक्षेच्या आधी व्यवस्थित लिखाणाची तयारी करा.

केस कोरडे बेजान दिसतात? जावेद हबीब सांगतात केस धुताना ‘हा’ पदार्थ लावा, होतील मऊमऊ

रोज ४ ते ५ पानं लिहिण्याची सवय ठेवा

लिखाणाचा वेग वाढवण्याची प्रॅक्टिस करता. जर तुम्ही दर दिवशी ४ ते ५ पानं लिहिण्याची सवय ठेवली तर परीक्षेत तुमचा हात वेगानं चालेल आणि आत्मविश्वासही वाढेल.

लिहिल्यानंतर एकदा वाचा

फक्त वेगानं लिहणं महत्वाचं नाही तर तुम्ही काय लिहिता, कसं लिहीता हे सुद्धा महत्वाचं असतं. म्हणून लिहिल्यानंतर तुम्ही काय लिहिलंय ते नक्की वाचा. ज्यामुळे चुका कमी होतील. परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी फक्त अभ्यासाची तयारीच नाही तर योग्य पद्धतीनं लिहिण्याची सवयही ठेवावी.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं