हल्ली वयस्कर माणसं असो किंवा मग लहान मुलं असो, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. बहुसंख्य मुलांचा दिवाळी सुटीचा वेळ हा फक्त मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात गेलेला आहे. सुटीतली क्रियेटीव्हीटी संपून मुलांचं विश्व फक्त मोबाईलमय झालेलं आहे. मुलांचं हे मोबाईल, टीव्ही वेड पाहून पालक हैराण होतात. मुलांच्या हातातला मोबाईल जाऊन तिथे वेगवेगळी पुस्तकं यावी अशी पालकांची खूप इच्छा असते. पण मोबाईलची मोहमयी दुनिया मुलांना पुस्तक हातात धरू देत नाही. हे चित्र बदलून जर मुलांची पुस्तकांशी मैत्री करून द्यायची असेल तर अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने सांगितलेला एक उपाय करून पाहा (How to Encourage a Child to Read Books?). ती म्हणते की याच काही गोष्टी करून तिने तिच्या मुलांना वाचनाची सवय लावली.
मुलांना वाचन करण्याची सवय कशी लावावी?
ट्विंकल म्हणते की मुलांना जर मोबाईलपेक्षाही स्मार्ट करायचं असेल तर त्यांच्या हातात पुस्तक येणं खूप गरजेचं आहे. यासाठी ती तिच्या मुलीला घेऊन पुस्तकांच्या दुकानात गेली. तिथे तिने अशी काही पुस्तकं निवडली जी तिच्यासाठी आणि तिच्या मुलीसाठीही रंजक असतील.
मराठवाडा स्पेशल उकड शेंगोळे: बेत असा फक्कड की भारीतले भारी पदार्थ पडतील फिके, पाहा पारंपरिक रेसिपी
ही पुस्तकं घेऊन मायलेकी घरी आल्या. आल्यानंतर तिने आणि मुलीने एकच पुस्तक वाचायचं ठरवलं. पुस्तक वाचताना मात्र काही नियम पाळायचे होते. ते असे की वाचन करताना हातात एक पेन्सिल घेऊन बसायचं. वाचताना एखादा मुद्दा खूपच आवडला किंवा एखादा मुद्दा अजिबातच नाही आवडला किंवा पटला तर त्यावर काही खुणा करायच्या. जे शब्द आवडले ते एकमेकींना सांगायचे. जे शब्द नाही समजले त्याचे अर्थ लगेच विचारायचे आणि दिवसभरात जेवढं पुस्तक वाचून झालं त्यावर दोघींनी गप्पा मारायच्या..
ट्विंकल म्हणते की या प्रयोगाची सुरुवात तर अगदी यशस्वीपणे झाली. तिची ११ वर्षांची मुलगी अगदी आवडीने पुस्तक वाचू लागली आणि पुस्तकांवर वेगवेगळ्या खुणाही करून ठेवू लागली.
अचानक तुमचं पोट का सुटलं? पाहा कारणं आणि थोड्या दिवसात पोट कमी करणारे सोपे उपाय
हाच प्रयोग तुम्हीही तुमच्या मुलासांबत करून पाहा. त्यांचा इंटरेस्ट काय आहे ते समजून त्यानुसार त्यांना त्यांच्या आवडीने पुस्तकं घेऊ द्या. सुरुवातीच्या काळात भाषा सोपी असेल आणि पुस्तकावरची अक्षरं मोठी असतील अशा पद्धतीची पुस्तकं निवडा. जेणेकरून मुलांना त्याविषयी गोडी निर्माण होईल.
