Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मुलांचं भविष्य धोक्यात, ४ चुका- वाढतो मुलांमध्ये मानसिक ताण, कायम राहतात एकटे

आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मुलांचं भविष्य धोक्यात, ४ चुका- वाढतो मुलांमध्ये मानसिक ताण, कायम राहतात एकटे

Divorce and child mental health: Effects of divorce on children: Parenting after divorce: आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मुलांना येणाऱ्या या मानसिक तणाला पालकांनी कशाप्रकारे हाताळायला हवं जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 09:30 IST2025-10-27T09:30:00+5:302025-10-27T09:30:02+5:30

Divorce and child mental health: Effects of divorce on children: Parenting after divorce: आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मुलांना येणाऱ्या या मानसिक तणाला पालकांनी कशाप्रकारे हाताळायला हवं जाणून घ्या.

how to help children deal with parents’ divorce emotional effects of divorce on kids common mistakes divorced parents make | आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मुलांचं भविष्य धोक्यात, ४ चुका- वाढतो मुलांमध्ये मानसिक ताण, कायम राहतात एकटे

आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मुलांचं भविष्य धोक्यात, ४ चुका- वाढतो मुलांमध्ये मानसिक ताण, कायम राहतात एकटे

सध्या नात्यांमध्ये दुरावा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्यामुळे सहज घटस्फोट होताना दिसतं आहे. घटस्फोट झाला म्हणजे सर्वकाही संपलं असं सगळ्यांना वाटतं.(Divorce and child mental health) त्यानंतर एकमेकांवर कोणतेही बंधन राहत नाही. दोघांतील वाद मिटल्याने पुन्हा भांडणाचा प्रश्न देखील उरत नाही. पण घटस्फोट झाल्यामुळे त्याचा इतर नात्यांवर परिणाम होतो.(Emotional stress in children after divorce) नातं संपतं पण त्यामुळे आपल्यावर आलेल्या जबाबदाऱ्या कोणावरही ढकलता येत नाही.(Effects of divorce on children) आई-वडील मुलांसाठी एकत्र निर्णय घेतात पण घटस्फोट झाल्यानंतर मुलांच्या आयुष्याच्या गाड्या अचानक एकाच कोणाकडे आल्याने त्याचा त्रास होतो. (Mistakes divorced parents make)
पालकांच्या घटस्फोटानंतर मुलं केवळ दोन घरांमध्ये विभागली जात नाहीत. तर त्यांच्या मनात कायमची एक पोकळी निर्माण होते.(Helping children cope with divorce) आई-वडिलांचा एकत्र वेळ, आनंद आणि कुटुंबातील एकोपा कुठे तरी हरवतो. ज्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. मुलांना असं वाटतं आता सगळं काही संपलं. आपल्याला समजून घेणारं कुणीही नाही.(Child psychology after divorce) त्यामुळे ते आपला आत्मविश्वास गमावतात, त्यांना गिल्ट वाटतं. डिप्रेशन किंवा सोशल एन्झायटी  येते. मुलांना येणाऱ्या या मानसिक तणाला पालकांनी कशाप्रकारे हाताळायला हवं जाणून घ्या. 

मुलांना कायम छळतात पालकांच्या 'या' ४ गोष्टी, उद्धवस्त होतं आयुष्य- दुर्लक्ष करु नका

1. सगळ्यात आधी पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोला. त्यांना समजवून सांगा, यात तुमची काही चूक नाही. तुमचे विचार, भावना मुलांना सांगा. त्यांना काय वाटते हे जाणून घ्या. त्यांच्या भावनाना प्राधान्य द्या. 

2. घर आणि कुटुंबातील बदलांमुळे मुलांना असुरक्षित वाटू लागते. पालकांनी मुलांचा दैनंदिन उपक्रम बदलू नका. मुलांचे जे जसे सुरु आहे, तसे सुरु राहू द्या. घटस्फोटानंतर अनेक पालक मुलांच्या शाळा बदलतात. ज्यामुळे मुले अधिक एकटी पडतात. 

3. घटस्फोटादरम्यान पालकांमधील वाढता तणाव मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करतो. अशावेळी पालकांनी मिळून मुलांची काळजी घ्यायला हवी. त्याचे व्यवस्थित संगोपन करायला हवे. अनेकदा पालक मुलांना एकमेकांविषयी चुकीचे सांगतात, ज्यामुळे मुलांच्या मनात आई-वडिलांविषयी गैरसमज निर्माण होतात. 

4. अनेकदा मुले आपल्या भावना दाबून टाकतात. शांत राहतात किंवा कुणाशीही काही बोलत नाही. ज्यामुळे त्यांच्या मनावर त्याचे आघात होतात. एकटेपणामुळे मुलांच्या मनात नको ते विचार येतात. यामुळे त्यांना मानसिक ट्रॉमा देखील सहन करावा लागतो. घटस्फोटानंतर पालकांनी मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी. त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्या. 

Web Title : तलाक का बच्चों के भविष्य पर असर: गलतियाँ बढ़ाती हैं तनाव, अकेलापन हावी।

Web Summary : तलाक बच्चों के मानसिक स्वास्थ्य को प्रभावित करता है, जिससे भावनात्मक तनाव और अकेलापन बढ़ता है। माता-पिता को खुलकर संवाद करना चाहिए, दिनचर्या बनाए रखनी चाहिए, सह-पालन-पोषण प्रभावी ढंग से करना चाहिए और नकारात्मक प्रभावों को कम करने के लिए बच्चों की भावनाओं को संबोधित करना चाहिए।

Web Title : Divorce impacts children's future: Mistakes increase stress, loneliness prevails.

Web Summary : Divorce affects children's mental health, creating emotional stress and loneliness. Parents should communicate openly, maintain routines, co-parent effectively, and address children's feelings to mitigate negative impacts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.