मुलांनी गरजेपेक्षा जास्त फोन वापरल्यामुळे त्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. शारीरिक विकास संथ गतीने होतो. मुलं तासनतास मोबाईलवर गेम खेळत असतात. टि.व्ही, कार्टून बघण्यात मुलं वेळ घालवतात. अनेक घरांत मुलं मोबाईल बघितल्याशिवाय जेवतच नाहीत.
ज्यामुळे त्यांना आऊटडोअर गेम्स खेळता येत नाहीत. पण मुलांची फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हे गेम्स फार महत्वाचे असतात. काही सोप्या टिप्स काम तुमचं काम सोपं करू शकतात. ज्यामुळे तुमच्या मुलांची फोन बघण्याची सवय सुटू शकते. (How To Get Rid Of Phone Addiction)
स्क्रीन टाईम फिक्स
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांचं स्क्रीन टाईम फिक्स करून तुम्ही त्यांना रोज तेव्हढा वेळ गॅजेट्स देऊ शकता. मुलांना ३० मिनिटांपेक्षा जास्तवेळ फोन पाहू देऊ नका. फोनमध्ये तुम्ही एज्युकेशनल अप्लिकेशन्स ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला फोनमध्ये नॉलेजच्या गोष्टी पाहता येतील.
मुलांच्या उत्तम भविष्यासाठी 'ही' सवय आजच बदला; सुधा मूर्तींचा पालकांना खास सल्ला
मुलांना संगित शिकवा
मुलांचं लक्ष मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना शारीरिरक मानसिक व्यायामांमध्ये व्यस्त ठेवा. त्यांना पार्कमध्ये बॅडमिंटर, क्रिकेट खेळायला पाठवा. तसंच संगित, पेंटीग यांसारख्या क्रिएटिव्ह गोष्टी शिकवा.
एकेकाळी ओव्हरवेट होत्या 'या' अभिनेत्री; ५० ते ६० किलो वजन घटवलं; पाहा त्याचं खास डाएट
एका ठराविक वेळीच फोन द्या
तुम्ही मुलांना संध्याकाळच्यावेळी मोबाईल पाहायला द्या. सकाळी फोन देऊ नका. यामुळे मुलांच्या फोनच्या वापरावर कंट्रोल करता येते.
ऑफलाईन मनोरंजनावर लक्ष द्या
याव्यतिरिक्त मुलांनी फोनचा वापर कमीत कमी करावा यासाठी तुम्ही मोबाईल त्यांना कमीत कमी प्रमाणात वापरायला द्या. मुलांना ऑफलाईन इंटरटेनमेंटचा मार्ग द्या. जेणेकरून त्यांना फोनपासून दूर ठेवता येईल. तुम्ही हळूहळू करून या टिप्स फॉलो करू शकता. ज्यामुळे तुमची सवय लवकर सुटेल. मुलांना चांगल्या गोष्टी, गाणी वाचून दाखवा किंवा त्याच्याकडून वाचून घ्या. ज्यामुळे मुलांची प्रगती चांगली होईल.