Tiger Parenting : आई-वडिलांनी आपल्या लहान मुलांसोबत कसं वागायचं आणि त्यांच्या विकासात कशी भर घालावी याबाबत नेहमीच वेगवेगळी संशोधनं समोर येत असतात. असंच एक महत्वाचं संशोधन अलिकडे समोर आलंय. ज्यात सांगण्यात आलंय की, गरजेपेक्षा जास्त कडक पालकत्व, ज्याला ‘टायगर पॅरेंटिंग’ म्हटलं जातं, ते मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. या पद्धतीत मुलांकडून कोणताही प्रश्न न विचारता सांगितलेला आदेश पाळण्याची अपेक्षा केली जाते, चुका झाल्यास शिक्षा दिली जाते आणि त्यांच्या भावना किंवा मतांना फारसं महत्त्व दिलं जात नाही.
नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठाच्या नव्या संशोधनानुसार, अशा वातावरणात वाढणाऱ्या मुलांमध्ये डिप्रेशन, एन्झायटी आणि तणावाचा धोका जास्त प्रमाणात वाढतो. म्हणजेच, अतिशय कडक पालकत्वाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
अभ्यास काय सांगतो?
टायगर पॅरेंटिंग म्हणजे अतिशय कडक शिस्त, खूप जास्त अपेक्षा आणि “सांगितलंय तेच करा” असा दृष्टिकोन. अनेकदा वेळा पालक मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दबाव टाकतात, पण हाच दबाव हळूहळू मुलांच्या मनावर ओझं बनतो. अभ्यासानुसार, अशा प्रकारचं पालकत्व मुलांना भावनिकदृष्ट्या कमकुवत बनवू शकतं, कारण त्यांना स्वतःचं मत मांडण्याची किंवा चुका करून शिकण्याची संधी कमी मिळते.
या अभ्यासात १० ते १८ वयोगटातील ५८३ शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांना पालकांच्या वागणुकीबद्दल आणि स्वतःच्या मानसिक स्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. अंजली भट्ट यांच्या मते, ज्या मुलांनी आपल्या पालकांना ऑथोरिटेरियन म्हणजेच अतिशय कडक म्हटलं, त्यांच्यात डिप्रेशन, एन्झायटी आणि तणावाची लक्षणं अधिक आढळली. उलट ज्या पालकांचा दृष्टिकोन सहकार्याचा होता, जे संवाद साधत होते आणि समजून नियम बनवत होते, त्यांच्या मुलांमध्ये मानसिक समस्या तुलनेने कमी दिसून आल्या.
मुलांना वाटू लागतो एकटेपणा
अभ्यासात असंही आढळलं की कडक पालकत्वामुळे मुलांमध्ये आत्मसन्मान थोडासा वाढू शकतो, पण मानसिक आरोग्यावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांच्या तुलनेत हा फायदा फारसा टिकत नाही. सतत दबाव आणि भीतीच्या वातावरणात राहिल्यामुळे मुलांना एकटं, असहाय्य वाटू लागतं आणि त्यामुळे त्यांची भावनिक स्थिती बिघडू शकते.
डीएनएपर्यंत परिणाम
इतकंच नाही, तर काही संशोधनानुसार अतिशय कडक पालकत्वाचा परिणाम डीएनएच्या पातळीवरही दिसून येऊ शकतो. ब्रिटनमधील एका अभ्यासात असं आढळलं की अशा पालकत्वामुळे मुलांच्या जीनमध्ये असे बदल होऊ शकतात, जे तणावाशी सामना करण्याची क्षमता कमी करतात. हाच पॅटर्न डिप्रेशनचा सामना करणाऱ्या प्रौढांमध्येही दिसून आला आहे.
नियमांसोबत संवाद महत्त्वाचा
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मुलांसाठी नियम गरजेचेच आहेत, पण नियमांसोबत संवाद, समज आणि सहानुभूतीही तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा पालक नियमांचं कारण समजावून सांगतात, मुलांचं ऐकून घेतात आणि सहकार्याचा दृष्टिकोन ठेवतात, तेव्हा मुलांचा आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य दोन्ही अधिक चांगलं राहतं.
Web Summary : Tiger parenting, characterized by strict discipline and high expectations, can negatively impact children's mental well-being, leading to depression and anxiety. Open communication and understanding are crucial for healthy development.
Web Summary : सख्त अनुशासन और उच्च अपेक्षाओं वाला टाइगर पैरेंटिंग बच्चों के मानसिक स्वास्थ्य पर नकारात्मक प्रभाव डाल सकता है, जिससे डिप्रेशन और चिंता हो सकती है। स्वस्थ विकास के लिए खुला संचार और समझ महत्वपूर्ण है।