Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालकांच्या 'या' ५ सवयी मुलांची स्मरणशक्ती वाढवतात सुपरफास्ट, मेंदूसाठी बूस्टर डोस- लागेल अभ्यासाची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2026 11:43 IST

children memory boost: parenting habits for smart kids: brain development in children: पालकांनी आपल्या सवयींमध्ये काही बदल केल्यास त्यांचा मेंदू अधिक चांगल्याप्रकारे तल्लख होईल. यासाठी पालकांनी काय करायला हवं पाहूया.

आपल्या मुलाचा शाळेत पहिला नंबर यावा आणि त्याला शाबासकीची थाप मिळावी असं प्रत्येक पालकाला वाटतं. सध्याच्या स्पर्धात्मक युगात मुलं लवकर शिकावीत, लक्ष केंद्रित करावीत आणि अभ्यासाची त्यांना गोडी लागावी अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते.(children memory boost) पण यासाठी भरमसाठ फी घेणारे क्लासेस किंवा अतिरिक्त ताण देणाऱ्या गोष्टी आपण मुलांकडून करुन घेतो. त्यामुळे ते कायम अभ्यास करण्याचा कंटाळा करतात. आपण मुलांना महागड्या शिकवण्या लावतो, विविध प्रकारचे सप्लिमेंट्स देतो.(parenting habits for smart kids) मात्र मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास हा केवळ पुस्तकी ज्ञानात नसून त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत दडलेला आहे. घरातील छोटी कामे मुलांच्या मेंदूसाठी बूस्टर म्हणून काम करतात. पालकांनी आपल्या सवयींमध्ये काही बदल केल्यास त्यांचा मेंदू अधिक चांगल्याप्रकारे तल्लख होईल. यासाठी पालकांनी काय करायला हवं पाहूया. 

फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी

जेव्हा आपले मूल घरातील साधी किंवा छोटी कामे करत असेल तर त्याच्या मेंदूला चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये त्यांना निर्णयक्षमता, तर्कशक्ती आणि शारीरिक समन्वय यांचा समावेश करता येतो. ही कामे मुलांच्या एक्झिक्युटिव्ह फंक्शनला वेगाने विकसित करतात, ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते. 

पालकांनी मुलांकडून करून घ्यावीत अशी ५ महत्त्वाची कामे

1. मुलांना त्यांचे कपाट आवरायला सांगा, त्यांची खेळणी जागच्या जागी ठेवणे किंवा धुतलेल्या कपड्यांची घडी घालायला सांगा. यामुळे त्यांना रंगांबद्दल माहिती समजेल. इतकेच नाही तर वर्गीकरणामुळे त्यांची तर्कशक्ती वाढेल. त्यांना नियोजन व्यवस्थित करता येईल. 

2. पालकांनी मुलांकडून भाज्या निवडणे, धान्य स्वच्छ करणे किंवा ताट नीट लावणे यांसारख्या गोष्टी करुन घ्यायला हव्या. यामुळे मुलांच्या हातांच्या स्नायूंचा आणि डोळ्यांचा समन्वय सुधारतो. स्वयंपाकातील गोष्टी समजून घेतल्याने त्यांना अनेक गोष्टी सहज हाताळता येतात. 

3. मुलांकडून सामानाची यादी बनवून घ्या. दुकानात गेल्यानंतर त्यांना वस्तू शोधण्यास सांगा. या सवयींमुळे मुलांना व्यवहारी ज्ञान तर समजते पण त्यांची स्मरणशक्ती देखील अधिक तीव्र होते. या नियोजनामुळे ते अभ्यासतही नियोजन करतात. 

4. मुलांना झाडे लावण्यापासून त्याची निगा कशी राखायची याविषयी माहिती द्या. निसर्गाच्या सानिध्यात काम केल्यामुळे मुलांचा ताण कमी होतो. झाडांना पाणी घालणे किंवा कुंडीतील मातीची निगा राखणे यातून त्यांना जबाबदारीची जाणीव होते. त्यांची निरीक्षणशक्ती वाढते. 

5. मुलांकडून स्वत:चे जेवणाचे ताट वाढून घ्याला, धुवायला आणि पुन्हा व्यवस्थित ठेवायाला सांगा. तसेच त्यांचे दप्तर भरणे किंवा शाळेचा अभ्यास स्वत:हून करायला सांगा. ज्यामुळे मुले स्वावलंबी होतील. ज्यामुळे अभ्यासाचा एकाग्रपणा वाढेल. 

मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान किंवा पाठांतर पुरेसे नसते. त्यांना कृतीतून काही शिकवल्यास त्यांचा मेंदू अधिक वेगाने काम करु लागतो. पालकांनी मुलांना अभ्यासासाठी खोलीत बंद न करता घरातील इतर गोष्टींमध्ये समावेश करा. या छोट्या सवयींमुळे ते यशस्वी आणि बुद्धिमान होतील. तसेच अभ्यासाची गोडी लागून हुशारही होतील.  

English
हिंदी सारांश
Web Title : Parents' habits boost children's memory, making studies enjoyable and easy.

Web Summary : Household chores boost children's brainpower. Assign tasks like tidying, helping in the kitchen, shopping, gardening, and self-care. These activities enhance memory, focus, and practical skills, fostering a love for learning and making them smarter.
टॅग्स :पालकत्वलहान मुलं