lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > अतिशय बुद्धीमान होतात लहानपणी 'या' सवयी असलेली मुलं; सायकोलॉजी सांगते स्मार्टनेसचं सिक्रेट

अतिशय बुद्धीमान होतात लहानपणी 'या' सवयी असलेली मुलं; सायकोलॉजी सांगते स्मार्टनेसचं सिक्रेट

How Do Child Geniuses Behave & Think : बुद्धीमान मुलं स्वत:चे निर्णय स्वत:घेतात. लहानपणापासूनच मुलांना छोट्या गोष्टींचे निर्णय त्यांचे त्यांना घेऊ द्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:19 PM2024-01-20T12:19:39+5:302024-01-20T13:56:34+5:30

How Do Child Geniuses Behave & Think : बुद्धीमान मुलं स्वत:चे निर्णय स्वत:घेतात. लहानपणापासूनच मुलांना छोट्या गोष्टींचे निर्णय त्यांचे त्यांना घेऊ द्या. 

How Do Child Geniuses Behave & Think : According To Psychology What Habits Do Genius Child Have | अतिशय बुद्धीमान होतात लहानपणी 'या' सवयी असलेली मुलं; सायकोलॉजी सांगते स्मार्टनेसचं सिक्रेट

अतिशय बुद्धीमान होतात लहानपणी 'या' सवयी असलेली मुलं; सायकोलॉजी सांगते स्मार्टनेसचं सिक्रेट

प्रत्येक मूल हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाची वेगळीच खासियत असते. (Parenting Tips) काही मुलं अभ्यासात हूशार असतात तर काही खेळण्यात हूशार असतात, तर काहीजणांना लहानपणापासूनच कला अवगत असते. लहान मुलं एकसारखी वाटत असली तरी त्यांच्यात क्वालिटीजही वेगवेगळ्या असतात. काही मुलं बुद्धीमान असतात. (How Do Child Geniuses Behave & Think) या लेखात सायकलॉजीनुसार कोणती मुलं लहानपणापासूनच बुद्धीमान असतात ते समजून घेऊ. तुमच्याही मुलांमध्ये हे गुण आहेत का हे तुम्हालाही समजून घेता येईल. (According To Psychology What Habits Do Genius Child Have)

सकारात्मक दृष्टीकोन

मुलांचं भविष्य घडवण्यात सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा असतो. व्यक्तीगत पैलू आणि प्रत्येक गोष्टी समजून घेणे महत्वाचे असते. सकारात्मकतेने मुलांनी कोणत्याही गोष्टीकडे पाहिले तर ते आव्हानांना घाबरणार नाहीत आणि त्यांच्या मनात भितीही येणार नाही. 

निर्णय घेणं

जीनियस मुलांमध्ये एक गुण असतो की ते जास्त गोंधळून न जाता निर्णय घेतात. त्यांना चूक आणि बरोबर यातील फरक समजतो. त्यांना फायदे, नुकसान आणि आकलन क्षमता सुधारते. बुद्धीमान मुलं स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. लहानपणापासूनच मुलांना छोट्या गोष्टींचे निर्णय त्यांचे त्यांना घेऊ द्या. 

वाचलेलं काहीच लक्षात राहत नाही? ४ गोष्टी करा; स्मरणशक्ती वाढेल, पाठ केलेलं विसरणार नाहीत मुलं

आत्म नियंत्रणाची भावना

अनेक मुलांना आपल्या भावभावना आणि रागावर कंट्रोल करायला जमत नाही. जर हे जमलं तर मुलांसाठी काहीही अशक्य नसेल. बुद्धीमान मुलांना स्वत: च्या भावनांवर नियंत्रण ठेवता येते.

रचनात्मक गुण

बुद्धीमान मुलांमध्ये रचनात्मक गुण असतात. त्याच्यात विचार करण्याची क्षमता जास्त असते. तुम्हीही तुमच्या मुलांमध्ये हा गुण विकसित करू शकता. जेणेकरून वाढत्या वयात ते बुद्धीमान होतील आणि आजूबाजूच्या गोष्टींचे ज्ञान आत्मसाद करतील.

मुलं यशस्वी व्हावीत असं वाटतं असेल तर 'ही' चूक टाळा, संदिप माहेश्वरीचा पालकांना खास सल्ला

जिज्ञासू वृत्ती

सगळ्यात महत्वाची गोष्टी अशी की बुद्धीमान मुलं जिज्ञासू वृत्तीची असतात. ते नेहमीच नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी तयार करतात. याव्यतिरिक्त मुलं जर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारत असतील तर त्यांना थांबवू नका किंवा ओरडूही नका. त्यांच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं द्या जेणेकरून मुलं बुद्धीमान होतील.

Web Title: How Do Child Geniuses Behave & Think : According To Psychology What Habits Do Genius Child Have

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.