Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना भूकच लागत नाही? मग द्या आजीबाईच्या बटव्यातील 'हे' आयुर्वेदिक चाटण, जेवतील पोटभर आनंदानं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 17:13 IST

home remedy to increase appetite in children : kids appetite booster home remedy : homemade appetite booster for kids : मुलांची भूक वाढवणारं आयुर्वेदिक चाटण, भूक वाढून मुलांची वाढ होईल भरभर...

"माझं बाळ काहीच खात नाही", "मुलाला भूकच लागत नाही" किंवा "घास तोंडात घेतला की मुलं बाहेर काढतं"... या कॉमन तक्रारी अगदी प्रत्येक घरोघर  ऐकायला मिळतात. मुलं किंवा घरातील लहान बाळ जेवणाला किंवा काही खायला नकोच म्हणतं असेल तर पालकांची चिंता वाढते. लहान मुलांना भूक न लागणं किंवा खाण्याबाबत नखरे करणं ही अनेक पालकांची समस्या आहे. योग्य पोषण मिळालं नाही, तर मुलांच्या वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांना योग्य पोषण मिळेल असं खायला देणं खूप महत्त्वाचं ठरतं. परंतु खाताना मुलं नकोच म्हणतं असतील, जेवणाला टाळाटाळ करत असतील तर नेमकं करायचं काय असा प्रश्न पालकांना पडतो. भारतीय संस्कृतीत आणि आयुर्वेदात लहान मुलांच्या आरोग्यासाठी 'चाटण' देण्याची परंपरा फार जुनी आहे(home remedy to increase appetite in children).

कधी दातांच्या कटकटीमुळे तर कधी पोटातील गॅसमुळे मुलं जेवायला कंटाळा करतात. अशा वेळी घरगुती औषधी घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेले चाटण गुणकारी ठरते. औषधी चाटण देण्याचा हा उपाय केवळ बाळाची भूकच वाढवत नाहीत, तर त्यांची प्रतिकारशक्तीही मजबूत करतात. आजीच्या बटव्यातील काही नैसर्गिक घटकांपासून (kids appetite booster home remedy) तयार केलेले चाटण दिल्यास मुलांची भूक नैसर्गिकरित्या वाढते आणि त्यांना जेवणाची गोडी लागते. बाळाची किंवा (homemade appetite booster for kids) लहान मुलांची भूक वाढवणारं हे चाटण नेमकं कसं तयार करायचं याची रेसिपी पाहूयात. 

मुलांची भूक वाढविणारं चाटण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य... 

मुलांची भूक वाढविणारं चाटण तयार करण्यासाठी आपल्याला १ कप बाल हिरडा, २ ते ३ टेबलस्पून साजूक तूप, १ टेबलस्पून मध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

अस्सल गावरान चवीचं, भरपूर कांदा घातलेलं 'इन्स्टंट कांद्याचं थालीपीठ' कसं करायचं, पाहा रेसिपी...

चाटण कसं तयार करायचं ? 

मुलं जेवत नसेल किंवा मुलांना भूक लागत नसेल तर अशावेळी त्यांना भूक लागावी यासाठी चाटण तयार करताना सगळ्यात आधी एका पॅनमध्ये थोडं साजूक तूप गरम करून त्यात बाल हिरडा ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यावा. त्यानंतर थोडा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालूंन बारीक वाटून त्याची पावडर तयार करून घ्यावी. ही बाल हिरड्याची पावडर एका हवाबंद डब्यांत भरुन स्टोअर करुन ठेवावी. गरजेनुसार, चमच्यात २ ते ३ चिमूटभर पावडर काढून त्यात थोडं मध मिसळून त्याचं चाटण तयार करुन घ्यावं. हे तयार चाटण महिनाभर दिवसातून रोज एक वेळेस मुलांना खायला द्यावं. यामुळे मुलांची भूक वाढून त्यांची पचनशक्ती सुधारण्यास देखील मदत होते. 

ना जिम ना डाएट, म्हातारेही दिसतात तरुण, जपानी लोकांच्या ५ सवयी म्हणजे दीर्घायुष्य आणि तारुण्याचं वरदान...

हा उपाय नेमका कसा आहे फायदेशीर... 

१. बाल हिरडा :- बाल हिरडा हा पचनाच्या तक्रारींवर रामबाण उपाय मानला जातो. यामुळे मुलांची मंदावलेली पचनशक्ती पुन्हा कार्यान्वित होते. पोटातील गॅस आणि जंत कमी करण्यास हा मदत करतो, ज्यामुळे मुलांची नैसर्गिक भूक वाढण्यास मदत होते. अनेकदा पोट साफ नसल्यामुळे मुलं जेवायला कंटाळा करतात. बाल हिरडा मुलांचे पोट साफ करण्यास मदत करतो. 

२. साजूक तूप :- साजूक तूप हे वाढत्या वयाच्या मुलांसाठी उर्जेचा उत्तम स्रोत आहे, जे त्यांना सक्रिय ठेवण्यास मदत करते. शरीरातील अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमता तूपा मुळे वाढते, ज्यामुळे मुलांचे पोषण नीट होते.

३. मध :- मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुलांची आजारांशी लढण्याची शक्ती म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवतात. चाटणाची चव वाढवण्यासाठी मधाचा उपयोग होतो, ज्यामुळे मुलं हे चाटण आवडीने खातात.

मुलांना भूक लागत नाही म्हणून बाल हिरडा आणि मधाचे चाटण देण्याचा 'हा' खास उपाय इंस्टाग्रामवरील me_prachid37 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Boost Your Child's Appetite with Grandma's Ayurvedic Remedy!

Web Summary : Is your child a fussy eater? This Ayurvedic 'chatan' recipe, featuring bal hirda, ghee, and honey, can naturally boost appetite and improve digestion. A traditional remedy to ensure your child eats happily and gets proper nutrition.
टॅग्स :पालकत्वलहान मुलंअन्नघरगुती उपायहोम रेमेडी