Join us

डॉक्टर सांगतात, 'ही' ३ फळं म्हणजे मुलांसाठी सुपरफूड! बुद्धी, ताकद आणि एनर्जी वाढेल वेगाने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 17:51 IST

Healthiest fruit for children : best fruits for kids : fruits for child growth and development : best fruits for toddlers and kids : मुलांना फळं खायला तर देतो परंतु, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती फळे खाणे सर्वोत्तम असते ते पाहा...

प्रत्येक पालकांना आपले मूल निरोगी, हुशार आणि ॲक्टिव्ह असायला हवे अशी इच्छा असते. मुलांची योग्य वाढ आणि संपूर्ण विकास व्हावा, यासाठी त्यांचे डाएट आणि खानपानाच्या सवयींकडे (Healthiest fruit for children) लक्ष देणे गरजेचे असते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना पौष्टिक व पोषक (best fruits for kids) असा आहार तर देतोच, सोबतच मुलांच्या आहारात फळांचा समावेश करणे देखील तितकेच आवश्यक असते( fruits for child growth and development).

विशेषतः फळं ही मुलांच्या आरोग्यासाठी सुपरफूड मानली जातात. मुलांनी फळं खाणे चांगले असते किंवा त्यांच्यासाठी फायदेशीर असले तरी, नेमकी त्यांनी कोणती फळे खावीत असा प्रश्न पालकांना पडतो. मुलांना फळं खायला तर देतो परंतु यातही कोणत्या प्रकारची फळे खाणे सर्वोत्तम असते, असा प्रश्न पडत असेल तर मुलांनी कोणती फळे खावीत ते पाहूयात. या संदर्भात बालरोगतज्ज्ञ पार्थ सोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

१. तज्ज्ञ काय सांगतात?

व्हिडिओमध्ये बालरोगतज्ज्ञ सांगतात की, सर्व प्रकारची फळे खाण्याचे फायदे असतात आणि याचबरोबर पोषक घटक हे प्रत्येक फळात वेगवेगळे असतात. मात्र, लहान मुलांसाठी तीन फळे सर्वात उत्तम मानली जातात, ती आहेत सफरचंद, पेर आणि पेरू. बालरोगतज्ज्ञ सांगतात की, जर मुलांना बद्धकोष्ठतेची समस्या असेल, तर ते चिडचिडे होऊ शकतात आणि त्यांची भूक देखील कमी होते. यासाठीच, पोट साफ ठेवण्यासाठी मुलांना फायबरची (fiber) गरज फार मोठ्या प्रमाणांत असते. सफरचंदात जवळपास ४ ग्रॅम इतके फायबर असते. सोबतच,पेरमध्ये ५ ते ६ ग्रॅम तर पेरूमध्ये सुमारे ९ ग्रॅम फायबर असते. यानुसार पाहिल्यास, पोट साफ ठेवण्यासाठी मुलांसाठी पेरू खाणे सर्वात जास्त फायदेशीर आहे.

मुलं स्वतःहून बसतील अभ्यासाला! आईबाबांनी करायला हव्या ३ सोप्या गोष्टी-लागेल अभ्यासाची गोडी...

२. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी :-

लहान मुले लवकर आजारी पडतात, म्हणून त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक असते. व्हिटॅमिन सी (Vitamin C) रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर असते. एका मध्यम आकाराच्या सफरचंदात सुमारे ८ मिग्रॅ व्हिटॅमिन 'सी' असते. पेरमध्ये जवळपास १० मिग्रॅ व्हिटॅमिन 'सी' मिळते. तर, एक पेरू खाल्ल्याने मुलांना २०० ते २५० मिग्रॅ पर्यंत व्हिटॅमिन 'सी' मिळू शकते. याचा अर्थ, फक्त एक पेरू खाल्ल्याने मुलाला तेवढे व्हिटॅमिन सी मिळते, जे जवळपास २० सफरचंद किंवा पेर खाल्ल्याने मिळेल. या दृष्टीने देखील, पेरू खाणे जास्त फायदेशीर आहे.

५ वर्षांपासून लहान मुलांची स्मरणशक्ती व बुद्धी होईल तल्लख! पालकांनी कराव्यात ३ गोष्टी - साध्या आणि सोप्या...

३. मुलांच्या वयोमानानुसार त्यांना फळे खायला द्या...

डॉक्टर सांगतात की, मुलांचे वय लक्षात घेऊनच मग त्यांना फळे खायला द्यावीत. ६ महिन्यांच्या बाळाला तुम्ही सफरचंद आणि पेर खाण्यासाठी देऊ शकता, पण ते नरम करून किंवा लहान तुकडे करुन खायला द्यावेत. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पेरू देऊ नये, कारण तो थोडा कडक असतो आणि त्याच्या बिया मुलांच्या घशात अडकू शकतात. जेव्हा बाळ एक वर्षाचे होईल आणि व्यवस्थित चावायला किंवा खायला शिकेल, तेव्हा त्याला पेरूचे छोटे तुकडे करुन खायला देऊ शकता.

डॉक्टर पार्थ सोनी यांच्या मते, मुलांसाठी पेरू सर्वात फायदेशीर असे फळ आहे. पेरु फक्त मुलांचे पोट साफ ठेवण्यासाठीच मदत करत नाही, तर रोगप्रतिकारशक्ती देखील खूप मजबूत करते. तरीही, मुलांचे वय आणि त्यांची खाण्याची क्षमता लक्षात घेऊनच त्यांना फळं खायला दिली पाहिजे. योग्य वेळी योग्य फळ दिल्यास मुलांचे आरोग्य मजबूत होते आणि मूल निरोगी राहण्यास मदत होते.

टॅग्स :पालकत्वफळेलहान मुलं