Join us
Daily Top 2Weekly Top 5

Lore Chasing. : सहलीला जाता का इंन्स्टाग्रामवर फोटो टाकायला? जेन झीचा नवा ट्रॅव्हल ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 14:58 IST

Exploring new travel trend lore chasing: solo travel to content creation : Lore Chasing. : इन्स्टाग्रामेबल प्रवासाची नवी गोष्ट !

Lore Chasing. हा शब्द आईवडिलांच्या चाळिशीच्या पिढीनं ऐकलाही नसेल. पण, त्यांची जेन झी मुलं मात्र आता म्हणतात की टिपिकल ट्रिप नाही, सोलो ट्रॅव्हलही जुनं झालं, मला लॉर चेसिंगला जायचं आहे. म्हणजे काय समजायचं आईबाबांनी?तर ही जेन झीच्या प्रवासाची आणि भवतालचं जग पाहण्याची नवीन कल्पना आहे. त्याला ते लॉर चेसिंग म्हणतात. म्हणजे काय तर अशा जागी प्रवासाला जायचं जे जग फारसं कुणाला माहिती नाही, किंवा निदान तो अनुभव तरी स्वत:साठी नवीन असेल. लांब ट्रिप, खर्चिक प्रवास, मोठी सुटी असंही नाही, अनुभव हवा खणखणीत. (Exploring new travel trend lore chasing: solo travel to content creation)आणि मुख्य म्हणजे तिथे जाऊन इन्स्टाग्रामसाठी फोटो काय काढायचे, रिल काय करायचं म्हणजे काय तर गोष्ट काय इतरांशी शेअर करायची असा काहीसा थरात त्यांना हवा आहे. म्हणून मग अगदी मडकी कशी बनतात, शहरातल्या जुन्या गल्ल्या, घाट, खाद्यसंस्कृतीचे अनुभव, मध्यरात्रीचे अनुभव, काही वेगळ्या विषयांचे वर्कशॉप्स असं काहीबाही कधीही न अनुभवलेलं शोधत ते फिरतात. त्यासाठी त्यांना पैसेही फार नको असतात. जेमतेम सोयीत ते नवनवीन जग पाहायला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांना ट्रॅव्हल एजंटपेक्षा आता एआयकडून घेतलेली माहिती जास्त महत्त्वाची वाटतेय.

लॉर चेसिंग म्हणजे प्रवास नाही, तर किस्से-कहाण्या-अनुभव गोळा करत फिरण्याची नवीन उर्मी आहे.जेन झीच्या भाषेत सांगायचं तर त्यांना आठवणी जमवण्यात जास्त रस आहे. त्यामुळे भरल्या बॅग केली ट्रॅव्हल कंपनीची गाडी, एका दिवसात केले आयटनरीचे टिकमार्क हे आता मुलांना आवडत नाही.अनेकांना तर कुटूंबासोबतच्या सहलीच आवडत नाहीत. आणि गेलेच सगळे एकत्र तर त्या सहलीची काय गोष्ट जगाला सांगता येईल, कंटेट मिळेल का असा अनेकांचा प्रयत्न असतो.आता हे सारं चांगलं की वाईट, करावं की नाही हा व्यक्तिगत निवडीचा प्रश्न मानला तरी त्यातून नवे ट्रॅव्हल ट्रेंड जन्माला येत आहेत हे नक्की.

English
हिंदी सारांश
Web Title : Lore Chasing: Gen Z's travel trend – experiences, not just Instagram photos.

Web Summary : Gen Z prefers 'Lore Chasing' – unique travel experiences over typical trips. They seek untold stories, local culture, and unusual workshops, focusing on authentic memories and sharing compelling narratives rather than staged Instagram content. AI helps them plan.
टॅग्स :सामाजिकसोशल व्हायरलट्रॅव्हल टिप्सइन्स्टाग्रामपालकत्व