सध्याच्या धकाधकीच्या काळात बाळाची काळजी घेणं सगळ्यात मोठं आव्हान आहे. बाळ जन्माला आल्यानंतर सगळ्यात आधी पालक त्यांना डायपरच घालतात.(diaper side effects on baby) प्रत्येक आईसाठी डायपर हा सोयीचा पर्याय ठरतो.(diaper rash baby care) दिवसभर बाळाला स्वच्छ करण्याचा त्रास यापासून वाचतो. सुरुवातीच्या महिन्यात बाळ वारंवार लघवी करतात.(baby kidney health) ज्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला त्यांचे कपडे बदलणं कठीण होतं. ही गैरसोय टाळण्यासाठी पालक डायपर वापरतात.(pediatrician diaper warning)
बालरोगतज्ज्ञ डॉ. इम्रान पटेल म्हणतात बाळाला डायपर घातल्याने किडनीला नुकसान होते असं सांगून पालकांना घाबरवलं जातं. पण ही माहिती काही प्रमाणात खोटी आहे. नेमकं खरं कारण काय जाणून घेऊया. (diaper hygiene tips)
डॉक्टर सांगतात दर दोन ते तीन तासांनी बाळाचे डायपर बदलायला हवं. बाळाला डायपरशिवाय देखील काही वेळ राहू द्या. सतत डायपर घातल्याने मुलांना रॅशेस येऊ शकतात. ज्या मुलांनी डायपरची ऍलर्जी आहे किंवा त्यांचे डायपर वारंवार बदलले जात नाही. त्यांना ही समस्या उद्भवते.
डॉक्टरांनी असं ही सांगितलं की, डायपर खराब होण्याची विविध कारणं आहेत. याचा किडनीशी काहीही संबंध नाही. पण पालकांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. अनेक वेळा पालक बाळ झोपलेलं असताना रात्रीभर डायपर बदलत नाहीत, पण हा सर्वात मोठा धोका ठरू शकतो. कारण मूत्र दीर्घकाळ डायपरमध्ये राहिल्यास त्यातून बॅक्टेरिया वाढतात आणि ते शरीरात पसरतात.
डायपरच्या सततच्या वापरामुळे बाळाची त्वचा कोरडी पडते, नैसर्गिक फॅब्रिकचे डायपर वापरणं आणि दर काही तासांनी डायपर बदलणं. याशिवाय बाळाला दिवसातून काही वेळा मोकळं ठेवणं, म्हणजेच डायपरविना हवा लागू देणं, त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि इन्फेक्शनची शक्यता कमी होते. पालकांनी आपल्या सोयीपेक्षा बाळाची काळजी घ्यायला हवी. तसेच डायपरचा वापर हा मर्यादेत असायला हवा.
