Lokmat Sakhi >Parenting > स्तनपान केल्याने वजन खरंच कमी होते का? तज्ज्ञ सांगतात नेमकं यामागचं खरं कारण...

स्तनपान केल्याने वजन खरंच कमी होते का? तज्ज्ञ सांगतात नेमकं यामागचं खरं कारण...

Does Breastfeeding Cause Weight Loss : Does breastfeeding help with weight loss : Does Breastfeeding Help You Lose Weight : स्तनपानाचा महिलेच्या वजनावर परिणाम होतो. पण हे कसे घडते आणि का? ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2025 20:28 IST2025-03-01T20:18:43+5:302025-03-01T20:28:47+5:30

Does Breastfeeding Cause Weight Loss : Does breastfeeding help with weight loss : Does Breastfeeding Help You Lose Weight : स्तनपानाचा महिलेच्या वजनावर परिणाम होतो. पण हे कसे घडते आणि का? ते पाहूयात...

Does Breastfeeding Cause Weight Loss Does breastfeeding help with weight loss Does Breastfeeding Help You Lose Weight | स्तनपान केल्याने वजन खरंच कमी होते का? तज्ज्ञ सांगतात नेमकं यामागचं खरं कारण...

स्तनपान केल्याने वजन खरंच कमी होते का? तज्ज्ञ सांगतात नेमकं यामागचं खरं कारण...

डिलिव्हरी झाल्यानंतर नव्यानेच आई झालेल्या स्त्रीला बाळाला स्तनपान करण्याचा सल्ला दिला जातो. कमीत कमी पहिले सहा महिने तरी बाळाला आईचेच दूध (Does breastfeeding help with weight loss) दिले जाते. आईचे दूध हा बाळासाठी सर्वोत्तम आणि अतिशय पोषक असा आहार असल्याचे मानले जाते. जी लहान बाळ त्यांच्या पोषण आणि वाढीसाठी पूर्णपणे स्तनपानावर (Does Breastfeeding Cause Weight Loss) अवलंबून असतात ती निरोगी आणि तंदुरुस्त असतात. अशा मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि आजारी पडण्याचा धोकाही कमी असतो. यासाठीच स्तनपान अतिशय महत्वाचे असते. असे म्हटले जाते की आई जो काही पौष्टिक आहार घेते त्यातील पोषक घटक स्तनपानाद्वारे मुलांपर्यंत पोहोचवले जातात. यासाठीच बाळांच्या वाढीसाठी आणि पोषक घटक मिळण्यासाठी आईने आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे असे म्हटले जाते(Does Breastfeeding Help You Lose Weight).

अशा परिस्थितीत, मुलांच्या वाढीसाठी आणि त्यांना पोषक घटक मिळावेत म्हणून आईला सतत काही ना काही हेल्दी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी, त्या नव्यानेच आई झालेल्या स्त्रीच्या मनात त्यांच्या वाढत्या वजनाबद्दल अनेक प्रश्न असतात. त्यांना प्रश्न पडतो की ते कधी त्यांचे वाढते वजन कमी करू शकतील का? याउलट, काहीजणींच्या वजनात (Breastfeeding & Weight Loss) आधीपेक्षा बराच मोठा बदल झालेला दिसतो. अशावेळी स्तनपान केल्याने वजन कमी होते असे आपल्याकडे मानले जाते. स्तनपान केल्याने वजन कमी होते. तर स्तनपानामुळे स्त्रीचे वजन कमी होऊ शकते यात काही तथ्य आहे का की ते फक्त एक खोटी गोष्ट आहे? याबद्दल सविस्तर माहिती डॉ. शोभा गुप्ता, वैद्यकीय संचालक, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयव्हीएफ तज्ञ, मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटर, वृंदावन आणि नवी दिल्ली यांच्याकडून समजून घेऊया.

स्तनपानामुळे वजन कमी होऊ शकते का ? 

स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. हे केवळ बाळासाठीच नाही तर महिलेसाठी देखील फायदेशीर मानले जाते. स्तनपानामुळे बाळ आणि आईमध्ये एक मजबूत बंध निर्माण होतो. स्तनपान देखील स्त्रीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण, प्रश्न असा आहे की, स्तनपान वजन कमी करण्यास मदत करू शकते का? याबद्दल डॉ. शोभा गुप्ता म्हणतात, "स्तनपान केल्याने काही प्रमाणात वजन कमी होते. पण, हे अचानक होत नाही. बाळाला जास्त वेळ स्तनपान केल्याने महिलेच्या वजनात फरक पडतो. पण, वजन कमी करण्यासाठी ती एक प्रभावी पद्धत मानली जाऊ शकत नाही." डॉक्टर पुढे स्पष्ट करतात, "वजन कमी होण्यास अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये महिलेचा आहार, जीवनशैली आणि शारीरिक हालचाली महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे, स्तनपानामुळे वजन जलद कमी होते असे म्हणणे योग्य ठरणार नाही. स्तनपानामुळे वजनात थोडासा फरक पडू शकतो." शिवाय, स्त्रिया स्तनपान थांबवताच त्यांचे वजन सामान्य होते.

मासिक पाळी दरम्यान पिरिएड्स पॅंटी वापरणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात यामागची खरीखुरी कारणं...

स्तनपान करताना वजन कसे कमी करावे ? 

हे स्पष्ट झाले आहे की, केवळ स्तनपान केल्याने वजन कमी होत नाही. त्याऐवजी, जेव्हा एखादी महिला तिच्या बाळाला सतत तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ स्तनपान करते तेव्हाच वजन कमी झाल्याचे लक्षात येते. प्रश्न असा आहे की हे कसे घडते? खरंतर, स्तनपान केल्याने कॅलरीज बर्न होतात. तथापि, स्तनपानामुळे अनेक महिला प्रयत्न न करताही खूप वजन कमी करतात हे नाकारता येत नाही.

खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...

स्तनपान करताना वजन संतुलित कसे ठेवावे? 

तज्ज्ञांचे असे मत आहे की जोपर्यंत एखादी महिला तिच्या बाळाला स्तनपान करत असते तोपर्यंत तिने तिचे वजन कमी करण्याचा विचार करू नये. कारण वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्याने बाळाच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तथापि, संतुलित वजन राखण्यासाठी, येथे दिलेल्या टिप्सचे अनुसरण करा-

१. नेहमी संतुलित आहार घ्या. तुमच्या आहारात हंगामी भाज्या आणि फळे समाविष्ट करा. मसालेदार आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळाच. 

२. स्तनपान करताना डाएटिंग करु नये. आहार घेत असताना, महिला बहुतेकदा प्रथिने इत्यादींवर जास्त लक्ष केंद्रित करतात. तर बाळाला सर्व प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. 

३. स्तनपान देणाऱ्या महिलांनी जास्त व्यायाम करू नये. या दिवसात नेहमी सामान्य व्यायाम करा. यामुळे वजन संतुलित राहण्यास मदत होते.

Web Title: Does Breastfeeding Cause Weight Loss Does breastfeeding help with weight loss Does Breastfeeding Help You Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.