Lokmat Sakhi >Parenting > मुलं खातात पण अंगालाच लागत नाही? मुलांचं वजन, उंची वाढवण्यासाठी डॉक्टर सांगतात खास उपाय

मुलं खातात पण अंगालाच लागत नाही? मुलांचं वजन, उंची वाढवण्यासाठी डॉक्टर सांगतात खास उपाय

Recipe For Kids Height And Weight Gain : बटाट्यात एंथोसियानिन असते ज्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 19:21 IST2024-12-15T19:09:35+5:302024-12-15T19:21:50+5:30

Recipe For Kids Height And Weight Gain : बटाट्यात एंथोसियानिन असते ज्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते.

Doctor Arpit Shared Avocado Broccoli Puree Recipe For Height And Weight Gain | मुलं खातात पण अंगालाच लागत नाही? मुलांचं वजन, उंची वाढवण्यासाठी डॉक्टर सांगतात खास उपाय

मुलं खातात पण अंगालाच लागत नाही? मुलांचं वजन, उंची वाढवण्यासाठी डॉक्टर सांगतात खास उपाय

जेव्हा ६ महिन्यांनंतर  मुलं आपला आहार घेणं सुरू करतात तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याबाबत महिला खूपच चिंतेत असतात. मुलांना काय खाऊ घातल्यानं भरपूर पोषण मिळेल आणि चविष्टही असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. पीडियाट्रिशन डॉक्टर अर्पित गुप्ता यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ६ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. जर तुमचं मुलं  ६ महिन्याचं झालं असेल तर ही रेसिपी त्यांनी नक्की ट्राय करायला हवी. डॉक्टर अर्पित यांनी सांगितलेली ही रेसिपी कोणती ते पाहूया. (Doctor Arpit Shared Avocado Broccoli Puree Recipe For Height And Weight Gain)

रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा शिजलेला एवाकॅडो, एक मध्यम आकाराचा बटाटा, एक छोटी ब्रोकोली आणि अर्धा कप दूध लागेल. हे सर्व पदार्थ वापरून तुम्ही हेल्दी आणि टेस्टी बेबी फूड रेसिपी बनवू शकता. सगळ्यात आधी बटाटा, ब्रोकोलीसुद्धा पाण्यानं साफ करून घ्या. नंतर बटाटा चिरून त्यात ब्रोकोलीचे छोटे छोटे तुकडे घाला. नंतर बटाटा १० मिनिटांसाठी उकळवून घ्या. ब्रोकोली नरम होईपर्यंत ५ ते ७ मिनिटं उकळवून घ्या.


नंतर तुम्ही बटाटा आणि ब्रोकोली चमच्यानं चेक करू शकता की व्यवस्थित शिजली आहे की नाही. नंतर भाज्यांमधून पाणी काढून घ्या आणि थंड होऊ द्या.  त्यानंतर भाज्या, एवाकॅडो अर्धा कप दूधात मिसळून ब्लेंड करून घ्या. गरजेनुसार तुम्ही त्यात पाणी मिसळू शकता. 

एवाकॅडोजफ्रॉममॅक्सिकोच्या रिपोर्टनुसार एवाकॅडो अनसॅच्युरेडेट फॅट्सचा एक नैसर्गिक फॅटचा एक  प्राकृतिक स्त्रोत आहे. ज्याच्या  ५० ग्रॅम सर्व्हिंग्समध्ये  ५ ग्रॅम फॅट असते. योग्य प्रमाणात अनसॅच्युरेडेट फॅट्स घेणं गरजेचं असतं. ज्यामुळे  शरीराचा विकास चांगला होतो.

बटाट्यात एंथोसियानिन असते ज्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते. बटाट्याच्या मुलांच्या आहारात समावेश केल्यानं आजारांपासून लढण्यास मदत होते. बटाट्यातील  स्टार्च, व्हिटामीन सी असे अनेक एंजाईम्स मुलांची स्किन आणि सुरक्षा, पोषण प्रदान करतात.

ब्रोकोली खाल्ल्यानं काय होते?

युरोकिड्स इंडीयाच्या रिपोर्टनुसार ब्रोकोलीत कोलिन असते जे मेंदूच्या विकासासाठी महत्वपूर्ण असते. कोलिन स्मरणशक्ती वाढवते. मूड चांगला ठेवते, मांसपेशींच्या विकासासाठी आवश्यक असते. यात एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे मुलांना एक कवच प्रदान होते आणि शरीराची फ्री रॅडिकल्सपासून सुटका होते. 

Web Title: Doctor Arpit Shared Avocado Broccoli Puree Recipe For Height And Weight Gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.