Join us

दीपिका पादुकोण म्हणते- आई झाल्यावर खूप गोष्टी बदलल्या आणि 'या' गोष्टीचा त्रास होऊ लागला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 18:18 IST

Deepika Padukone Explain About Her Motherhood Journey: अभिनेत्री दीपिका पादुकोण सांगते आहे आई झाल्यानंतर तिचं आयुष्य कसं बदललं याविषयी काहीतरी खास...(Deepika Padukone opened up on mom guilt)

ठळक मुद्देआपण करतो आहोत ते चूक आहे की बरोबर हे समजत नाही. कर्तव्याची जाण आणि बाळाची काळजी या दोन्ही गोष्टी एकाचवेळी सांभाळताना तारांबळ होतेच..

आई होणं सोपं नाहीच.. आई झालं की कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी डोक्यात विचार येतो तो आपल्या मुलांचा. आपल्याकडे असं म्हणतात की लग्न करून सासरी गेल्यानंतर मुलींचं आयुष्य बदलून जातं. पण त्यापुढेही जाऊन असं म्हणावं वाटतं की लग्नानंतर जेवढा फरक पडत नाही, तेवढा बदल आयुष्यात आई झाल्यानंतर येतो. कारण एक छोटासा जीव पुढचे काही दिवस तरी फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून असतो. आपण जे काही करतो त्याचा थेट परिणाम त्या बाळावर होतो. त्यामुळे आईला कोणताही निर्णय घेताना आधी बाळाबद्दलच विचार करावा लागतो. मग ती आई एखादी सामान्य गृहिणी असो किंवा मग दीपिका पादुकोणसारखी सुपरस्टार आई असो (Deepika Padukone opened up on mom guilt).. आईपण, आईपणामुळे आयुष्यात झालेला बदल आणि मनात सलणारी एक गोष्ट याविषयी दीपिका नुकतीच मोकळं बोलली आहे..(Deepika Padukone Explain About Her Motherhood Journey)

 

फोर्ब्सतर्फे अबुधाबी येथे नुकतीच एक परिषद घेण्यात आली. या परिषदेला दीपिकाही उपस्थित होती. त्यावेळी तिथे झालेल्या एका मुलाखतीमध्ये दीपिकाने असं सांगितलं की आई झाल्यानंतर आयुष्य खूप बदलून गेलं आहे.

हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

रोजच्या गोष्टींमध्ये तर मोठा फरक पडलाच पण चित्रपटांच्या निवडीमध्येही फरक पडला. कारण कोणत्याही चित्रपटासाठी हो म्हणण्यापुर्वी आधी बाळाचा विचार डोक्यात येतो. हे अगदी साहजिक आहे कारण शुटिंग सांभाळून मुलीकडे लक्ष देणं खरंच कठीण आहे. 

 

यासोबतच प्रत्येक वर्किंग वुमनला जी गोष्ट छळते तिच मॉम गिल्‍ट नावाची गोष्टही दीपिकाला आता त्रास देऊ लागली आहे.. दीपिका म्हणते की मी या सगळ्या गोष्टींची सवय करून घेण्याचा आता प्रयत्न करते आहे..

व्यायाम करूनही वजन कमी होईना? 'हा' चहा पिऊन बघा, मेटाबॉलिझम सुधारून वजन घटेल भराभर

आई झाल्यानंतर आपल्या तान्हुल्याला घरी ठेवून कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक आईला हा त्रास होतोच.. आपण करतो आहोत ते चूक आहे की बरोबर हे समजत नाही. कर्तव्याची जाण आणि बाळाची काळजी या दोन्ही गोष्टी एकाचवेळी सांभाळताना तारांबळ होतेच.. पण त्यातूनच तर प्रत्येक आई आणखी परिपक्व होत जाते आाणि तिचं बाळही आईच्या कामाची जाणीव ठेवून जास्त गुणी होत जातं..

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंदीपिका पादुकोण